स्वादआस्वाद komal's kitchen's

Tragedy

4.0  

स्वादआस्वाद komal's kitchen's

Tragedy

# तिचं अस्तित्व....

# तिचं अस्तित्व....

5 mins
262


             माधुरी जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा साधी, सौज्वल, लाजरी अशीच मुलगी होती. कोणासमोर मान वर करुन बोलण्याची तिची हिम्मत होतं नव्हती. तिच्या माहेरीकडील परिस्थिती तशी बेताचीच पण खूप लाडाची होती ती. पण तिच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा सासरकडच्यानी फायदा घेतला होता. तरीही ती कोणालाही एक शब्द न बोलता सर्वानसाठी प्रेमाने आपुलकीने सर्व करत. सासूबाई तिला नाही तसं बोलून...तिचा पान उतारा करत. तरीही त्यांना आई आई म्हणून त्यांच्या पुढे मागे करत.


माधुरीच शिक्षण मुळातच कमी जेमतेम सातवी आठवी केलेली, त्यामुळे बाहेर पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. तरीही ती घरातील चोक कामे करत. सासूबाईना काही बोलण्यास चान्स देत नसे.तरीही सासूबाई काहींना काही कुरापती काढतच राहत .


एक दिवस माधुरीला बेसनाचे लाडू खूप खाण्याची इच्छा झाली होती. तिने ते करायला घेतले. घरातील लोण्याचं खमंग तूप तिने काढले होतें. त्या तुपाच्या वासानेच तिला लाडू करण्याचा मोह आवरला नाही. सासूबाई बाहेरुन येईपर्यंत तिचे लाडू वळायचे चालेले होतें. सासूबाई येताच त्यांना माधुरीने केलेला हा लाडुचा घाट पाहुण संतापल्याच, तुला काही कळतं का....? तूप काय तुझ्या घरून आणलं आहे का...? तुझी लाडू करण्याची हिम्मतच कशी झाली....! मला न विचारता तू केलंसच कसं...? माधुरी थरथर कापत होती. त्यांनी ते लाडू घेतले कपाटात ठेवून टाकले. त्या ते लाडू खात पण माधुरीला एक लाडू पुन्हा दाखवला नाही. पुन्हा तिने काही करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यादिवशी ती खूप रडली. तरीही ती सगळं विसरून सासूबाईंना आई आई म्हणून बोलायची.


माधुरीला तूप खूप आवडायचं. तुपातले कोणतेही पदार्थ तिच्या खूप आवडीचे होतें. त्यादिवसानंतर सासूबाईंनी ठेवलेला तुपाचा डबाही तिला दिसला नाही. सासूबाईंच्या नव्या स्वभावशी त्यादिवसापासून तिला ओळख झाली. तिला सर्व कळूनही न कळल्यासारखाच ती वागू लागली.


माधुरीला पुढे दोन जुळी मुले झाली. त्यांचं संगोपन करता करता दिवस कसे जायचे तिला समजायचं ही नाही. नवऱ्याचे दिनेशच तसं तिच्याकडे आणि मुलांकडे कमीच लक्ष...! कामामुळे तो सतत व्यस्त राहत.


आज तिला मन मारून सर्वांची मन जपून केलेल्या संसाराला वीस वर्ष झाली होती. या वीस वर्षात कितीतरी घडामोडी झालेल्या होत्या. माधुरीचा स्वभावात काढीचाही बदल मात्र नव्हता. यात सासूबाईंचा सहवास तुटलेला होता. त्या देवाघरी निघून गेल्या होत्या. त्याच्या एका सुटकेस मध्ये माधुरीला पत्र सापडले . ते ती पत्र अगदी मन लावून वाचत होती.


माधुरी तू खूप चांगली सून मिळालीस ग मला....!! पण मला तुझी आई कधीही बनता आलं नाही. तू या घरातील लोकांसाठी, घरासाठी खूप काही केलस, पण आम्हाला मात्र त्याबदल्यात तेवढंच प्रेम नाही देता आलं तुला....!! तुझ्या साधा स्वभावाचा खूप वाईट वाटायचं, पण तुला दाखवलं नाही कारण तू डोक्यावर चढून बसू नये म्हणून....! माधुरी पण तुला एक सांगायचंय की तुझा साधा स्वभाव बदल स्वतःसाठी जग... हे जग खूप स्वार्थी आहे ग . तुझी आई बनून सांगतेय. "बाळा आजारपणात माझ्यासाठी खूप काही केलंस. रात्र रात्र माझ्यासाठी जागायचीस. तुझ्या जाग्यावर कोणी असती तर, एवढं कोणीच केलं नसतं. माझ्याकडून तुला काही देता आलं नाही ग.. मला माफ कर माधुरी. पुन्हा सांगते," खंभीर हो जरा बाळा... ते तू केलेले बेसनाचे तुपातले लाडू, " तेव्हा मी तुझ्याशी जे वाईट वागले त्याचा मलाही खूप पच्छाताप झाला. मी तुपाचा डब्बा तुझ्यापासून लपवून ठेवला. आजारपणात मात्र तू मला तुपातले पदार्थ खाऊ घातलेस. खूप वाईट वागले ग तुझ्याशी....! त्यादिवसापासून तू तूप किंवा तुपाचे पदार्थ कधीच तोंडात घातलेला दिसलें नाहीत. "माफ कर मला...! पोरी मी खूप निर्दयी आहे. पत्र वाचून माधुरीच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. सासूला चूक खूप उशिरा समजली होती. तेव्हा वेळही निघून गेली होती. सासू गेल्यावर माधुरीचा नवरा दिनेश तिच्याशी चांगला वागत होता. दोन मुलं हाताखाली आली होती. लग्नासाठी स्थळ ही पाहायची चालली होती.


एक गरीब घरची सून माधुरीच्या हाताखाली आली. सुरवातीला खुप छान चाललं होतं. आरती म्हणजे नव्या नवरीची खूप हौसमौस केली. नंतर मात्र आरतीने तिचे गुण दाखवायला सुरुवात केलीच.


माधुरी शांत बसणारी तिच्या परिने आरतीला होईल तेवढी खूप मदत करायची.आरतीची मात्र कामाबद्दल अपेक्षा वाढू लागल्या होत्या. आरतीने एक दिवस बोलूनच दाखवलं,"मला नाही एवढ्या सगळ्याच करायला जमणार... तरीही माधुरी एक शब्द न बोलता निमूटपणे सगळी काम स्वतः करू लागली.


सून येऊनही तिला सगळी कामं करावी लागत. आरती निवांत उठत. तरीही तिला सासूने रूम मध्ये चहा नास्ता द्यावा हेही अपेक्षा होती. माधुरीचा नवरा दिनेश न राहून एकदा बोललाच, "आरती तुला कळतं का कशी वागतेस...? सुनेची कर्तव्य तू पार पाडलीच पाहिजे. सुनेने घर आणि घरातील लोकांची काळजी घेतली पाहिजे . मुलानेही म्हणजे अभयनेही वडिलांना साथ दिली. तुला कधी समजणार आरती...!!


पुढे दोघे शांत झाले. दिनेशला भूतकाळातील गोष्टी आठवल्या

माधुरीने केलेलं घरासाठी, घरातील लोकांसाठी सर्व त्याला आठवू लागलं. तिच्यासाठी साधं त्याच्याकडून तेवढं प्रेमही मिळालं नव्हतं. आपण किती चुकीचो वागलो याचा त्याला पच्छाताप होतं होता.


माधुरी ने मात्र कुटुंबाला तिच्या प्रेमानं बांधून ठेवलं होतं. तिला मात्र तशी सून मिळाली नव्हती.


दिनेशच्या (सासऱ्यांच्या) बोलण्याने, आरती शेवटी खजील झाली,आणि कामे करू लागली. तिच्या मनात सासूबद्दल राग, द्वेष होताच. तीही आता नवऱ्याने काही खायला आणले की, सर्वांपासून लपवून ठेवत. एकदा तुपाचा एक किलोचा डब्बा माधुरीच्या समोर मुलाने आणला होता, पण तो मात्र संध्याकाळी दिसेनसा झाला. त्यावेळेस ही माधुरी कोणालाही काही न बोलता शांत बसली.


आरतीला तशी छोट्या छोट्या गोष्टीवरून कांगवा करायची सवय होती. माधुरीलाही तिच्या स्वभावाचा कंटाळा आला होता. आरतीमध्ये जराही समजदारपणा नव्हता. माधुरीला मात्र सासू असून तिलाच समजून घ्यावं लागतं. आरती गरीब घरची समजदार असेल ,असं माधुरीला वाटलं होतं,पण हे उलटच झालं होतं. दिवसेनदिवस आरती सर्वांच्या नजरेतून उतरत चालली होती.


अभयला मात्र मनातून सतत वाटत,आरतीला कसला जाच, त्रास नसताना, किती ती निष्ठुरपणे वागते. आरतीला कितीवेळा तरी समजून घेतलं, तरी हिच्या स्वभावात काही फरक नाही. त्याला उलट तिच्याशी लग्न केल्याचा पच्छाताप वाटत होता.


अभय ने लग्नानंतर तिलाही हव्या तश्या साड्या, दागिने, ड्रेस नाही नाही ते तिला जे हवे ते हौसेन घेतले होतें, पण ही कधीच समाधानी नव्हती. सर्वांकडून हिच्या अपेक्षा जास्तच होत्या,पण ही मात्र कोणासाठी काहीच करायची नाही. सगळ्यांचा अपेक्षा भंग झाला होता तिच्याबाबतीत...!!


माधुरीला वयोमानानुसार दम्याचा त्रास सुरु झाला होता. एक दिवस आलेला दम्याचा अटॅकामध्ये माधुरी जग सोडून गेली. तिचा नवरा, मुलं खूप हळहळली. आरतीला मात्र त्याच काहीच गांभीर्य,दुःख नव्हतं.


माधुरीला जाऊन वर्ष होतं आलं होतं, एक दिवस आरतीने माधुरीचा कप्पा आवरायला घेतला. त्यात माधुरीच्या सासूने लिहिलेली चिट्टी आरतीच्या हाती लागली. ती चिठी वाचताना आरतीच्या डोळ्यात अश्रूंचा पाजर फुटला. सासूने किती हालअपेष्टा सोसल्या आहेत, तिच्या लक्षात आलं. ती किती निर्दयीपणे सासुशी वागली होती, याचाही तिला पच्छाताप झाला होता. पण वेळेबरोबर सासुही निघून गेली होती. त्यामुळे पच्छाताप करुनहीं काही उपयोग नव्हता. दोन दिवसांनी माधुरीच वर्षश्राद्ध होतं. तिला जाऊन वर्ष होतं आलं होतं.


सकाळी सकाळी आरतीने वर्षश्राद्धची तिच्या हाताने सर्व तयारी केली होती. जिवंतपनी तिच्याकडून काही झालं नव्हतं. ते पत्र वाचल्यामुळे तिच्यामध्ये फरक पडला होता.तिने आज सगळे गोड पदार्थ तुपातले केले होतें. माधुरीला तूप आणि तुपातले पदार्थ आवडायचे म्हणून...!! तिने जेवायला म्हणून तिच्याच नात्यातील नीताला बोलावले. सर्व जेवणाची तयारी झाली होती. तिने नीताला हळदी -कुंकवाचा मान देऊन जेवायला बसवले,आणि तिला तुपाचा वास आला..., तसं तिने तुपातले गोड पदार्थ सगळे काढून टाकले, कारण तूप तिला आवडत नव्हते, म्हणून तिने बिनतुपाचे पदार्थ खाऊन ती जेवण करुन निघून गेली. आज झालेल्या प्रकारामुळे आरती खूप रडली. शेवटी सासूने देवाघरी गेल्यानंतरही तिला माफ केलं नव्हतं.


जिवंतपणी नात्यांची जाणीव असेल तर पुन्हा पच्छातापची वेळ येत नाही.


लेख आवडल्यास लाईक, शेयर नक्की करा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy