STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

2  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

तारेवरची कसरत...

तारेवरची कसरत...

7 mins
225

आपल्याला निदान एक तरी अपत्य होणार...त्यामध्ये आपल्या शरीराची, मनाची खुपच गुंतवणूक होणाऱ..त्याला वाढवताना निदान पहिली चार तें पाच वर्ष तरी आपले करिअर मागे पडणार, याची मानसिक तयारी करूनच मुलींनी लग्न करावे....शिवराज गोर्ले यांच्या " सुजाण पालक व्हावे कसे???" या पुस्तका मधील हे वाक्य....


आई होणार ही बातमी मला समजली तेव्हा बरीच पुस्तक वाचली त्यातले हे एक....आणि त्यातून मला आलेले अनुभव, आजू बाजूला ऎकु येणारे अनुभव ह्या मधून मी थोडेसे लिहायचा प्रयत्न करते आहे...माझी मुले एवढी मोठी नाहीत की मी अगदी त्यांच्या अनुभवावरून लिहू शकेन....पण काही त्यांना घडवत असताना पालक म्हणून....तर काही मी घडत असताना बालक म्हणून आलेले अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत आहे...


नवीन लग्न होते....प्रत्येक जण निसर्गाचे ते गोड गुपित अनुभवतो....संसारात रमत जातो....आणि मग् गोड बातमी येते...चाहूल लागतें बाळाची....आपण आई होणाऱ ही भावनाच एवढी सुख देणारी असते...लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, बाळाच्या आगमनाची चाहूल... गर्भारपण... बाळाचा जन्म... आणि त्या नंतर येणार संगोपन हा प्रत्येक आईच्या आयुष्यात येणारा एक विलक्षण अनुभव असतो.... खर तर आई होणं सोपं आहे पण आईपण येणे फार अवघड...कारण आईपण अंशतः अनुभवता येतं नाही ते पूर्णपणे निभवायला लागतें.....


खरंच आपण आई झालो की आपले अख्खं जग मुलां पासून सुरू होते...आणि त्यांच्या पाशी येऊन थांबते.....आपण कोणत्याच गोष्टीत त्यांना वगळून शकत नाही किंवा विसरू शकतं नाही... आता ह्या मातॄत्वाच्या उंबरठ्यावर असताना, आपल्या मनात नेहमीच येत असते...एक मूल बसं की जोडीला हवे....अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे....


कोणी म्हणते एक मूल हट्टी होते...सोबत ही हवी नाहीतर एकटे पडते....पण असे कॊणी म्हणते म्हणून नाही, तर आपण खरच उत्‍सुक आहोत का??? आपण खरच दुसऱ्या मुलाला तेवढा वेळ देऊ शकतो का??? असा विचार बाबां पेक्षा जास्त आईला करावाच लागतो... अजूनही काही ठिकाणी वंशाचा दिवा हवा म्हणून चान्स घेणारे आहेत, तर काही ठिकाणी मुलगा असला तरी मुलीची हौस पूर्ण करण्यासाठी चान्स घेणारे पण आहेत....मुळात ह्या गोष्टी आपल्या हातांत नाहीत त्यामुळे खरच त्यासाठी सेकंड चान्स घेणे...किंवा त्या पेक्षाही जास्त घेणे कितपत योग्य आहे.....


त्यामुळे आई होताना प्रत्येक स्त्री ने याचा विचार करायला हवा.....कारण हि एक न संपणारी जबाबदारी आहे....आणि ती पार पाडत असताना आपल्याला एक आई म्हणून स्वतःच्या ambitions आणि त्यातून आपली होणारी प्रगती याचा त्याग थोडी वर्षे तरी करावा लागतो....जबाबदार पालक होण्यासाठी एक सुशिक्षित व्यक्ती असणे आवश्यक आहे , वेगवेगळ्या फील्ड मधून पदवी घेतलेले हे पालक ती पदवी मिळावी म्हणून चार तें सहा वर्षे शिक्षण घेतात...तेव्हा ती मिळते आणि मग् अनुभव मिळतो...पण कोणतेच शिक्षण न घेता, पालक होण्याचा अनुभव मात्र सगळ्यांना मिळतो आणि इथेच चुकते...


"लहान मूल म्हणजे माती चा गोळा.... आकार द्यावा तशी मूर्ती घडते...हे प्रा. वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते त्यामध्ये असलेले वाक्य.... पण खरच हल्ली बदलत असलेली हि पिढी....खरच या मातीला आकार द्यायला पालकवर्गाला खरच वेळ आहे का.... बाळ थोडे मोठे होताच त्याला daycare ला ठेवून आईला ऑफिस जॉइन कराव लागते...तेव्हा तीच्या मनाची काय अवस्था होत असेल ते तिचे तिलाच माहिती..


बर घरी असल्यावर सुद्धा आईला असंख्य जबाबदारी असते.... बाळाला घेऊन काम करणे खरच अवघड जात असते.... त्यात उपदेश देणारे एवढे असतात....बाळ हातांत दिसले की सुचना द्यायला एवढे जण पुढे येतात पण एक जण म्हणत नाही की त्याला मी सांभाळेन....तुझी काही काम असतिल तर करून घे.....


बाळ लहान असताना त्याच्या सर्व वेळा सांभाळत, सगळयांचं सगळे करत असते, बाळ आजारी पडल्यावर होणारी जागरण, स्तनपान सोडवायला होणारा त्रास तरीही,घर, बाळ याना सांभाळून ही कसरत प्रत्येक आई अगदी छान सांभाळत असते.... नवीन असताना, त्यात तिची पहिली वेळ असेल तर ती गोंधळून जाते....एकतर रडणार बाळ आणि सुचना देणारी तोंड....


त्यातून पडत....धडपडत ती आई म्हणून घडत जाते....आणि त्या मातीच्या गोळ्याला चांगला आकार द्यायचा प्रयत्न करत असते ती..... हळू हळू बाळ मोठे होत जाते....तरीही आई त्याच सर्वस्व असते....जास्त वेळ तें आई सोबत घालवत असते....त्यामुळे तसे आईला सोडून बाळ जास्त रहात नाही... आई दिसली नाही तर रडायला येते...आणि त्याच्या रडण्याची भाषा आईला जास्त कळत असते....त्याचे बोलणे, चालणे, प्रत्येक महिन्यात होणारे बदल आई साठी अगदी आनंद देणार असतात....कितीही दमली असली तरी बाळाचे हसणे, त्याने प्रेमाने धरून ठेवलेला हात, आई दिसली की दुडूदुडु येऊन आईला मिठी मारणार बाळ तीचा थकवा लगेच पळून जातो...


आता हळूहळू आईला त्याच्या मनाची या साठी तयारी करून घ्यावी लागतें....घरात असेपर्यंत खेळ, झोप, भूक एवढेच त्याचे रुटीन असते.... खरच रम्य ते बालपण...खूप सुखद काळ असतो...पण मोठे झाले की शाळेत जायची वेळ येते....रडारड सुरू असते, आईला सोडून जायचे नसते....खर तर हल्ली खूप लहान मुल असल्यापासून शाळा सुरू होते.... ह्यावरसुद्धा प्रत्येक पालकाचे वेगळे मत असते....कॊणी मूल मागे पडू नये म्हणून, तर कॊणी स्वतःला वेळ नाही तेवढा म्हणून शाळेत पाठवतात. प्रत्येकाचे कारण वेगळे....तर काही पालक लहान म्हणून मुलांना नाही पाठवत लवकर शाळेत....व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणता येईल या बाबतीत...


सर्व माझे, आई माझी , खेळणं, प्रत्येकाकडून होणाऱ कौतुक...आणि पूर्ण केले जाणारे लाड....यामुळे ते बाळ अगदी त्याच्या भावविश्वात असते....आणि अचानक कोणी तरी म्हणते...आता एखादे बाळ आणायला सांग आईला..तुझ्या सोबत खेळायला....बोलणार माणूस सहजच बोलून जाते...आणि आईला एक टेन्शन देऊन जाते...जर त्यांचा विचार नसेल सेकंड चान्स घेण्याचा तरी समजुत कशी घालू याची आणि असेल तर कस होईल याचा...? लहान भावंड घरात यायच्या आधी मोठ्या मुलाच्या विश्वात तो एकटाच असतो...आणि आई बाबा सार काही त्याचे एकट्याचे...त्यात त्याचं प्रेम म्हणजे मुलासाठी 'सूर्यप्रकाश' असतो.शिवराज गोर्ले यांच्या पुस्तका मधील हे वाक्य....


मला जेव्हा दुसरे मूल झाले तेव्हा मला अनुभव आला या गोष्टीचा.....पहिले मूल खूप पझेसिव होते आईच्या बाबतीत.... दुसरे मूल हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे... ज्यांना दुसरा चान्स घ्यायचा असतो त्यांना मात्र या दिव्यातून जावेच लागतें... हो दिव्यच कारण...मोठ्या मुलांचे मन सांभाळत त्याला   येणार्या लहान बाळाला आपलेसे करायला शिकवावे लागतें.... आणि त्यांच्या मनाची तयारी करून घ्यावी लागतें...अर्थात आताची प्रत्येक आई तें करत असते...आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तें करावे....जुने लोकं म्हणतात...कसले बालमानस शास्त्र ??? आमच्या वेळेस नव्हते असे काही....पण आताची पिढी तशी नाही त्यामुळे तयारी करून घ्यावी लागतें....


पल्लवी एक चांगली शिकलेली गृहीणी, दुसरे मूल आल्यावर सारखे पहिल्या मुलाला, त्याला हात लावू नको, रडवू नको, तू लहान आहेस का???असे बोलायची....मोठे मूल बिचारे लहान बाळाचे कुतूहल म्हणून जवळ जाई....तीचं बोलणे ही चुकीचं नव्हते पण सांगण्याची पद्धत चुकीची होती....त्यामुळे मोठे मूल बाळाचा राग करू लागले, त्याला वाटे बाळ आले म्हणून आई असे करते... या उलट अनु, तिला एक मुलगी होती, तिला बाळ खूप आवडतं असे... तीच्या शेजारी असलेल्या काकू ला, तीच्या आत्याला बाळ झाल्यावर सारखी म्हणायची मला पण बाळ हवे खेळायला...आणि अनु ने सांगितले तिला की आता आपल्या कडे पण बाळ येणार....मग् तिचे प्रश्न सुरू झाले,बाळ कसे आले?पोटात कसे गेलेn??? पण अनु प्रत्येक प्रश्नाला खूप शांतपणे आणि छान उत्तर देत होती...


अनु तिला म्हणाली, हे बघ तूला बाळ हव होते ना म्हणून बाप्पा माझ्या पोटात देऊन गेला...आता तू ताई होणार की नाही...मग् शहाणी मुलगी म्हणून वागायचं....आणि हो बाळ आल्यावर आई बाळाला घेईल, त्याला भरवायला, त्याचे शी,शु बघायचे असेल आईला अशा वेळेस कधी कधी तुझ्या गोष्टी तुलाच कराव्या लागतील...तेव्हा आई आई करून रडायचं नाही....छोटी अगदी सगळं शांत ऐकत होती....जणू काही तिला सारं समजत होते... पण ह्याचा परिणाम अगदी दिसून आला बाळ झाल्यावर...खूप शहाणी वागत होती...मोठी झाल्या सारखी..... अशी वेगवेगळी उदाहरण आपण आजू बाजूला बघत असतो....आपल्या समजावून सांगण्या वर सर्व असते...आणि ह्या मध्ये फ़क्त आई नाही तर घरातील सर्व व्यक्तींचा सहभाग महत्वाचा असतो.....


कोणी जवळच म्हणून बघायला येते, आणि म्हणते आता आई बाळाचं करणार, त्यालाच घेणार,चला आता बाळ आले आता तू नको आम्हाला....पण त्याची ही गंमत त्या बालमनावर किती परिणाम करते...याचा विचार ती व्यक्ती करत नाही.... कधीतरी गडबडीत आई असते, आणि दोन मुले असतिल तर त्यांच्या मध्ये भांडण होतात....मग् घाई घाईत आई मोठ्या मुलाला ओरडते...तिचे म्हणणे असते तू मोठा आहेस तूला सांगून कळंत मग् तू ऐक....अशा वेळेस तिथे असणार कोणीही मग् आजी असो, आजोबा असो लाड पूर्ण करणारे मावशी, आत्या ,काका असो, ते पटकन म्हणतात ह्या छोट्यामुळे ना नेहमीं तुलाच ओरडा मिळतो....हे एक वाक्य त्या मुलाच्या मनात लहानाबद्दल द्वेष निर्मांण करते...आणि ते त्याला शत्रू मानू लागतें....


त्यात अजून अशी उदाहरण पण असतात...कि मुलगी असेल तर तूला भाऊ येणार, मुलगा असेल तर आता बहिण येणार...असे बोलतात...आणि उलट झाले तर आईला- बाबांना घरातल्या सगळ्यांना किती त्रास होतो समजूत काढताना.... आई आपल्या दोन्ही मुलाना ओळखत असते, पण तरीही तिची अपेक्षा ही मोठ्या कडून असते....आणि हे त्या सगळ्यांनी जर त्याला गोड शब्दात समजावले तर.... तू मोठा आहेस ना मग् आई नसली की तूच त्याची आई होऊन समजून घ्यायचं...


साधारण दुसरे मूल येई पर्यंत पहिले मूल हे ३-४ वर्षांचे झाले असते...त्यामुळे त्याला पण कळंत असते थोडे थोडे...एकाएकी आईचा सहवास कमी झाल्यामुळे थोडे एकटे पडते तें...पण सगळ्यांनी असे उलट सुलट बोलण्या पेक्षा समजावून सांगितलं तर नक्कीच यातून बाहेर पडते...त्यांच्यावर जर लहान बाळाच्या कामाची थोडी जबाबदारी टाकली आणि तें केल्यावर जर थोडे कौतुक केले ना....म्हणजे, बाळाची ताई किंवा दादा किती करतो बघ बाळा साठी....असे म्हंटले तर नक्कीच तें त्याला प्रेमाने वागवतात... त्यामुळे येणाऱ्या भावंडाचे मोठे मूल हे स्वागत करेल की मत्सर हे आपल्या मोठ्या माणसांच्या वागण्यावर अवलंबून असते हे मात्र नक्की.....


मुले म्हणजे देवाघरची फुले कौतुकाने ती फुलत जातात...पण हेच अती कौतुक झाले तर...


यासाठीच बघू या पालकत्वाचा पुढचा टप्पा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational