Deepali Mathane

Tragedy Inspirational

4.5  

Deepali Mathane

Tragedy Inspirational

स्वानुभव:--झुंज

स्वानुभव:--झुंज

6 mins
269


माझ्या आयुष्यातील असा प्रसंग ज्याने मला मरतामरता दिलखुलास जगणं शिकवलं.........माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीपासूनच खूप जास्त सकारात्मक आहे. मी कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाही. मला अस वाटतं *येणारी वेळ ही कशी येईल सांगता येत नाही.तेव्हा प्रत्येक क्षणाचा आनंद प्रत्येकाने मनमुरादपणे घ्यावा.हेवेदावे विसरून सारे जगण्याला श्वास द्यावा* 

असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेला मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे.

2016 जानेवारी मध्ये अकोल्याला लहान मुलांसाठी डान्सच्या ऑडिशन होत्या. त्यात पार्टीसिपेट करण्यासाठी मी माझ्या लहान मुलाला म्हणजे प्रांजलला घेऊन गेली. तो खूप छान डान्स करतो. मला मुळातच सगळ्या गोष्टींची आवड. आणि तीच आवड मला त्यात दिसत होती. त्याची ती आवड आणि कलागुण ओळखून मी त्याला तिथे घेऊन गेले. अर्थातच घरच्यांचा विरोध पत्करूनच.

*कारण माझ अस मत आहे की, माणसाला आयुष्यात एकदाच संधी मिळते आणि चालून आलेल्या संधीच सोनं करायचं की माती हे ज्याच त्यानी ठरवायचं. आपण मात्र कायम आपले प्रयत्न चालू ठेवायचे.* असो!

      कोरिओग्राफर ABCD2 , सुपर डान्सर फेम वैभव घुगे, मनोज जाधव तिथे जजिंगसाठी आले होते.प्रांजलच सेकन्ड राऊंड साठी सिलेक्शन झालं. नागपूरला राऊंड असल्याने रिझर्व्हेशन केलं. पहाटे चारच्या गरिबरथचं. त्यात माझा मोठा मुलगा दहावीला होता. माझे सासरे आणि तो घरी म्हणून पहाटे तीनला उठले. आणि त्यांच्या साठी पावभाजीचा बेत बनवला. सगळ आटोपून वॉशरूमला गेली आणि मला जाणवल की मला चक्कर येत आहेत. मी यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला पण आवाज गेला नाही. मी चक्कर येऊन खाली कोसळले. नाकातोंडातून रक्त वहात अगदी वॉशिंग एरियापर्यंत आल होत यांना वाटल एवढा वेळ झाला ही अजून आली कशी नाही म्हणून बघायला आले तर मी रक्तबंबाळ पडलेली. यांची तर बोबडीच वळली. यांनी मला उचलून उभ केलं. मी शुध्दीवर आली आणि चेहऱ्यावर हात फिरवला तर मला झाला प्रकार लक्षात आला. यांना म्हटलं काळजी नका करू मी ठिक आहे. घरात येताच आरशात बघितलं तर नाकाच हाड तुटलेलं दिसलं. नाक तिरपं दिसत होतं. यांना काहीच सुचत नव्हते. बोलणं पण क्लिअर ऐकू येत नव्हते यांचे. मग मी माझ्या जाऊकडचा मो. नं. यांना तोंडी सांगितला. कारण यांचामोबाईल नवीन होता त्यामुळे त्यात.नं. सेव्ह नव्हता. माझ माहेर गावात आहे तर माझ्या भावालाआशिषला पण फोन करून लगेच बोलवलं. तो अशा परिस्थितीत माझ्या जवळ जरी असलान तरी खूप धीर येतो मला. माझ्यापेक्षा लहान आहे तो पण अगदी माझी आईसारखी काळजी करतो.I love him so muchत्यात त्याची बायको प्रेग्नंट. तिला आठवा महीना. माझी आई आजोबा वारले होते तर तीच्या माहेरी गेलेली.अस सगळं म्हणजे *दुष्काळात तेरावा महीना..........असो!* मग म्हटल मला डॉ. ........यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. सगळे नाही म्हणत होते.म्हणजे दुसऱ्या डॉ. कडे जाऊ असं. पण मी जरा चिडूनच म्हटलं मला ट्रॉमा सेंटरला न्या पटकन. मला माझी सिच्युएशन कळत होती. हॉस्पीटलमध्ये गेल्यावर मला लगेच ऍडमिट करून घेण्यात आले.मग डॉ. आले लगेच त्यांनी तपासणी केली.पटापट ट्रिटमेंट सुरू झाली.

   कपाळ आणि संपूर्ण चेहरा खूप सुजून गेला होता. डोळे काळेनिळे झाले होते. डोळ्यांच्या व्हेन्स damage झाल्या होत्या. घशाला पण मार असल्याने बोलायला नव्हते सांगितले. बी.पी. खूप हाय झाले होते. डॉ. यांच्याशी बाहेर बोलत होते की कन्डिशन खूप क्रिटीकल आहे. आणि त्यांनी 48 तास सांगितले. हे रडायला लागले. माझ लक्ष होत मी सरांना म्हटलं माझी कन्डिशन मला कळतेय तुम्ही मला सांगा. मी घाबरत नाही कशालाच आणि मी सांभाळू शकते स्वतःला. 

    इकडे मुलाची प्रॅक्टिकल सुरू होते. तो शाळेतून मला भेटायला दवाखान्यात आला.तो मला बघून खूप रडला. खूप हळवा आहे तो. म्हणे मम्मी तुला काय झाल तुझा चेहरा. मग तो घरी गेला. मला वाटलच हा टेन्शन घेईल. तर घरी मी फोन केला तर रागवून विचारल्यावर माझ्या भावजयीनी सांगितले की ताई तो खूप रडत आहे. तिला म्हटलं त्याला फोन दे. त्याला म्हटल *मला काहीही झालेल नाही तू बाऊ करू नकोस अभ्यासाकडे लक्ष दे. तू म्हणत असशील तर मी घरी येते.* खूप रागावून बोलली मी. आणि म्हटल मला भेटायला पण यायच नाही. झाल हॉस्पिटलमध्ये एक-एक दिवस जात होता. माझा भाऊ आणि हे सतत माझी खूप काळजी घेत होते. ओके झाल्यावर घरी आली छान फ्रेश झाली. कारण मला ऑलवेज फ्रेश रहायला आवडतं उगाच चेहरा लटकून आणि मला कुणीही बिचारी म्हटलेल आवडत नाही मला. माझ्या भावजयीनी म्हणजे नंदीनीनी केलेला गरमागरम स्वयंपाक जेवली आणि झोपली तर मला कन्टिन्यू चक्कर येऊ लागले. अगदी थोडी पण हालचाल सहन नव्हती होत. परत नेऊन ऍडमिट केलं. मग तीन दिवसानंतर परत सुट्टी मिळाली घरी आली. डॉ. नी दोन वर्षे मेडिसीन घेण्याचा सल्ला दिला. मेंदूला मार असल्याने तसेच छातीला, पासोळीला खूप मुका मार होता. मान तर सहा महीने पर्यंत मागे जातच नव्हती.पण मी घरी आल्यावर नंदीनीला आणि माझ्या आईला म्हटल मला माझी सगळी काम करू द्या. तुम्ही आहे सगळे मला सांभाळायला. बघा मला कुठे प्रॉब्लेम येतो तर पण माझी काम मीच करणार.आई बडबड करायची आम्ही असताना तू करतेयस लोक काय म्हणतील?........... तिला म्हटलं *माझ मुलगा दहावीला आहे.तुम्ही सगळे असल्याने भेटायला येणारे सुरू असतात. तुमच्या मुळे ते जास्त बसतात. तेव्हा मला लवकर बर करून तुम्ही सगळे तुमच्या घरी जा. लोकांना माहीतीय हिला जास्त बोलायला सांगितले नाही तर ते जास्त बसणारच नाही. आणि शेवटी काय गं ज्याच त्यालाच सांभाळाव लागतं लोक येतील का मला घर कामात मदतीला.*........... .. आई माझ्याकडे अवाक होऊन बघतच राहीली पण वेळच तशी होतीन. भावनेच्या आहारी जाऊन वेळ दवडण्यात अर्थच नव्हता. पाच-सहा दिवसात मी सगळ छान करायला लागली आणि आई हळव्यामनाने घरी गेली. तिच्या भावनासमजत होत्या पण...............असो !परिमलचा रिझल्ट छान लागला त्याला 92% मार्क्स मिळाले. मी अगदी भरून पावले. कारण माझ्यामुळे माझ्या मुलाच नुकसान झाल असतं तर ................ही कल्पनाच मला सहन नसती झाली.सगळं छान सुरू आहे.असो! 

    आणि मग मी तीन महीने औषध घेतले. योगा-प्राणायाम सुरू केले. *ओंकारवर सगळ्यात जास्त भर दिला.* आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर आहे. मी Handwriting चे क्लासेस घेत होती. टिचरचा जॉब करत होती. पण डॉ. नी मनाई केल्यामुळे सगळं सोडाव लागल. मला रिकाम बसवत नाही अस म्हणा किंवा काहीतरी करण्याची जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती. यांना म्हटल छान बिझनेस करते साड्यांचा. तर हे बोलले की, "कोण येईल एवढ्या कोपऱ्यात साड्या घ्यायला?....  ... आणि गल्लोगल्ली साड्यांची दुकाने आहेत." मग मी म्हटलं मी स्पेशल फक्त जरीकाठी, प्युअरसिल्क, पैठणी अशाच साड्या ठेवते. ते नाही म्हणतच राहीले. म्हणे मस्त खा,पी आणि आराम कर. पण मग शेवटच ब्रम्हास्त्र काढलं जेवलीच नाही दोन दिवस म्हटल, "मी अशी जगूच शकत नाही. मी दोन महीन्यातून एक जरी पीस विकला तरी मला satisfation राहील की मी काहीतरी करतेय." मग आणला पैठण्यांचा माल आणि सुरू केला बिझनेस. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. *दीपाली पैठणी* आज अकोल्यात एक Brand आहे.

  हे लिहीण्यामागे माझा एकच उद्देश की, *परिस्थिती कशीही असो आपण विचलीत न होता जर पॉझिटिव्ह attitudeठेवला तर मोठ्यात मोठ्या संकटातून सहज बाहेर येऊ शकतो आणि मला तरी अस वाटते की, आयुष्यातली संकट ही माणसाला कणखरपणा आणि जगण्याची नवी द्रुष्टीच देऊन जातात. मी पण यातून एक धडा घेतला की, कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाही तेव्हा आपली आवड, येणारा आनंदाचा प्रत्येक क्षण अगदी आपल्याच आयुष्यात सप्त रंगाची उधळण करत आपणच आपल्या आयुष्यात रंग भरत जगायचा. हेवेदावे, बोलाचाली याच्याही पार आयुष्य आहे आणि ते कुणाच्याही वाईट अनुभवांनी वाया घालवायच नाही. कारण तुम्हाला लाभलेल्या किंवा झालेल्या मनस्तापाने कुणालाही तसूभरही फरक पडत नसतो. आज मी माझी प्रत्येक आवड गाणे, डान्स, लिखाण, रांगोळी, स्केचिंग तसेच विविध खाद्यपदार्थ बनवण्याची मला विलक्षण आवड आहे. तसेच छान छान अनुभव आणि कविता लिहीण्याची पण मला खूप आवड आहे. अनेक स्पर्धेत क्रमांक पटकावले आहेत आणि हा प्रवास उशीरा का होईना पण आजतागायत सुरू आहे आणि राहणार. सगळ्या माझ्या आवडी मी वेळातवेळ काढून जपते. अर्थातच यासाठी मी माझ्या कुठल्याच जबाबदाऱ्या नाकारत नाही. आज मी वाईस प्रिन्सिपल म्हणून जाग्रुती किड्स कॉन्व्हेंट ला जॉईन आहे.अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते की, आपण जसा विचार करू न तसच आपल्या आयुष्यात घडत असतं. माझ लग्न फर्स्ट ईयरला असतांनाच झाल होत. शिक्षणाची आवड खूप होती पण सासरी एवढा सपोर्ट मिळाला नाही तरी मनात कुठेतरी सुप्त ईच्छा होती शिक्षणाची आणि तसच घडलं लग्नानंतर दहा वर्षांनी मिस्टरांनी शिक्षणाला परवानगी दिली. डि.एड.केल ते पण मेरीटमध्ये. आणि भारतीय समाज आणि शिक्षण याविषयात बोर्डात प्रथम आले होते. तेव्हा नेहमी सकारात्मक रहा. संकट ही येणारच त्याला हसत सामोरे जा तुमच जास्त नुकसान होणार नाही. हा सुंदर जन्म पून्हा नाही. तेव्हा आपल्या आवडी-निवडी अवश्य जपा आयुष्यभर............. अशावेळी मला माझ्या आवडत्या गाण्याच्या ओळी आठवतात "तुफान तो आना है आकर चले जाना है......बादल है ये कुछ पलका छाकर ढल जाना है"* अस आहे मग सगळं आणि तुम्हाला वाटते गम्मत...........खूप काही आहे लिहिण्यासारखं !.............पण असो! *हसत रहा, मस्त रहा,जीवनाच्या वाटेवरती हास्यफुलांचा सडा शिंपत रहा


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy