Jayashri Kailas Patil

Inspirational Others Classics


2.0  

Jayashri Kailas Patil

Inspirational Others Classics


सत्याचं स्वप्नं ( लघु नाटिका )

सत्याचं स्वप्नं ( लघु नाटिका )

11 mins 16.1K 11 mins 16.1K

" मी नाही चुकलो -------"

[स्टेजवर साधारण शाळेचे वातावरण आपल्याला दाखवायचे आहे.]

विद्यार्थी :- सुप्रभात गुरुजी.

गुरुजी :- सुप्रभात, सुप्रभात बस खाली. 

मुलांनो आज पहिला तास भूगोलाचा नाही का ? चला तर मग आज आपण शिकुया, आपल्या पाठयपुस्तकातील महत्त्वाचा धडा. धड्याचे नाव आहे. 'भारतातील प्रमुख नद्या '. मुलांनो तुम्हाला भारतातील प्रमुख नाडयनची नवे माहित आहेत का ?

विद्यार्थी :- हो गुरुजी.  

गुरुजी :- सत्यवान सांग पाहू नद्यांची नावे. 

सत्यवान :- गुरुजी मला सर्व नाही स येणार, पण काहींची नावे सांगू का? 

गुरुजी :- हो. हो सांग, तुला जेवढी येत असतील तेवढी सांग?

सत्यवान :- अ..... अ...... गंगा,यमुना,सावित्री,सिंधू,रवी,चंद्रभागा,हुगळी,कौशी,..... अ.... अ... दामोदर, हा.... साबरमती, नर्मदा,कृष्ण,कावेरी,भीमा, अ... बस , एवढ्यांचीच नावे मला माहित आहेत.

गुरुजी :- शाब्बास सत्यवान ! तुला बरीच नावे माहित आहेत. छान , खूप छान. !... 

हं... हं... मानव तु सांग बघु ? तुलाही काही नावे माहित असतील. 

मानव :- (भानावर असल्यासारखा) अ..... अ...... काय काय म्हणालात गुरुजी?

गुरुजी :- अरे मुर्खा I वर्गात आल्यावर, नुसता शरीराने बसु नकोस, मन लावुन जरा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर . 

मानव :- हो गुरुजी.

गुरुजी :- काय हो गुरुजी. बस खाली.

मुलांनो अजून कुणाला सांगता येईल का नावे कुणीही नाही, ठिक आहे, मी सांगतो बघा,सत्यवानने काही नावे सांगितले आहेत. मी बाकीची सांगतो ऐका. 

भारतातील प्रमुख नद्यांमध्ये अजून महत्त्वाच्या नद्या आहेत, जसे की, महानदी, सतलज, बियास,मांडवी,वैतरणा,भीमा,गोदावरी,कृष्ण,कावेरी,मांजर, उल्हास. 

[तेवढ्यात शाळेची घंटा होते... टनटन..... टनटन....]

विद्यार्थी :- हे.... (गोंधळ करतात.....)

गुरुजी :- ये.... ये....गप्प बसा, गप्प बसा सगळ्यांनी. कुणीही वर्गातून बाहेर जायचं नाही. गोंधळ,गोंधळ,गोंधळ. बसा गुपचूप.

[सगळे गुपचूप बसतात------]

आता सगळ्यांनी मी काय सांगतो ते नीट ऐका. उद्या येताना सगळ्यांनी "गंगा एक पवित्र नदी" या विषयावर १० ओळी लिहून आणा. आणि हो जो लिहून आणणार नाही, त्याला माझ्या छडीचे घाव झेलावे लागतील. समजले का?

विद्यार्थी :- हो गुरुजी.

गुरुजी :- ठिक आहे जा आता. 

[सगळी मुले जातात]

[रस्त्यातून जात असतांना मुले चर्चा करतात]

मुले :- ये बाबा उद्या १० ओळी लिहून आणा बरं ! नाहीतर भूगोलाचे गुरुजी मारमार मारतील. 

सत्यवान :- पण १० ओळीत काय लिहायचं ?

मानव :- ये सत्यवान, हे तू विचारतोयेस. तू तर भूगोलाच्या सरांचा आवडता विद्यार्थी आहेस. 

सत्यवान :- नाही तसे नाही, पण मला खरंच काही सुचत नाहीऐ. 

मानव :- ये सत्यवान, उगाच जास्त शायनिंग मारू नकोस हं ! उद्या आम्ही कितीही चांगल्या १० ओली लिहून आणल्या ना तरी भूगोलाचे सर तुलाच शाब्बास बोलणार. म्हणे मला काही सुचत नाहीऐ. (हावभाव करून बोलतो).

सत्यवान :- मानव तुला जे समजायचे असेल ना ते समज, चला येतो मी, उद्या भेटूया. 

(सत्यवान निघून जातो.....)

मानव :- ये चला रे..... (ते हि निघून जातात)

[सत्यवान च्या घरचे वातावरण ]

[सत्यवान घरी येतो , बॅग व्यवस्थित ठेवतो , कपडे, शुज व्यवस्थित ठेवतो, हातपाय धुवून देवाला नमस्कार करतो.]

आई :- सत्या, चल तुझ्यासाठी गरमागरम पोहे केलेय, खाऊन घे बरं पटकन.

सत्यवान :- नको आई, मला भूक नाहीऐ. 

आई :- काय भूक नाही, अगं बाई रोज तुला शाळेतून आल्यावर कड्याकाची भूक लागते, आणि आज भूक नाही. काही बिनसलंय का शाळेत?

सत्यवान :- नाही गं ! असच , माझं मन नाहीऐ. 

[सत्यवान एका खोलीत जातो व खिडकीजवळ जाऊन बसतो. खिडकीच्या बाहेर बघतो.]

आई :- आता गं बाई ! याला काय झालं असेल बरं ! 

[तेवढ्यात एका कोपऱ्यात उखळात डाळ कुटत असलेली सत्यवानची आजी आवाज देते.]

आजी :- या आजकालच्या मुलांच्या काही भरवसा नाही ग बाई, केव्हा कसे वागतील काही सांगता तेय नाही. 

आई :- नाही हो ! सासूबाई, आपला सत्यवान काय तसा मुलगा नाही. काहीतरी मनाविरुद्ध घडलं असेल त्याच्या, नाहीतर तसा नाही वागायचं तो. 

आजी :- त बी खर्च आहे. म्हणा. जाऊ दे, राहू दे त्याला एकटं थोडावेळ. त्याचे बाबा आल्यावर विचारतील त्याला.

आई :- हो... हो, त्यांनाच बोलायला लावते त्याच्याशी. त्यांना सांगतो तो खार खार पण एवढा वेळ झाला, अजून आले कसे नाही ते?

आजी :- येईल, येईल, त्या माझ्या औषधी आणायच्या होत्या ना , म्हणून उशीर होत असेल. 

[तेवढ्यात सत्यवानच्या बाबांचा आवाज येतो]

बाबा :- सत्या ऐ सत्या,....... 

आई :- अग बाई आले कि, [बाबांच्या हातातले सामान घेते]

बाबा :- आई आज फार दमलो बरं का?

आजी :- का रे बाबा, का दमळास आज?

बाबा :- अगं आई, आज पर्यावरण दिन नाही का?

आमच्या वनविभागात भरपुर झाडे लावून घेतली. आजूबाजूचा सगळं परिसर स्वच्छ केला. 

आजी :- हो का, चला कुणाला तरी काळजी आहे म्हणजे निसर्गाची !

आई :- पुरे हा आता, त्या तुमच्या वनविभागातल्या गप्पा, मी काय मी,हणते जरी चहा पिऊन झाल्यावर सत्याला बघा ना?

बाबा :- सत्याला, का काय झालं त्याला? तब्बेत बरी नाही का?

आई :- नाही हो ! तब्बेत बरी आहे. पण का कुणास ठाऊक, एकटाच बसलाय खोलीत. काही खाल्ल्ली नाही. काळजी वाटते हो! म्हणून म्हटलं, जरा बघा ना?

बाबा :- बरं ठीक आहे, मी बोलतो त्याच्या शी तू काळजी नको करुस. 

सत्या ऐ सत्या....... [ सत्यवानच्या खोलीत जातात]

सत्यवान :- बाबा, आलात तुम्ही. 

बाबा :- हो तर, केव्हाचीच आलोय. पण आज आमच्या लाड्क्याला, आमच्याकडे बघायला वेळच नाही बुआ?

सत्यवान :- नाही हो बाबा, असे काहीही नाही. 

बाबा :- सत्या, बाबांना नाही सांगणार, काय झालं ते. 

सत्यवान :- तसे विशेष काही नाही हो बाबा, आज भूगोलाच्या सरांनी "गंगा एक पवित्र नदी" या विषयावर १० ओळींचा निबंध लिहायला सांगितला आहे. पण मला काही सुचतच नाहीऐ.

बाबा :- खुडखुदून हसतात.... सत्या तू पण ना? १० ओली लिहायच्या म्हणून तू काही खाल्ले हि नाहीस.

सत्यवान :- बाबा, मी इथे इतका अस्वस्थ आहे आणि तुम्ही हसतायेत, हं.... जा मी नाही बोलणार तुमच्याशी (रागावलेल्या सुरात). 

बाबा :- अरे बापरे! आमचं सोनूला रागावलं वाटतं आमच्यावर . बरं बाबा, चुकलं आमचं.

सत्यवान :- बाबा, तुम्ही पण ना. 

बाबा :- सत्या, ये बस, सारे, जीवनात जश्या समस्या असतात , तसेच समाधानही असते. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच. 

आपण मागच्या वर्षी वाराणसीला गेलेलो ना ! तिथे आपण पवित्र गंगा नदीचं दर्शन घेतले बाळा ! तुला तिथे गेल्यावर गंगा नदीबद्दल जे काही वाटले , अनुभवास आले, ते तू दहा ओळीत लिहून टाक. सोप्प आहे सगळं . 

सत्यवान :- म्हणजे मला जे काही वाटले, ते सगळं लिहू ना?

बाबा :- हो !अगदी १० ओळीत बसेल इतकं सगळं लिहून टाक. 

सत्यवान :- थँक यू बाबा, तुम्ही माझ्या मनावरचं ओझं कमी केलंत. मी आता लिहू शकतो. 

बाबा :- शाब्बास ! लिहून घे मग आपण काहीतर खाऊया. 

सत्यवान :- आई, मला भूक लागलीय, काहीतरी खायला दे ना गं? !

आई :- आता भूक लागली वाटत. 

बाबा :- रमा, अगं दे त्याला काहीतरी खायला. 

आई :- हो , हो लगेच आणते . सत्य तुझी आवडती खिचडी केलीय बरं का? पोटभरून खायची. 

[सगळे जेवतात....... ]

दुसरा दिवस...... 

(शाळेची घंटा वाजते, सगळी मुले शाळेत येतात.)

विद्यार्थी :- शुभसकाळ गुरुजी. 

गुरुजी :- शुभसकाळ मुलांनो ( विद्यार्थ्यांनो) तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, इंग्रजीच्या तासाला भूगोलाचे सर कसे आले बरं !

(विद्यार्थी एकमेकांकडे बघून हसतात , इशारे करतात)

अरे, काल मी, तुम्हाला निबंध दिलेला ना? तोच तपासायला वेळ लागेल म्हणून इंग्रजीच्या सरांकडून मागाहून घेतला तास. 

(मुले-मुली पुन्हा खाणाखुणा करतात)

अरे,असे एकमेकांकडे का बघत आहात निबंध लिहून आणलाय ना?

विद्यार्थी :- हो , गुरुजी. 

गुरुजी :- चला मग जमा करा ते पेपर. सत्यवान जरा जमा कर बघू पेपर. 

(सत्यवान पेपर जमा करतो आणि स्वतःचा पेपर शेवटी ठेवतो सरांकडे देतो.)

(गुरुजी एक एक निबंध वाचायला सुरवात करतात)

- रोहित खामकर --- गंगा एक पवित्र नदी आहे. 

........ छान 

- सचिन दुसाणे ....... गंगा एक ..... 

चांगला प्रयन्त केला आहेस.

- मानव झगाडे..... गंगा एक पवित्र नदी आहे. 

अरे मूर्खां ! नंदी नाही रे..... नदी ... नदी.

मानव :- Sorry गुरुजी 

गुरुजी :- अरे काय Sorry....... 

- अवधुत ..... ठिक आहे 

- राकेश .... अक्षर जरा चांगलं काढ रे बाबा 

- मनोज .... शुद्दलेखनावर लक्ष दे 

- सत्यवान ...... (गुरुजी आश्चर्यचकित होऊन उठतात)

गुरुजी :- सत्यवान (जोरात ओरडून) इकडे ये, इकडे ये लवकर 

(सत्यवान भीतीने गुरुजीजवळ जातो)

(गुरुजी खूप जोरात सत्यवानच्या कानाखाली वाजवतात. छडीने त्याच्या हातावर सपासप मारतात.)

मूर्ख मुलं, स्वतःला जास्त शहाणा समजतोस. वर्गातला हुशार मुलगा म्हणून तुझी वाह वाह केली. तू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालास. जा, आताच्या आत घरी जा आणि उद्या यातना पालकांना घेऊन ये. 

(सत्यवान रडत रडताच बाहेर पडतो)

(सगळी मुले आश्चर्यचकित होतात)

(गुरुजी हि वर्गातून निघून जातात)

(शाळेची घंटा होते.. विद्यार्थी बाहेर पडतात आणि रस्त्याने जाताना चर्चा करतात)

मानव :- काय रे रोहित, भूगोलाच्या गुरुजींना एवढं रंगवताना कधीच नाही बघितलं बुआ . 

रोहित :- अरे हो! आणि तेही सत्यवानवर , तो तर त्यांचा आवडता विद्यार्थी आहे.

राकेश :- अरे ते सगळं सोडा पण असं काय लिहिले असेल सत्यवान ने कि गुरुजी त्याच्यावर एवढे भडकले. 

अवधुत :- आता काय माहित बाबा उद्याच समजेल ते. 

मनोज : चला उद्याच उद्या बघू... निघूया आता. 

(सगळे निघून जातात)

(इकडे सत्यवानचे घर ..... आई सारख्या हेरजाऱ्या घालतेय कारण सत्यवान अजून हि घरी आलेला नाहीये . 

आई :- अरे देवा ! हा पोरगा अजून कसा आला नाही. विठ्ठल, काळजी घे रे बाबा!

बाबा :- सत्या, ये सत्या.....

आई :- अहो , अहो बघा ना सत्या अजून घरी च नाही आलं. 

बाबा :- काय? अगं त्याची शाळा कधीच सुटली असणार 

आजी :- यशवंता ! बघ रे बाबा, जीवाला घोर लावला या पोराने. 

बाबा :- (घाबरून)... हे बघा तुम्ही काळजी करू नका . मी बघतो इथेच असेल तो. 

(बाबा छत्री घेतात आणि चप्पल घालतात तेवढ्यात सत्यवान येतो) 

सत्या, माझ्या होतास तू?

आई :- काय रे सत्या , कुठे गेला होतास इथे "जीव" फार टांगणीला लागलाय , देऊका एक फटका 

बाबा :- अगं रमा ... काय करतेयस, गप्प बस जरा 

आई :- अहो पण..... 

बाबा :- गप्प बस बोललो ना ?

आजी :- रमा, मागे हो, यशवंत बोलतोय ना.

बाबा :- सत्या (हात .. हातात घेऊन काय झालं बाळा)

आं... हे... हे हातावर वेळ कसले. सत्या काह झालं?

(सत्यवान बाबांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतो.. रडतो आणि आपल्या खोलीत जातो)

आई :- अरे देवा ! काय झाली माझ्या पोराला. 

बाबा :- आई, तू जरा रमला घेऊन आत जा मी बघतो काय ते.

(बाबा सत्यवानाच्या खोलीत जातात)

सत्या-- सत्या काय झालं रे राजा. 

सत्यवान :- बाबा ! बाबा, Please तुम्ही जा इथून, मला एकटं रहायचंय. 

बाबा :- अरे पण काय झालय ....

सत्यवान :- काही नाही, उद्या तुम्ही माझ्याबरोबर शाळेत यायचंय बस I जा तुम्ही. 

बाबा :- ठिक आहे, ठिक आहे जातो मी आपण जाऊया उद्या पण तू रडू नकोस हं !शांत हो, शांत हो I 

(बाबा बाहेर येतात)

आई :- अहो ! काय झाली त्याला?

बाबा :- हे बघा, मी बघतो काय करायचं ते, तुम्ही झोपा आता. 

उद्या शाळेत बोलवलय ... बघतो. 

आई :- अहो पण काय झालय ?

बाबा :- (वैतागून) मला पण नाही माहूत ग बाई, झोप आता. 

आजी :- रमे... ये झोप 

[दुसरा दिवस(३)]

(शाळेची घनता वाजते, मुले जमतात पहिला तास - भूगोल)

विद्यार्थी :- शुभसकाळ गुरुजी 

गुरुजी :- शुभसकाळ, बस खाली . (शांततेत)

चला व्हा काढा सगळ्यांनी आणि लिहून घ्या. 

गंगा एक पवित्र नदी आहे. तिचे उगमस्थान... 

(तेवढ्यात दरवाज्यावर टक टक .. )

बाबा :- नमस्कार गुरुजी, मी यशवंत पुजारे, सत्यवानचे वडील. 'आपण भेटायला बोलवलेलंत मला.'

गुरुजी :- हो... हो... मीच बोलावलेलं तुम्हाला चला मुख्याध्यापकांकडे जाऊ या . 

(वर्गाकडे बघून ... ये आवाज नाही करायचा हं ! मुकाट्याने अभयास करा.)

बाबा :- गुरुजी, काय झालं, म्हणजे काही चुकले का सत्यवान.

गुरुजी :- नाही हो, चुकत आमचंच आम्हीच कुठेतरी कमी पडतो असे समजायचे चला मुख्याध्यापकांकडे बोलूया.

(मुख्याध्यापकांना ) आत येऊ का सर 

मुख्याध्यापक :- हो.. हो... या काय झाले भिडे गुरुजी 

गुरुजी :- सर , हा सत्यवान , आपला विद्यार्थी आणि हे त्याचे वडील यशवंत पगारे . 

बाबा :- नमस्कार सर ! काय झालेय मला काही कळेल का? म्हणजे माझ्या मुलाच्या हातावरचे 'वळ' मला सांगतायत कि त्याने काहीतरी चूक केली असेल. नांगी म्हणजे शिक्षेबद्दल दु:मत नाही माझे पण काय झालेय जरा कळेल का?

गुरुजी :- मी पगारे मी काळ मुलांना. निबंध लिहायला दिला. तुमच्या मुलाकडून उकृष्ट निबंधाची अपेक्षा मी केली . पण त्याचा निबंध वाचून मला स्वतःचीच लाज वाटली हो ! एका क्षणाला असे वाटले कि , कुणाला शिकवतोय आपण?

बाबा :- क्षमा असावी गुरुजी, पण असे काय लिहिले माझ्या मुलाने . 

गुरुजी :- वाचतो ना आताच वाचतॊ . काळ माझे कां तृप्त झाले , आज तुमचे होतील. 

ऐका , तुमच्या चिरंजीवाने काय लिहिलंय.

- निबंध :- 

गंगा एक अपवित्र आणि अस्वच्छ अशी नदी आहे. भारतातल्या दुर्गंधियुगी नद्यांमध्ये गंगा नदी अव्व्ल स्थानावर आहे. गंगा नदीचा आजूबाजूचा परिसर प्याल्स्टीकच्या पिशव्यांची आणि घाणेकरड्या कपड्याने व्यापला आहे. गंगा नदीला कचऱ्याचा किनारा लाभलेला आहे. गंगा नदीत लोक आंघोळ करून घाण करतात व तेच घाण पाणी तीर्थ म्हणून बाटलीत भारतात. गंगा नदीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून लोकांनी उपयोग केला तर कर्करोगासारख्या आजाराचे प्रमाण अधिक वाढेल. गंगा नदी प प्रदूषणाची जननी आहे. 

तसेच तोही भविष्यात अनेक समस्यांना जन्म देऊ शकते. ..... शी... शी... किती गलिच्छह निबंध लिहिलंय तुंचुया सत्यवान ने निदान नावाप्रमाणे तरी वागला असता तर बरे झाले असते.

बाबा :- सत्या.... हे काय आहे बेटा . 

सत्यवान :- माफ करा गुरुजी, माझ्या नावाचा माझ्या निबंधाशी काहीही संबंध नाही. 

गुरुजी :- बघा कशी उलट उत्तर देतो ते. 

बाबा :- सत्या ..... 

सत्यवान :- क्षमा असावी , गुरुजी तुम्ही जसे माझे गुरु आहेत, तसेच माझे बाबा सुद्धा माझे गुरु आहेत . माझ्या बाबानी मला नेहमी शिकवली कि पाठयपुस्तक हे फक्त परीक्षा देण्यापुरते मर्यादित नसावं. पाठयपुस्तकात नैतिक मूल्य असतात ती जोपासली कि माणूस आपोआप शिकतो आणि मोठा होतो. गुरुजी निबंध म्हणजे पाठयपुस्तकात जे दिली ते घोकमपट्टी करून लिहायचे कि, आपल्या अनुभवातून शब्दरचना फुलवायची . पाठयपुस्तक म्हणजे परिस्थितीचे हुबेहूब वर्णन. मग पाठयपुस्तकात वर्णन केलेली गंगा आणि वास्त्यवतली गंगा यात एवढा फरक का? गुरुजी , जेव्हा मी निबंध लिहायला घरातला तेव्हा सर्व नद्या माझ्याशी बोलत होत्या सत्यवान बघ, मी गंगा , मी सिंधू , मी सरस्वती, मी गोदावरी , मी मालिन झालेली सरिता . आमचा जन्म लिकांची पाप धुण्यात मालिन झाला, इतका मालिन झाला कि जीव गुदमरतोय. गुरुजी नद्यांच्या त्या आवाजाने मला फार अस्वस्थ केलं. पाठयपुस्तकातीन नैतिक मूल्यांची साधी झलकही मला वास्तवात दिसली नाही. अहो साध्या उल्हास नदीच्या पुलावरून चाललो तर, नाकाला रुमालाचा आधार घ्यावा लागतो.

गुरुजी गंगाच काय पण आज एकही नदी पवित्र नाही अहो, दिवसांनी नद्यांचे अवशेषही सापडणार नाहीत. गुरुजी भूगोल विषय चुकीचा आहे असे नाही. परंतु वास्तव्य फार भयंकर आहे माझ्या निबंधात मी काहीही चुकीचे लिहिलेली नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. 

गुरुजी बदल आवश्यक आहेत ते अभ्यासक्रमात करायचे कि नद्यांच्या स्थितीत हे सर्वस्वी आपल्यालाच ठरवायचे आहे. खोट्या अभ्यासक्रमावर मी माझे भविष्य घडवू शकत नाही. मी अभ्यासक्रमातील प्रकरणे सत्यात आणेन मगच म्हणेन कि , गंगाच काय भारत्यातलय सर्व नद्या पवित्र आहेत. सुरवात मी माझ्यापासून करतोय गुरुजी..... सोबत कोण असेल माहित नाही पण मी विदा उचललाय भारतातील नद्यांची स्वच्छहता हेच माझे ध्येय वाईट एवढ्याच गोष्टीच वाटतंय कि मी, कालपासून तुमचा नावडता विद्यार्थी झालोय. असो, जसे कर्म , तसे फळ , मला निघायला हवं, नाहीतर , चंद्रभागेच्या काळ्या पाण्याने विठ्ठल अधिक काळा व्हायचा. 

माझे काही चुकले असेल तर क्षमा असावी . (सत्यवान बाहेर निघून जातो....)

बाबा :- गुरुजी , येतो मी, आणि हो, माझ्या मुलाच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. धन्यवाद !

(गुरुजी चष्मा काढतात, बाहेर सत्यवानाला आवाज देतात)

गुरुजी :- सत्यवान....... (Salute करतात)

खर म्हणजे हातच जोडणार होतो. पण ते तुला आवडणार नाही. कारण तू सत्यवान आहेस. ना?

ये.... सत्या .. " तू माझा आवडता विद्यार्थी होतास, आहेस आणि असणार." 

I am proud of you . 

(सत्यवान धावत येऊन गुरुजींच्या गळ्यात पडतो.)

(दोघांची गाठभेट होते,बाबा डोळे पुसतात, विद्यार्थी टाळ्या वाजवतात आणि पडदा हळूहळू बंद होतो)

समाप्त !Rate this content
Log in

More marathi story from Jayashri Kailas Patil

Similar marathi story from Inspirational