Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Jayashri Kailas Patil

Others


4.0  

Jayashri Kailas Patil

Others


मी मुंबई 2

मी मुंबई 2

3 mins 752 3 mins 752

मी मुंबई!

संपूर्ण देशाची आन बाण आणि शान मुंबई!

मित्रांनो! कधी नव्हे मी आज थोडीशी थांबलीय,थांबलीय असे म्हणण्याऐवजी, मला कुणीतरी...


कोण आहे हा राक्षस? एखादा दहशतवादी असल्यासारखा, पुन्हा एकदा माझ्या सुखी संसाराला नजर लावू पाहतोय पण त्याला कदाचित माहीत नसेल, मी मुंबई आहे मुंबई! ही मुंबई काही क्षणांची विश्रांती घेईल पण नष्ट होणार नाही। माझ्या बाळा मुंबईकरा घाबरू नकोस ही तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बाळ! रोज तुझी कामाची उत्सुकता पाहून आनंदाने फुलून जाणारी ही तुझी आई तुला आज सांगतेय की, थोडीशी विश्रांती घे, बाहेर पडू नकोस. अगदी तुझे किती जरी महत्वाचे काम असेल तरी बाहेर निघू नकोस रे राजा, घरातून बाहेर निघू नकोस. अगदी काहीही झाले तरी तू आणि मी आपण खंबीरपणे या संकटातून सुरक्षित बाहेर पडणार आहोत, थोडा संयम, थोडी विश्रांती हेच आता आपले सुरक्षा कवच आहे.


हे माझ्या मुंबईकरा तू बघतोयस ना कसे आपले रक्षक, रात्रंदिवस आपल्यासाठी लढा देत आहेत. अरे मोठे मोठे हिंसक प्रवृत्ती चे दानव आपले काही करू शकले नाही, हा तर एक बोटाच्या टोकाएवढा काटा आहे. याला तर आपण त्याच्याच भाषेत उत्तर देऊ, फक्त तू धीर सोडू नकोस। अरे हजारो, लाखो पंखाचं बळ असलेली ही तुझी माय मुंबई तुला काहीही होऊ देणार नाही. हे मुंबईकरा, तुझ्याशिवाय माझं आहे तरी कोण रे? म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगतेय जी माय तुझी सहारा बनली, जी माय तुझ्या जगण्याचा आधार बनली त्या मायला संकटात सोडून, गावाची वाट धरू नकोस रे। मला माहित आहे तिथे तुझी जन्मदात्री चिंतेने व्याकुळ होऊन तुझी भरल्या डोळ्याने वाट पाहतेय, पण तू तिला सांग की माय घाबरू नकोस, माझी मुंबई माय अजून जिवंत आहे। मुंबईकरा ज्या राक्षसाने हे थैमान घातलंय त्याची तर मनापासून इच्छा आहे रे की तू खूप दूरवर जावं आणि त्यालाही तुझं गाव दाखवावं. पण लेकरा हा असा पाहुणा आहे की ज्याला देवोभव करणं आपल्याला नाही परवडायचं रे, एकदा का तो गावागावात पोहोचला तर त्याचा वध करणं आपल्या हातात नसेल रे। म्हणून सांगतेय छकुल्या काहीही असं करू नकोस की ज्याच्याने आपल्याला वाटेल की आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारली की काय।


अरे शत्रूने केलेलं आक्रमण स्वरक्षणासाठी लढण्याच बळ देतं, पण आपल्याकडूच आपले स्वतःच नुकसान झालं तर पश्चाताप सुद्धा परिस्थिती पुढे हात टेकतो। माझ्या मुंबईकरा, हे सर्व सांगतांना माझं अंतःकरण गहिवरून आलय रे, पण तुला चांगली शिकवणूक देण्यापालिकडे मी काहीही करू शकत नाही. मुंबईकरा, हे एक युध्द आहे, ज्यात जो थांबेल तोच जिंकणार आहे. सगळे प्रश्न शस्त्र उपयोगानेच सुटतात असे नसते कारण तसे असते तर ही संपूर्ण सृष्टी आज ओस पडली असती. मुंबईकरा, जरा इतिहासाचे पान वाचून बघशील तर तुझ्या लक्ष्यात येईल की जिजाऊपुत्र शिवाजी महाराजसुद्धा कधीकधी शत्रूचा पराभव करण्यासाठी अधिक कालावधीची विश्रांती घेत होते। पण विश्रांती घेत होते याचा अर्थ ते शत्रूचा सामना करण्यास असमर्थ होते असे समजू नकोस, या विश्रांतीत ते एकच विचार डोक्यात ठेऊन शत्रूनाशाची योजना आखत होते. तोच विचार आपण सगळेच करू या, "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ"। आणि असेही माझेे मावळे लढाई लढतायेत की, आपण टाळ्या वाजवून एक दिवस का होईना त्यांचा उत्साह वाढवलाच आहे नाही का?

चल तर मग वचन दे तुझे स्वतःचे घरटे हेच तुझे जग।


अरे तान्हाजीरूपी मावळ्याने तुला सांगून टाकलंय, "तूच तुझा रक्षक", मग वाट कुणाची बघतोयस। अरे कधीकधी शत्रूचेसुद्धा आभार मानावे कारण तो सुद्धा आपल्याला काहीतरी देऊन जातो, आता तुला प्रश्न पडला असेल की मी असे का बोलतेय, मला वेड लागलंय का? अरे राजा थोडा विचार करून बघ, दगदग, धावपळीच्या जीवनात तू तुझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता, पण आता तुझ्याकडे त्याच कुटुंबासाठी भरपूर वेळच वेळ आहे। "वक्त ऐसी चीज है बाबू, जो आजतक किसी ने किसी को बिना मकसद के नहीं दी है" पण आज तुला ती मिळाली आहे ती पण तुझ्या शत्रूकडून।


माझ्या मुंबईकरा! संयम हीच हुशारी, विसरू नकोस। हे कोरोना, जा जा, आल्या पावलांनी माघारी फिर, मी आणि माझी लेकरं अर्थात मुंबईकर,तुझ्यासारख्या शत्रूला भीत नाही


Rate this content
Log in