komal dagade.

Tragedy

4.3  

komal dagade.

Tragedy

सुनेच्या राज्यात

सुनेच्या राज्यात

6 mins
585


" आरोही उठतेस का...? सकाळचे आठ वाजत आलेत. चल मी ऑफिसला चालोय...'आईने डब्बा करून दिलाय...!आरोही चा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता.


आरोही तणतणच करतच उठली, एक दिवस केला म्हणून काय झालं...?रोज करतेच ना मी....! आरोही रागानेच म्हणाली. मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही...,मी असच बोललो...!आरोहीची चिडचिड सुरु झाली...


संदीप रागानेच घराबाहेर पडला. बेडरूमच दार ज़ोरात ढकलून तोंडात पुटपुटतच म्हणाला... "झाली हिची कटकट सुरु....! असं म्हणत बाहेर पडला. काय बोलावे हिच्याशी...?


आरोही उठली रोजच्यासारखी आज काहीही कामे तिने केली नव्हती. सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली. ती संध्याकाळीच घरी आली. सासूबाईंनी विचारले आरोही सांगितले पण नाहीस बाहेर जाते. काही झालंय का....?


आरोही.. ,आरोही नाही म्हणून बेडरूम मध्ये निघून गेली.


संध्याकाळी संदीप आला तरी आरोही रूम मध्येच होती. संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनीच म्हणजे मालतीताईनीच केला. संदीप आरोहीच वागणं पाहत होता. त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं.


सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलावलं. सासरे माधवराव बाहेर गेले होतें. आरोहीने मात्र भूक लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवन करून रूममध्ये निघून गेली. संदीप रागातच रूम मध्ये गेला. काय चालय तुझं...?असं का वागतीस...?


आरोही......, कसं वागतीये मी मला समजेल का...?


"अग तुला कळतंय का काय बोलतीस...? तू सून आहेस या घरची....! तू असताना माझ्या आईला काम करायला लागतंय. अग तिचं वय झालंय. बीपी शुगरच्या गोळ्या तिला चालूयेत आणि तीला तू कामाला लावतेस. तुझी या जाग्यावर आईच असते तर...??


माझी आई कोठून आली तिच्याबद्दल काही बोलायचं नाही...मी एक शब्द ऐकूनही घेणार नाही "आरोही रागानेच बोलली..


पुढे ती रागानेच म्हणाली.....मला वेगळं राहीचय...? रोजच हे काम करायचा कंटाळा आलाय... कसली privacy नाही. एकटीवर खूप कामाचा भार येतोय. मला नाही जमणार सगळ्यांचं करायला. आज आईने केलं तर लगेच दिसलं.रोज बायको करते ते नाही दिसत का...? आरोहीचा आवाज चढला होता.


सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता. त्यांचे डोळे पाण्याने भरले होतें. नक्की सुनेच्या मनात काय चालय हेही समजले. तोपर्यंत सासरे ही आले होतें. त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या. दोघांचा मिळून एक निर्णय ठरला. गावाला राहायला जायचं. सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीनच हळव झालं होतं. हा निर्णय दोघांचा आता बदलणार नव्हता.


आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोऱ्यात होती. संदीपला रात्रभर झोप नव्हती. आरोहीचे विचार पाहून तो मनातून खचला होता. आईवडिलांना एकटं या वयात कसं सोडू...!मनालाच प्रश्न करत होता.


आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. ज्यांनी हातांच्या फोडासारखं जपलं त्यांना वेगळं करायचं,हेच विचार त्याला पटत नव्हते. बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होतं होती.


आरोही किचन मध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती. कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासुसासरे हातात ब्यागा घेऊन चालेले होतें. मालतीताईनी संदीपला हाक मारली.. संदीप डोळे पुसतच बाहेर आला. दोघांच्या हातात बॅग होती.त्याला आश्चर्यच वाटले....!कोठे चालला तुम्ही दोघे...?, "संदीप म्हणाला.'


माधवराव,  "अरे आम्ही गावाला चालोय राहायला, इथं बंद घरात करमत नाही. तुम्ही दोघे छान संसार करताय... आमची काही गरज नाही. आम्हीही गावी राहतो, मोकळ्या हवेत जगतो. निरोगी राहतो सासरे बोलत होतें.


बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार. मी नाही जाऊन देणार तुम्हाला या वयात आमची या वयात खरी गरज आहे तुम्हांला....?," संदीप म्हणाला.


मालतीताई,       " नाही संदीप इथं राहून जमणार नाही, मोकळ्या हवेत निरोगी आयुष्य जगू. तुम्ही दोघे चांगला संसार करा. आमची नका काळजी करू, संदीपच्या आईला खूप भरून आलं होतं. अश्रूना दाबत दोघांनीही काढता पाय घेतला.

आरोहीच्या तोंडून एकही शब्द आला नाही, सासुसासर्यांनसाठी थांबा म्हणून....!"


बॅग उचलून त्यांनी गावाचा रस्ता धरला. आरोही मनातून खिन्न झाली होती. नवऱ्याशी बोलण्याचीही तिची हिम्मत होतं नव्हती. अपराधीपनाची भावना तिच्या मनात दाटून आली. दोघे गेल्यावर संदीप आरोहीशी एका शब्दाने बोलत नव्हता.


काही दिवस संदीप खूप शांत राहत होता. एका शब्दाने आरोहीशी बोलत नव्हता. जेवणही बाहेरच करायचा. आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ हाताने उद्वस्त केलं. याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती.


गावाला मालतीताई आणि माधवराव एकटं राहून आतून खचले होतें. संदीपच्या आईने तर अन्न त्याग केला होता. मुलगा डोळ्यासमोर असावा नेहमी त्यांना वाटत असे. एकुलता एक म्हणून त्यांचं जीवापाड प्रेम होतं. जेवण पोटात नसल्याने त्यांचा शुगर आणि बीपी ही वाढलं होतं.


गावाला आल्यापासून मालतीताईंचा रोजचा दवाखाना सुरु झाला होता. मोहनराव बायकोला खूप धीर देत होतें. मालतीताईना मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाल्या होत्या.


मालतीताईंचा आजार वाढतच चालला होता. एक महिना झाला तरी त्याच्या प्रकृती सुधारण्याच नाव घेत नव्हती. मुलाचं नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या. माधवराव आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप घेत नव्हता. आरोहीला कॉल करणार पण तिला काही त्यांचं पडलंच नसल्याने त्यांनी तिला कॉल करायचा टाळला.


संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याच लक्ष फोनकडे नव्हते. फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजले नव्हते.


माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीच्या नऊ वाजता कॉल केला. संदीप ड्रायविंग करत असल्याने त्याने कॉल घेयचा टाळला. तो कॉल मालतीताईना शेवटचं मुलाशी तोंडभरून बोलायचं असल्यानेच केला होता. त्या अखेरच्या घटकाच मोजत होत्या.


रात्री दहा वाजता संदीप घरी आला. फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता. इकडे आरोही जेवण गरम करून ताट वाढत होती. दारावरील कढी वाजल्याने संदीप दार उघडायला गेला. तर दारात मालतीताईना पाहून त्याला आश्चर्यच वाटले.


आई अग एवढा उशिरा तू इथे....? ये ना आतमध्ये...! कॉल करून तरी सांगायचं मी आलो असतो नेयला, आणि बाबा कुठे आहेत....? संदीप बोलत होता.


हो अरे श्वास तरी घे...!"किती प्रश्न विचारतोस....? तुलाच बघायला आले, तुझ्यासाठी जीव घुटमळत होता. आता मोकळे झाले. डोळे भरून पाहिलं तुला....!तू नाही आलास म्हणून मीच आले भेटायला तुला...!


संदीप, "थांब तुला मी पाणी घेऊन आलो, तेवढ्यात संदीपचा फोन वाजला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला. बघतोय तर त्याच्या बाबांचाच कॉल होता.


हॅलो, बाबा बोला ना....? माधवराव गहिवरलेल्या आवाजात संदीप आई गेली रे तुझी....! शेवटची इच्छा तिची तुला बघण्याची राहून गेली. बाबा हे काय बोलताय...! संदीपने भरधाव वेगाने हॉलमध्ये आला. तर तिथे त्याची आई नव्हती. खरच त्या शेवटचं मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या.


संदीपला एक मोठा धक्काच बसला. तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला होता. आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा फोडला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. लगेच गाडी काढून तो गावाला निघाला. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटच बघण्याच सुख ही देऊ शकलो नाही मी किती आभागी मुलगा असं म्हणून स्वतःलाच तो कोसत होता. भरलेल्या मनातील दुःखाने अखेर त्याने गाव गाठलं.


मालतीताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छाच ठेवून गेल्या. त्यांच्या फोटोसमोर उभा राहिलाही आरोहीला अपराधीपणा वाटत होतं.


आरोही जेव्हा घरातुन वेगळं होईच म्हणाली. सासू -सासरे गावाला गेले, तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची तिला परतफेड केली.


तेव्हाच तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली. बाबा नसल्याने एकटी आई कोठे जाणार....म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजेच आरोहीच्या घरी आल्या होत्या. तेव्हा संदीपने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलंच खडसून सुनावलं होतं , ते प्रकरण संदीपने तिथेच मिटवलं. एका आईची अवस्था मुलांनशिवाय कशी होतें ते आरोहीला संदीपने दाखवून दिलं. आरोहीलाही स्वतःची चूक उमगली होती. तिने नवऱ्याची पाय धरून माफी मागितली,पण आता तर वेळच निघून गेली होती.

आई आणि मुलगा कायमचेच वेगळं झाले होतें.


गावाला मालतीताईचे सगळे तेरा दिवसांचे कार्यक्रम उरकले. पाहुणे आपापल्या घरी गेले.संदीपने बाबांना तुम्ही पण आमच्याबरोबर येईचे असं सांगितलं. त्यांनी मात्र सरळ नकार दर्शवला. त्यांचा मात्र आरोहीबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता.


"मालतीताई आज जिवंत असत्या...' जर आरोही चांगली वागली असती तर....!" आज बायको सुनेमुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं.


माधवराव म्हणाले,....तुम्ही जा माझी काळजी करू नका, सुखी राहा. ते तोंड फिरून निघाले, डोळे पाण्याने डबडबले होतें, एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले, बाबा माफ करा...!" माझी चुकी माफी मागूनही भरून निघणार नाही, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली. तुम्ही जर आता आला नाही तर, खूप मोठी शिक्षा मला मिळेल. बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा. तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी भरू नाही शकत. यापुढे मात्र माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. एक संधी द्या मला बाबा....!!


माधवराव, "बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधीपण चांगली. आता वेळही निघून गेली. मालतीने तुला माफ केले असते. तिच्याकडून तुला मी माफ करतो, पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही. माझं आयुष्य कोणत्या मार्गांवर आलय आणि आपल्या साथीदारा शिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असतं. ते तुला नाही समजणार...! आयुष्यात शेवटी तिच्या सोबत घालवलेल्या आठवणींतच मी गावाला घालवणार आहे. शहरांत मालतीशिवाय मन नाही रमणार. त्यामुळे मी इथंच राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्ही दोघे निघून जा... असं म्हणून माधवराव निघून गेले.


भरल्या अंतःकरणाने दोघे निघाले. संदीप निशब्द झाला होता.


नाती जिवंतपणी सांभाळी जातात, नात्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात. झालेल्या चुकीचं प्रायश्चित करायलाही देव कधी कधी वेळ देत नाही. वागताना नेहमी विचार करूनच वागले पाहिजे.

       ******समाप्त ******


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy