STORYMIRROR

archana d

Drama Crime Inspirational

3  

archana d

Drama Crime Inspirational

ती आणि तो नराधम

ती आणि तो नराधम

5 mins
239

रात्री ची वेळ. घराशेजारी असलेल्या घरातुन रडण्याचा,किंचाळण्याचा,आरडाओरड आणि

भांड्यांचा आवाज..चामडी पट्ट्या ने अंगावर जोरदार वार..


या सर्व गोष्टींचा आवाज कानापर्यंत ऐकू येत होता.. काही कळण्याच्या आत बंद दरवाजा उघडला गेला आणि एका स्त्री ला बाहेर फेकलं गेलं.


मी आवाक झालो. कळतच नव्हतं काय करावं त्या स्त्रीच्या डोक्यातून रक्त ओघळून जमिनीवर टप-टप पडत होतं. 


तितक्यात दरवाजातून एक व्यक्ती बाहेर पडला...आणि एक नजर त्या स्त्री कडे रोखून पाहिलं..



त्याने तिचा हात गच्च पकडला आणि भिंतीवर आपटणार तितक्यात मी खाली उतरून त्या व्यक्तीला पकडलं. जोराचा हिसका देत त्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला...


माझी पकड अतिशय घट्ट होती त्यामुळे माझ्या तावडीतून सुटका करून घ्यायला त्याला जमलं नाही. शिव्यांचा भडीमार करत तो तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता. 

     

     घरात असणार्‍या लहानलहान मुली भेदरून गेलेल्या अवस्थेत... रडापड, आक्रोश, किंचाळ्यानी घराला स्मशानाचं रूप आलेलं..



जो व्यक्ति त्या स्त्री ला मारत होता तो दुसरा कोणी नसून तिचा नवरा... मी त्याला घट्ट पकडून ठेवलेलं व त्याच अवस्थेत मी विचारलं 



"का मारताय? काय झालय असं नेमकं? तर त्याचं उत्तर मला हैराण करणार होतं. तो उतरला की " हिला पाचव्यांदा सुध्दा मुलगीच झाली मला मुलगा पाहिजे होता"

        आता मी सुन्न झालो..मला सुचतच नव्हतं काय बोलावं ते... पण मी त्याला आवाज चढवून म्हणलं "अरे मुर्ख माणसा पुरुषाच्या च गुणसुत्रा वर अवलंबुन असत मुलगा होणार की मुलगी.. मग तु तिला काय दोष देतोय? दोष तर तुझाच आहे.."



      मी असं बोलताच त्याने रागाच्या भरात खाली पडलेल्या त्या स्त्रीला लाथ मारली..आता माझा तोल सुटला आणि मी जोर्‍यात त्याच्या गालात एक-दोन लगावली.


तसा तो माझ्या अंगावर धावून आला..आणि झटापट सुरू झाली..हे पाहून माझा लहान भाऊ धावून आला. त्याने सुद्धा त्या व्यक्तीला 2-3 जोरात लगावली. तसा तो भानावर आला. तोपर्यंत आजुबाजुचे लोक जमले..एवढे लोक पाहून तो घामेजून गेला..आता मात्र तो थरथरत होता.. 



मी त्या स्त्रीला जागेवरून उठवलं.."चला तुमच्या डोक्याला पट्टी करू" असं बोललो. तर तिने नकार दिला आणि घरातच असलेल्या कापडाचा तुकडा घेऊन डोक्याभोवती गुंडाळला...


 तिच्या सर्व अंगावर चामडी पट्ट्या ने वार केल्यामुळे लाल व्रण दिसत होते. मी पेला भरून पाणी दिलं तिला. ती गटगटा पाणी पीत होती....



      दुसरीकडे तिच्या नवर्‍याला सर्वजण जाब विचारत होते. तु मारझोड का केली, कारण काय आहे? इतकं मारायचं असतं? तो मात्र आता मुग गिळून गप्प होता..



तिथे असणार्‍या सर्व स्त्रियांच म्हणणं एकच आलं ' तुरूंगात टाका ह्याला..कोण म्हणत होतं इथेच चोप द्या ह्याला..

      हे सर्व चालु असताना एक गोष्ट कळली जी थक्क करणारी तर होतीच आणि कोणाच्या पचनी पडणारी नव्हती...तो पेशा ने दुसरा-तिसरा कोणी नसुन एक 'शिक्षक' होता. कुणीतरी कानात गरम तेल ओतावं असं मला झालं...


त्या स्त्रीला पाच मुली बिलगून रडत होत्या..त्यातील 4 वर्षाची मुलगी आईचे डोळे पुसत म्हणाली " आई तु रडु नको मी आहे ना तुझ्यासोबत...बाबाला मी सांगते आईला मारू नका म्हणून".


ते ऐकून माझ्या अंगावर रोमांच शहारला...कारण चार वर्षाची ती मुलगी तिच्या आईला दहा हत्तीचं बळ देऊन गेली...



पाच ही मुली जवळपास लहानच होत्या...सर्वांत मोठी मुलगी बारा-तेरा वर्षाची असावी बहुदा..



त्या स्त्रीने आपली कहाणी सांगायला सुरूवात केली. बराच वेळ तिच्यासोबत आतापर्यंत घडलेल्या गोष्टींचा पाढा ती वाचत होती..ती सांगत असताना अजून एक भयानक सत्य पुढे आलं.. ते म्हणजे तिला मुलगा होत नसल्या कारणाने त्या व्यक्तीने दुसरा लग्न केलेलं.. आणि गम्मत म्हणजे काय त्या दुसर्‍या बायकोला सुद्धा मुलगीच झालेली. 



हळूहळू सर्व सत्य बाहेर येत होतं. तीने अजून एक सत्य पुढे आणलं जे खुप लाजिरवाणं होतं..तिने सांगितलं "ह्यांची दुसरी बायको तर अजून गर्भवती आहेच आणि मी सुद्धा सध्या गर्भवतीच आहे".


आता हे ऐकून तर मी जागेवरच स्तब्ध झालो. आता माझ्याकडे काही शब्दच उरले नव्हते.


त्या नराधमाला उकळत्या तेलात तळून त्याचे तुकडे करावे असं झाल.



मुलगा हवा म्हणून इतक्या खालच्या पातळीला जावं?

इतका हव्यास कशापायी? 


दिवसभर काम करून थकून जेव्हा ती झोपायची ,तेव्हा तो मात्र बळजबरी करायचा...मनाविरुद्ध दररोज समाजमान्य बलात्कार व्हायचा...शारीरिक भुक नसताना हावरटा सारखा तिला ओरबाडून तिचा लैंगिक छळ करायचा...



नवर्‍याला सोडून जावं तर माहेरी अठरा विश्व दारिद्र्य..अशा मायाजालात ती अडकलेली...



       हे सर्व ऐकून आम्ही सर्वांनी तिला सल्ला दिला " सरळ घटस्फोट घेऊन सोडून दे त्याला...हा दररोज चा त्रास तुला सहन होणार आहे का? 



तर तिने आम्हाला प्रश्न केला ह्या पाच मुलींना कसं सांभाळणार?



काही दिवस लोटले त्यानंतर अस कळालं की त्या व्यक्तीने ह्या स्त्रीला सोडून टाकल आणि जाताना सोबत तीन मुली घेऊन गेला..

 

        आज ती स्त्री दारोदारी जाऊन काम मागत आहे. कुठे भांडी घासते आहे तर कुठे विटा उचलण्याचं काम करत आहे...


तिच्या सोबतीला 3 वर्षाची एक मुलगी आणि दुसरी 5 वर्षाची एक मुलगी असे तिघे मिळून राहतात...अशा या पोटच्या गोळ्यांना ती घरी ठेवून कामावर जाते..



     सलाम अशा या स्त्रीला जी अशा खडतर संकटावर सुद्धा मात करून फक्त आपल्या मुलींसाठी जगत आहे. मुलगा हवा या अट्टाहासा मुळे त्या स्त्रीला हे दिवस पाहावे लागत आहेत...हे मात्र अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. 



      तिच्या नवर्‍या सारख्या नराधमांना ताळ्यावर आणणं हे आपल्या समाजाचं काम आहे आणि तितकंच सर्व स्त्रियांच सुद्धा...



न घाबरता, न डगमगता कायद्याचा उपयोग स्त्रियानी केला पाहिजे...




या स्त्रीने अजून थोडी हिम्मत दाखवली असती तर कदाचित तिचं भविष्य वेगळं असत..पण भारतीय स्त्री ही सोशिक आणि समाज काय म्हणेल याच कोंडीत अडकलेली आहे....


❤एका कवीचे खालील ओळी सर्व स्त्रियाना बळ देऊन जाईल हे नक्की...


कब सीखोगे तुम,स्त्री के, ना को ना समझना,

सब समझती हैं हम, नादान ना समझना।

अपनी इच्छाओं को तुम, हम पे थोप देते हो,

सँभलते नहीं बीज तुमसे,तो हम में रोप देते हो,

हम भी तो इंसान हैं, है जीने का हक़ हमें,

खुद को तुम हमारा, भगवान ना समझना।

जिस कोख से जन्मे, उसी से विश्वासघात किया,

सहा धरती सा हमने, तो हम पे वज्रपात किया,

जब चाहे तुम गरजे, जब चाहे तुम बरसे,

इन गुणों से खुद को, आसमान ना समझना।

स्त्री को जीत कर क्या, तुम पुरुष बन जाओगे

हमें रुला कर तुम क्या, महापुरुष कहलाओगे

अब न सहेंगी हम, तुम्हारे अत्याचारों को,

शैतान हो तुम, खुद को, इंसान ना समझना ।

पा न सकोगे कभी भी, हमारे हृदय की थाह तुम,

दी नहीं सजा हमने, तो करते रहे गुनाह तुम,

है हिम्मत अगर तो, स्त्री बनकर दिखलाओ,

स्त्री बनना पुरुष सा, आसान न समझना ।

कब सीखोगे तुम,स्त्री के, ना को ना समझना,

सब समझती हैं हम, नादान ना समझना


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama