STORYMIRROR

archana d

Tragedy Action Inspirational

3  

archana d

Tragedy Action Inspirational

ईगो

ईगो

2 mins
201

   एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता... त्याचा विचार होता की, एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे फस्त करावा... थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आले की, काही गिधाडे त्याच्यामागे लागली आहेत... 

   ती गिधाडे बघून तो कावळा घाबरला... त्याला वाटले की, ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्यामागे लागली आहेत... 

   त्या गिधाडांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला... पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही त्याला शक्य होईना...

   कावळ्याची चांगलीच दमछाक झाली... त्याला काही फार उंचावरून उडता येईना... एक गरूड ही गंमत बघत होता...

   शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा!... काय भानगड आहे?... तू एवढा घामाघुम का झाला आहेस?’... तो कावळा म्हणाला, ‘हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासून माझ्या मागे लागली आहेत... ती माझ्या जिवावर टपली आहेत... त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी अजून उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे’...

   कावळ्याचे हे बोलणे ऐकून तो गरूड म्हणाला, ‘अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्यामागे लागली आहेत... तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही... फेकून दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते’!...

   कावळ्याने त्याप्रमाणे केले... त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडून दिला... मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली...

   मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली...

   आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड "तुकडा" आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेऊन आपण जगत असतो... या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना!...

   आपण कोणीतरी खास आहोत... आपण फार हुशार किंवा बुद्धिमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते... आपण दादा आहोत... आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे... अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात... 

   आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रू अशा नावाखाली अनेकजण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात... अशाप्रकारे आपला "ईगो" कुरवाळत असतात... मग यासाठी शतृत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात, पण ज्यांना "ईगो" नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते, तेच उंच भरारी घेऊ शकतात...


 एकदा तरी आपला "ईगो" बाजुला ठेवा... त्याला विसरा... तो सोडून द्या... बघा काय चमत्कार होतो ते...!

   



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy