Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Bhavesh Lokhande

Romance Tragedy Others

3  

Bhavesh Lokhande

Romance Tragedy Others

सुटका

सुटका

4 mins
203


अंगावरला गाऊन जरासा सैल करत तिने आरामखुर्चीवर स्वतःला झोकून दिले, डोळे मिटून एक खोल श्वास घेतला व थोडावेळ तसाच रोखून धरला. मेंदूला होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला तसे डोक्यात माजलेले विचारांचे काहूर थोड्यावेळात कमी झाले. एक मोठा उच्छवास नाकातोंडातून बाहेर पडला. डोळे किलकिले करत तिने सभोवताली नजर टाकली. तिचे डोळे अश्रुनी डबडबले होते. या घरात गेल्या कित्येक वर्षांच्या आठवणी विखुरल्या होत्या. ती उठली. स्कॉचची बॉटल उघडून तिने एका ट्युलिपच्या आकाराच्या काचेच्या पेल्यात ती ओतली, धीरेधीरे दोन सौम्य घोट घशाखाली ओतले. किचनच्या ओट्याला टेकून तिने आपल्या अश्रूंचा बांध मोकळा होऊ दिला. आपल्या गाऊनची गाठ सैल करून ती आरशासमोर उभी राहिली…


…तो अन ती शहराच्या कोपऱ्यावर एका रेस्टॉरंटमध्ये भेटले तेव्हा ती त्याला पाहून खूप प्रभावित झाली होती. त्याचे नितळ निळे डोळे पाहणाऱ्याला गुंगवून ठेवत. त्याचे नुकतेच वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले होते अन तो शहरातील नामांकित वकिली फर्म मध्ये उमेदवारी करीत होता. वेळेआधी येऊन त्याने एक कोपऱ्यातले टेबल बुक केले होते. ती जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा तिला पाहून तो अत्यंत अदबीने उभा राहिला अन तिला बसण्यासाठी खुर्ची मागे धरून उभा राहिला होता. अगदी जेंटलमनसारखा वागला होता तो तेव्हा. फक्त अर्धा तास भेटू असे म्हणून आलेले ते तीन तास गप्पा मारत होते जणू काही आयुष्यभरासाठी ते एकमेकांना ओळखत होते. त्याच्या डोळ्यांतून ती त्याच्या हृदयात उतरली होती.


पुढे ते एकमेकांना भेटत राहिले, चित्रपट, डिनर अन छोट्या सहलींचा आस्वाद घेऊ लागले. आयुष्य एकमेकांबरोबर घालवण्यासाठी त्यांनी एकमेकांना निवडले होते. अन ती वेळ आलीच जेव्हा त्याने एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या पेमेंट काउंटरवर अगदी फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून तिच्यासमोर अंगठी धरत तिला लग्नासाठी विचारले. तिच्या नकाराची शक्यता नव्हतीच. त्याक्षणी तिने त्याला मिठी मारली होती अन त्याच्या ओठांवर ओठ टेकवले होते, तिच्या डोळ्यांतले अश्रू घरंगळत होते... जग जणू नव्हतेच आजूबाजूला...


शहराच्या मधोमध असलेल्या चर्चमध्ये त्यांचे लग्न झाले... दुसऱ्या दिवशीच ते विमानाने पूर्वेकडच्या सुंदर हिल स्टेशनकडे निघाले. उंचउंच टेकड्यांचा हा प्रदेश कॉफीच्या बागांनी अन आजूबाजूच्या दाट जंगलांसाठी प्रसिद्ध होता. तिचे स्वप्न होते इथे जायचे, तिथल्या मंदिरांच्या वास्तुकलेबद्दल तिने वाचले होते, तिथल्या पक्षी अभयारण्यात खूप सुंदर पक्षी दिसत अन तिथले रेस्टॉरेंट्स खवय्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचे सर्व सुविधांनी युक्त डोंगराच्या कुशीतील रिसॉर्ट धरतीवरल्या स्वर्गाहून कमी नव्हता. स्वप्नांना आव्हान देऊ शकेल एवढे नजारे त्या इस्टेटमध्ये होते. त्या दिवसांत त्या दोघांनी त्यांच्या तारुण्याचा पुरेपूर आस्वाद घेतला. अन सुंदर आठवणी घेऊन आपल्या शहरात परत आले…


…गेली दोन वर्षे त्या अपघातांनंतर जणू काही तिचे सारे जगच तुटून गेले होते. अशाच एका पावसाळी रात्री एका पार्टींनंतर घरी येताना गाडीला झालेला तो अपघात, त्यात त्याला लागलेला मार अन त्यातून त्याची कायमची हरपलेली शुद्ध. तिला साधे खरचटलेसुद्धा नव्हते अन तो मात्र गेले दोन वर्षे अंथरुणात खिळून गेला होता. तिने सर्व काही करून पाहिले. डॉक्टरांनी वेळेवर आणि ईश्वरावर भरवसा ठेवायला सांगितला त्या दिवशी तिला समजलं की तो काही आता या जीवघेण्या परिस्थितीतून वाचणार नव्हता.  


त्याचे सगळं काही करता करता ती थकून जाई, दिवस कधी सुरु होई अन संपत असे हे कळतही नसे. रात्री सलाईनची शेवटची ड्रीप संपली की ती पाठ टेकत असे अन सकाळी लवकर उठे. मग नर्सच्या भरवशावर त्याला सोडून ती कामाला जाई अन पुन्हा आल्यावर त्याची सुश्रुषा करण्यात तिचा वेळ जाई. असं एकही प्रार्थनास्थळ उरले नसेल जिथे तिने त्याच्या बरे होण्यासाठी नवस बोलले नाहीत. ज्याने जे डॉक्टर सांगितले, जे मार्ग सांगितले ते सारे केले पण त्याच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता. त्याचे जितं जागतं मृतप्राय शरीर तिच्या समोर पडलेले असे. फक्त डोळ्यांची बुबुळे हलत. बाकी शरीरात जिवंत असायची कुठलीही खूण नसायची.


ती त्याच्यासमोर गेली. आताही तो निपचित पडला होता समोर. तिची चाहूल लागली तसे त्याने डोळे जरासे किलकिले केले. दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तिने मोठ्या धीराने त्याचा हात हातात धरला. सलाईनची सुई त्याच्या हातातल्या धमनीतून काढून टाकली. निर्धाराने ती त्याच्या जवळ बसली, अन त्याच्या कपाळावर तिने मुका घेतला, तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण अत्यंत धाडसाने तिने त्याच्या मानेत एक इंजेक्शनची सुई खुपसली. धपापणारी छातीची लय हळूहळू शांत होत गेली. काही वेळातच त्याचे डोळे कायमचे बंद झाले. 


...आरशासमोर उभे राहत तिचे ते अनावृत्त रूप पाहत ती तिच्या आयुष्याचा सारा जमाखर्च आठवत होती. आपण जे केले ते बरोबर की चूक हे ती अजूनही ठरवू शकत नव्हती. जड अंतःकरणाने घेतलेला हा निर्णय त्याच्या दृष्टीने बरोबरच होता, त्याला असे लुळेपांगळे मरणाकडे सरकताना पाहणे तिच्यासाठी मरणप्राय होते. खूप दिवस अंत:करणातल्या विरोधाशी झगडल्यावर ती या निर्णयाप्रती आली होती. अपराधित्वाची भावना होतीच पण त्याहूनही जास्त वेदनादायी, परावलंबी आयुष्यातून त्याची सुटका केल्याचे समाधान तिच्याकडे होते, या भांडवलावर आता ती आयुष्य जगणार होती.


Rate this content
Log in