Sanjay Raghunath Sonawane

Inspirational


2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational


स्वप्नातीलभारत : प्रकाशमय भारत

स्वप्नातीलभारत : प्रकाशमय भारत

2 mins 9.8K 2 mins 9.8K

भारत हा खेड्यांचा, शहरांचा अखंड देश आहेत.जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे.शिक्षण हे त्याचे अस्त्र आहे. त्याच्या जोरावर तो जगाच्या कानाकोपर्यात पोहचला आहे. वीज, पाणी ह्या अत्यावश्यक सेवा आहेत. त्या भारतातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम शासन पातळीवरून जोरात चालू आहे. पण त्याला आपल्या समाजबांधवांकडून योग्य प्रतिसाद मिळाला, सहकार्य मिळाले तर अंधारात दिव्यावर रात्र काढणाऱ्या माणसाना न्याय मिळेल. त्यांच्या परिवारातील आनंद नक्कीच आपल्या देशाची ताकद वाढवेल.

यासाठी आपल्याला शक्य होईल तेव्हढी वीज बचत केली पाहिजे. खेड्यापर्यंत वीज पोहचल्यास डिजिटल भारताचे स्वप्न पूर्ण होईल. चांगल्या दर्जाचे शिक्षण दुर्मिळ, डोंगराळ, आदिवासी पाडयापर्यंत पोहचेल. कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांचे दिवस चांगले येतील. भारतातील टाटा सारखे उदयोगपती NGO च्या माध्यमातून वीज बचतीच्या संदर्भात शाळेत, कॉलेजात स्वखर्चाने कार्यक्रम राबवत आहे. समाजाने अशा कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. वीज चोरीला आळा बसला पाहिजे. गरज नसेल तेव्हा वीज बंद करून आपल्या समाज बांधवांसाठी सहकार्य करा. वीज बचत काळाची गरज आहे. वीज प्रकल्पाला लोकांनी सहकार्य केले पाहिजे. चांगल्या गोष्टीला विरोध करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये.

प्रत्येक, खेडी, शहरे प्रकाशमय झाली पाहिजे. उदयोग धंद्याला चालना देवून त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. वीज प्रकल्प राबवणाऱ्या कंपन्याना शासनाकडून प्रोहत्साहन व संरक्षण मिळाले पाहिजे. नाम सारखी NGO पाण्यासाठी उत्तम कार्य करत आहेत .तसेच सहकार्य वीज बचत मोहीम भारतात राबवून मी भारतीय आहे ते माझे कर्तव्य आहे असे समजून कार्य हाती घेतले तर शक्य आहे. यात श्रेय, मान, सन्मान ह्या गोष्टीला थारा देवू नये. सयंम, नम्रता हया यशस्वी जीवनाच्या गुरू किल्ल्या आहेत.हीच खरी समाजसेवा आहे. हे कार्य आपण आपल्या कुटुंबापासून करून देशसेवा केल्याचे समाधान प्राप्त करू शकतो.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi story from Inspirational