ते दोघे - वेळच परीक्षा घेते तेव्हा
ते दोघे - वेळच परीक्षा घेते तेव्हा
सकाळी ५.४० ला अलार्मच्या आवाजाने आपल्या नंदूला साखरझोपेमधून जाग आली, जागेवरच उठून जांभई देत, आळस झटकून नेहमीप्रमाणे दोन्ही हाताची ओंजळी करून घेत तो म्हणत होता, “कराग्रे वसते लक्ष्मी : करमध्ये सरस्वती I करमुले तु गोविन्दं : प्रभाते करदर्शनम II“
आज स्वारी खूप खूश होती कारण कालच संध्याकाळी msg आला होता “SALARY is credited to you’re A/C Number : XXXXXXXXXXXXX ”. आता नंदूची दिनचर्या चालू झाली होती, नाश्ता करत असतानाच त्यानं बायकोला आवाज दिला आणि डब्यासोबत लसणाची तिखट चटणी देण्यासाठी सांगितले. चटणी नंदुला खूप आवडत असे.
नंदू म्हणजेच नंदकुमार धामणस्कर, राहणार मुंबई उपनगर, वय साधारण ३५ वषे, मध्यम बांधा आणि सतत हसतमुख चेहरा, मनमिळावू स्वभाव. आयटी-कंपनीमध्ये साधारण नोकरी करत असल्यामुळे वेळ आणि काम यामध्ये त्याला काटेकोरपणा (Performance) साभाळावा लागत असे. बाकी सर्वे मॅनेजर, कर्मचार्यांबरोबर संबंध हे मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे होते. तो आयटीमध्ये असल्यामुळे कधी कधी कामाचा ताण खुपच असायचा आणि तो त्याला सोसावा लागत असायचा. त्याच ऑफिसमध्ये राजेंद्र जोशी नावाचे सीनियर व्यक्ती होते, सर्वेजण त्यांना रघु साहेब म्हणून बोलवत असत, वयाने साधारण ४५ वषे असतील. ऑफिसमध्ये रघु साहेब सर्वे लोकाची खूप टिंगल टवाळी करत असत, त्यांचा हा स्वभाव नंदूला आवडत नव्हता. रघु ऑफिसमध्ये coding करायचे. आणि त्या कामासाठी नंदूला रघुकडे सतत जावे लागत असे. “तुझं नि माझं जमेना, तुझ्या वाचुन करमेना” असे दोघाचे संबंध होते.
आज नंदू ऑफिसला दुपारी जाणार होता, तसं त्याने त्याच्या बॉसला कळविले होतं. कारण तो मुलाच्या शाळेत फी भरण्यासाठी गेला होता. तसेच काही बँकेची कामेसुद्धा करणार होता. साधारण दुपारी ११.४५ च्या सुमारास नंदू बाहेरील सर्वे कामे आटोपून ऑफिसला निघण्यासाठी बँकेमधून बाहेर आला, ऑफिस आणि स्कूलमधील अंतर जवळच असल्यामुळे त्याने रिक्शा करून ऑफिसला जाण्याचे ठरवले. आणि रिक्शा करून ऑफिसला निघाला. आज त्याने बसने प्रवास करायला कंटाळा केला. वेळ दुपारची असल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी होती. रिक्शाने काही अंतर कापताच रोडचा सिग्नल चालू झाल्यामुळे त्याची रिक्शा रोडच्या सिग्नल जवळ थांबते. कारण त्याला उजवीकडे वळायचे असते. इतक्यात रोडच्या सिग्नल जवळ काही अनुचित प्रकार घडला. समोरुन एक जीप भरधाव वेगाने आली आणि सिग्नल तोडून ती उजवीकडेच निघून गेली. त्या जीपमध्ये साधारण ३ माणसे असावीत, असा अंदाज होता. त्या जीपच्या मागोमाग पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. हा प्रकार नंदू पाहत असतानाच, जीपमधील एका माणसाने गन- मशिन बाहेर काढून हवेमध्ये बेछूट गोळीबार सुरू केला.
नंदू ज्या ऑफिसमध्ये काम करत होता ते ऑफिस MIDC ठिकाणी होते, जेथे दिवसागणिक हजारो कामगार काम करतात. आणि नेमके त्याच दिशेने ती भरधाव वेगाने आलेली जीप आणि पोलिसाची गाडी गेली होती. आता पोलिस आणि जीपमध्ये असलेले अतिरेकी यांच्यामध्ये चकमक सुरू झाली होती. ही चकमक भर रस्त्यामध्ये चालू असताना, काही अंतरावर अतिरेक्याच्या जीपच्या टायरला गोळी लागून जीप पलटी होते आणि ते अतिरेकी जीप सोडून इतरत्र पळू लागतात.
रोडचा सिग्नल सुरू झाल्याने रिक्शा उजवीकडे वळून निघून गेली. आता काही वेळात नंदू ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्याने दुपारचं जेवण केल्यानंतर ऑफिसचे काम सुरू केले. काम खूप होते आणि काम करत असताना वेळ कशी निघून गेली ते नंदूला समजले नाही. संध्याकाळचे ६:३० झाले होते, ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. आणि आता सर्वे कर्मचारी हळूहळू काम संपवून घरी निघत होते. आता ऑफिसमध्ये फक्त नंदू आणी रघु त्यांची कामे करत होते.
नंदूने त्याचं काम पूर्ण करून तो रघुकडे झालेल्या कामाचे coding करण्यासाठी गेला आणि त्याने रघुला सर्व घटना सांगितली, जी दुपारी त्यानं पाहिली होती. आणि आता नंदू फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलेला असतो. तो छानपैकी तयार होऊन बाहेर येतो. आणि काही अंतर पावले चालून झाल्यावर लगेच अतिरेकी-३ त्याला धक्का देऊन जमीनीवर पाडतो. नंदूकडे गन-मशिन दाखवत त्याला लाथानी मारू लागतो. नंदू बिचारा, त्याला काही कळेनासे होते की नक्की काय चालू आहे. त्याला मार सहन होत नाही, आणि तो मोठ्यानं ओरडतो "आई गं !" आणि नंदू एकदम बेशुद्ध होतो. नंदुच्या आवाजाची तीव्रता एवढी असते, की त्याचा आवाज रघुच्या कानावर पडतो आणि रघु एकदम दचकतो.
नंदू हा बाथरूमकडे गेलेला असतो. आणि रघु एकटाच त्याच्या जागेवर बसुन coding करत असतो. कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत स्वतःचे काम करण्यात मग्न असतानाच अचानकपणे आलेला नंदूच्या किकाळीचा आवाज आणि त्यातच गोळीबाराचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो दचकून प्रचंड घाबरला, जागेवरूनच इतरत्र पाहत असतानाच अचानकपने त्याच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या खिडकीची काच गोळी लागून फुटली आणि त्या फुटणार्या काचेच्या आवाजाने रघु जमिनीवर कोसळला. खिडकी मोकळी झाल्याने आता रघुला बाहेर चालू असलेली पोलिसांची खबरदारीची सूचना कानावर पडते. काय करावे त्याला सुचत नाही. तो कावरा बावरा होतो आणि अशातच जमिनीवर सरकत सरकत तो टेबलच्या खाली जाऊन लपून बसतो.
रघु खूप घाबरलेल्या अवस्थेत असतो, घामाघुम झालेला असतो आणि तो निःस्तब्ध गुपचुप बसलेला असताना त्याच्या आसपास कोणीतरी चालत येत आहे, असा पावलांचा आवाज कानी पडतो. तोंडामधून आवाज निघू नये म्हणून रघु खिशामधून रूमाल बाहेर काढतो आणि तोंडामध्ये कोंबतो. त्याला रडू कोसळते, इतक्यात अतिरेकी-२ त्याच्या समोर उभा ठाकतो. रघु टेबलच्या खाली असल्यामुळे अतिरेकी-२ त्याला पाहू शकत नाही.पण रघु त्या अतिरेकी-२ ला पाहतो आणि त्याची गन-मशिन पाहून बेशुद्धच पडतो. काही वेळ निघून गेल्यानंतर रघुला जाग येते, आणि कळून चुकते की आता आपण काही वेळाचे पाहुणे आहोत. त्याच्यासमोर ”करो की मरो”, परिस्थिती असते. अचानक रघुला नंदूची आठवण येते, आणि तो नंदुला शोधण्यासाठी निघणार, इतक्यात त्याला समजते की आपल्याजवळ स्व-रंक्षनासाठी काही हत्यार नाही आहे. तो लगेच computer ला असलेले cod जमा करतो. ते एकत्र करून बांधतो. आणि स्व-रंक्षनासाठी हत्यार तयार करतो. स्वत:ची मनःस्थिती तयार करून घाबरत रघु उठतो, पावलाचा आवाज न करता तो बाथरूमच्या दिशेने निघतो,काहीअंतर चालून झाल्यावर पाहतो तर काय??
नंदू बाथरूम जवळच्या जमिनीवर पडलेला होता. रघु धावत जाणार इतक्यात त्याचं लक्ष बाजुच्या कोपर्याकडे जाते, आणि पाहतो तर काय?
कोपर्याकडे उभे असलेले ते तीनही अतिरेकी खूप गचाळ दिसत होते, चेहरापट्टी भारतीय वाटत नव्हती, केस पण व्यवस्थित नव्हते. अंगावर जॅकेट होती पण त्या जॅकेटमध्ये नक्कीच काहीतरी सामग्री असणार कारण जॅकेटचे खिसे भरलेले वाटत होते. हातामध्ये गन-मशीन आणि सुरे होते. ते अमली पदार्थ खाता खाता आपसात काहीतरी कुजबुज करत होते. त्यांची बोलीभाषा काही समजत नव्हती. तीनही अतिरेक्याचे चेहरे लालसर झाले होते, बहुतेक अती जास्त प्रमाणात त्यांनी अमली पदार्थ (Drug’s) घेतले असणार , आणि आता तर ते खूपच भयानक वाटत होते. माणुसकी हा प्रकार त्यांना ठावूक नसावा. ते चुकून आपल्या ऑफिसमध्ये आले का? असा विचार रघुच्या डोक्यामध्ये आला असताना साधारण ५ मिनीटामध्येच अतिरेकी-२ आणि अतिरेकी-३ हे बाहेर जाण्यासाठी निघाले, ते निघून गेल्यानंतर अतिरेकी-१ हा सुद्धा बाहेर जाण्यासाठी परत फिरतो आणि इतरत्र पाहत तो बाहेरच्या दिशेने निघून जात असतानाच नंदूचा फोनची रिंग मोठ्याने आवाज करते. फोनचा आवाज ऐकून अतिरेकी-१ सावध होतो. आणि आवाजाच्या दिशेने बेछूट गोळीबार करू लागतो. नंदू आहे तेथेच लपून बसतो आणि गोळीबाराच्या आवाजात आपला फोन जमिनीवरून समोरच्या दिशेने भिरकावून देतो. काही वेळात अतिरेकी-१ दबक्या पावलांनी दरवाज्याच्या बाहेर जातो.
आता रघु गुपचुप जागेवरुन बाहेर येतो आणि संथ पावलांनी दरवाज्याच्या दिशेने चालू लागतो. तिथेच काही अंतरावर नंदु पडलेला असतो. तो नंदूच्या जवळ जातो, हातामधील (स्व-रंक्षनासाठी हत्यार) cod खाली ठेवतो.आणि नंदुचे दोन्ही हात पकडून खेचत घेऊन जाणार, इतक्यात अतिरेकी-१ रघुच्या डोक्यावर गन ठेवतो, त्याला हात वर करण्यासाठी खुणावतो, त्याला तेथून हटण्यास हाताच्या इशार्याने सांगतो, त्याच्यावर हमला करणार इतक्यात एक चमत्कार होतो.
नंदु वीज चमकावी तसा जागेवरुन एका क्षणात उठतो. हातामध्ये जमीनीवर असलेली (स्व-रंक्षनासाठी हत्यार) cod उचलतो आणि अतिरेकी-१ च्या डोक्यावर मारतो. अतिरेकी-१ दोन्ही हातांनी डोके पकडत जमिनीवर कोसळतो आणि एकदम बेशुद्ध होतो. [ नंदुने मारलेला तो फटका इतका जबरदस्त होता, की त्याला असलेलं stress, tension, त्या फटक्यामधून बाहेर पडते.] आता नंदू थोडे मोठे श्वास घेऊ लागतो आणि आता तो स्वत:ला कंट्रोल करू पाहतो.
रघु नंदुला पटकन जाऊन मिठी मारतो. ते दोघे एकमेकांना धीर देत असतात, सांत्वन करत असतात. नंदू रघुला सांगतो की हाच तो माणूस होता जो जीपमधून रोडवर बेछूट गोळीबार करत होता, त्याला माहीत नव्हते की तो अतिरेकी आहे.
आता दोघेही त्या पडलेल्या अतिरेकी-१ चे हात पकडून त्याला जमिनीवर सरपटत स्टोर रूममध्ये घेऊन जातात, त्याचे हात आणि पाय बांधून तोंडामध्ये बोळे भरतात. तोंड आणि डोळे एका कापडाने बांधून घेतात आणि नंतर त्याच्याकडील सामान (गन-मशीन, ग्रेनेड) वेगळे करतात.
रघु नंदुला सांगतो की अजून दोन अतिरेकी लपून राहीले आहेत आणि बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर पोलिस आहेत. आता दोघांचेही धाबे दणाणले होते, आपण यामधून बाहेर कसं पडावं याचा ते विचार करत असताना एकदम दोन्ही अतिरेकी दरवाज्या जवळ येतात. दोन्ही अतिरेक्यांनी आपल्यावर हमला केला तर आपलाच जीव जायचा, या पेचात दोघेही असतानाच. रघुला एक युक्ती सुचते, तो गुपचूप फायरिगंची रिंगटोन पटकन डाऊनलोड करत असताना, नंदु संथ पावलांनी बॅग आणण्यासाठी त्याच्या जागेकडे जाऊ लागतो. काही वेळात रिंगटोन डाऊनलोड केल्यानंतर रघु मोठ्याने ती वाजवतो. आणि आवाज ऐकून दोन्ही अतिरेकी, आवाजाच्या दिशेने वळू लागतात. ते खूप जपून पावले टाकत असतात, खबरदारी घेत पुढे येत असतात. आता दोन्ही अतिरेकी दरवाज्याजवळ आलेले असताना, अतिरेकी-३ थोडा पुढे चालू लागतो आणि अतिरेकी-२ दरवाज्या जवळच थांबतो आणि मान फिरवून सगळीकडे पाहत असतो. दरवाज्या जवळच आडोश्याला लपून बसलेला नंदु, त्याच्या हातामध्ये असलेली तिखट लसणाची चटणी तो अतिरेकी-२ च्या डोळ्यावर फेकतो. अतिरेकी-२ ला ते सहन होत नाही. हातामध्ये असलेली गन-मशीन तो जमिनीवर फेकून दोन्ही हातांनी डोळे चोळत जोरात ओरडतो, इतक्यात नंदु त्याच्या रिकाम्या केलेल्या बॅगेने त्या अतिरेक्याचे तोंड झाकून घेतो आणि त्याचे पाय बांधू लागतो.
काही अंतर पुढे चालून गेलेला अतिरेकी-३, हा झालेल्या आवाजाने खूपच सावध झालेला असतो. तो ऑफिसमध्ये बेछूट गोळीबार करतो आणि सामानाची नासधुस करतो. आता मात्र तो खुपच संतापतो, कारण त्याच्या साथीदाराकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसतो. आता अतिरेकी-३ याला कसं पकडावं असा पेचप्रसंग तयार झाला आहे, नंदू आणि रघु एकमेकासमोर लपून बसून इशारा करत सांगत असतात. अशातच रघुच्या आसपास काही वायरचे तुकडे जमिनीवर पडलेले तो पाहतो [रघु स्टोररूमच्या बाहेर लपून बसलेला असतो] त्याला काहीतरी सुचते आणि तो तुकडे एकत्र जोडणी करुन थोडी लांब अशी वायर तयार करतो. आता वातावरण खुपच भीतीदायक झालेले असते. कारण अतिरेकी-३ अधाधुदी बेछूट गोळीबार करत असतो.
नंदू आणी रघु जागेवर ऊभे राहु शकत नव्हते कारण गोळी लागली तर? अनर्थ` होऊन जाईल आणि अशातच रघु जोडणी करुन तयार केलेली वायरचे एक टोक Switch Board मध्ये टाकतो आणि दुसरे टोक सरळ अतिरेकी-३ कडे भिरकावून देतो. समोरून काहीतरी येत आहे, हे पाहून अतिरेकी-३ एकदम सावध होतो, अचानक गन-मशीन जमिनीवर फेकून देतो आणि समोरून अंगावर येणारी वायर पटकन पकडून घेतो. आणि क्षणाचाही विलंब न करता रघु Switch Board चं बटन चालू करतो. वायर मधून वीजप्रवाह चालू झाल्यामुळे अतिरेकी-३ला जबरदस्त शॉक बसतो आणि तो जमिनीवर कोसळतो.
नंदु आता त्या अतिरेकी-३ जवळ जातो, त्याच्याकडील सामान (गन-मशीन, ग्रेनेड) वेगळे करतो. रघु Switch Board चं बटन बंद करून नंदुजवळ येतो. आता दोघेही अतिरेकी-३ चे हात पकडून त्याला जमिनीवर सरपटत स्टोररूममध्ये घेऊन जातात ,त्याचे हाथ आणि पाय बांधून तोंडामध्ये बोळे भरतात. तोंड आणि डोळे एका कापडाने बांधून घेतात.
दरवाज्या जवळ असलेल्या स्टोर रूममध्ये तीनही अतिरेकी बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात ते परत शुद्धीवर आले तर??
आता नंदू आणि रघु ऑफिसच्या खिडकीजवळ जातात, आणि ती उघडतात. बाहेर पाहतात तर काय ? खूप मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदूक ताणून उभे असतात. इतक्यात रघु ऑफिस केबिनमधील पडदा काढून घेऊन येतो आणि खिडकी जवळ जाऊन तो पोलिसाना इशारा देतो. इशारा समजताज पोलिस पटकन धावत येऊन अतिरेक्यांना ताब्यात घेतात. इकडे नंदू आणि रघु एकमेकांना घट्ट मिठी मारून खूप रडतात.
