स्वकमाई
स्वकमाई
एकदा लोकलमधून उतरले आणि समोरच्या स्टॉलवर बिस्किटचा पुडा घ्यावा म्हणून स्टॉलजवळ गेले असताना एक लहान मुलगा आला. म्हणाला "ताई भूक लागली आहे...मला काही खायला घेऊन द्या ना". मी माझ्या हातातला बिस्किटचा पुडा त्याला दिला. त्याने लगेच मला १० रुपयांची नोट पुढे केली. मी म्हटलं राहू देत तर म्हणाला "नाही...घ्या तुम्ही...मी हे स्वतः कमावले आहेत". क्षणभर मी नि:शब्द झाले. खेळण्या-बागडण्याच्या या वयात आपल्याला स्वकमाई काय असते हे ठाऊकदेखील नव्हतं. तर या मुलाने स्वकमाईचं मोल जाणलं होतं शिवाय एका वेळेच्या अन्नाची भ्रांत असताना देखील एका बिस्किटच्या पुड्यासाठी मात्र प्रामाणिकपणा दाखवला होता.
