Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Jayashri Kailas Patil

Tragedy


3  

Jayashri Kailas Patil

Tragedy


मी मुंबई.

मी मुंबई.

3 mins 17K 3 mins 17K

मी मुंबई।देशाची आर्थिक राजधानी मुंबई।वेगवेगळ्या जातीधर्माच्या गरजवंतांची माय मुंबई।लहान,मोठा,गरीब,श्रीमंत असा कोणताही भेद मनात न ठेवता कुशीत येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून प्रेम,यश देण्याचं ध्येय हृदयाशी बाळगणारी मी मुंबई।

माझ्या वात्सल्यरूपी अस्तित्वात सहारा शोधायला येणाऱ्या प्रत्येकाची माझ्यासाठी एकच ओळख,आणि ती म्हणजे मुंबईकर। मी मुंबई आणि माझा मुंबईकर।

हे मुंबईकरा।१५ऑगस्ट स्वातंत्र्य सुवर्ण दिनाच औचित्य साधून मला तुला काहीतरी सांगायचंय रे.माझ्या काळजाच्या तुकडा,मुंबईकरा पैसा, प्रतिष्ठा,आधुनिकता, कर्तव्य,जबाबदाऱ्या याला महत्व देत असतांना,थोडं स्वतःच्या जीवलाही जप रे बाबा.कारण कधीकधी दगदग,धावपळ करतांना तू इतका बेधुंद होऊन जातोस की,जीव हा पाण्याचा बुडबुडा हेच विसरून जातोस.पण खरं सांगू का मुंबईकरा,तुझा हा असा निष्ककाळजीपणा माझ्या हृदयाची धडधड वाढवतो रे।खरं म्हणजे नौकरी, व्यवसायनिमित्त तू घरातून बाहेर पडतोस ते जीव मुठीत घेऊनच।

कारण तूच म्हणतोस मुंबईत सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल याची खात्री नाही.

मुंबईकरा।ही तुझी घाई,गडबड कितीतरी संकटांना खुले आव्हान देते रे।त्या खुल्या आव्हानात तू तर निघून जातोस, पण तुझ्या या आईच्या काळजाचे मात्र तुकडे होतात रे।या स्वतंत्र भारतात जीवन जगतांना, तू भारताची आर्थिक राजधानी म्हणून मला नावारूपाला आणतोस, एक लक्ष्मीच रूप मला समजतोस.मग थोडे माझही ऐक ना।

अरे तुला दहशतवादातून मुक्ती मिळावी म्हणून अनेक माझे पुत्र शहीद होतात रे।आणि तू,तू मात्र त्या सुंदर जीवनाची किंमत करत नाहीस.काही ठिकाणी तू असा वागतोस की मला प्रश्न पडतो की,तू असा का वागलास?२९ सप्टेंबर २९१७ चा तो दिवस,अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.२९ सप्टेंबर चा तो दिवस म्हणजे माझ्या म्हणजेच मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस।तुला ठाऊक आहे ना ३० सप्टेंबर दसरा सणाचा दिवस म्हणून मी किती खुष होती।कारण प्रत्येक दसऱ्याला माझा मुंबईकर अगदी लाईफलाईन लोकलपासून तर माझा अभिमान असणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया पर्यंत फुलांनी सजवून माझे सौंदर्य खुलवतो.पण म्हणतात ना रे सुखाची कल्पना आगाऊ करू नये,नजर लागते।अगदी तसेच झाले.२९ सप्टेंबर ला माझा मुंबईकर नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर पडला.दुसऱ्या दिवशी दसरा म्हणून कुणी फुले आणायला तर कुणी विकायला।मी बघितले साधारण १०:००/१०:१५ च्या सुमारास काही मुंबईकर परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर येऊन पोहचले.आणि का?कसे?कुणास ठाऊक?अचानक पावसाला सुरुवात झाली।माझा मुंबईकर पुलावरच थांबला.पुलावर मोठया संख्येने जमलेले मुंबईकर कधी आकाशाकडे बघत तर कधी मनगटावर बांधलेल्या घड्याळीकडे बघत,पाऊस कधी थांबेल याची वाट बघू लागला.विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पाहून मला तर क्षणिक वाटले की,ही कुण्या दुर्घटनेची पूर्वसूचना तर नाही ना?मी घाबरले,पण थोड्या वेळानंतर पाऊस थांबला,मलाही बरे वाटले.पावसाचा जोर ओसरलेला बघून माझा मुंबईकर,ठरलेल्या मिशन वर जाण्यासाठी सज्ज झाला.

थोडीशी विश्रांती घेऊन थांबलेला मुंबईकर मोठ्या ओघाने बाहेर पडण्यासाठी निघाला,तोच एका फुलविक्रेत्याच्या

गोणीतिल फुले खाली पडू लागली.जिवाभावाचा स्वभाव असणारा माझा एक मुंबईकर लगेच सावध करत त्याला म्हणाला"अरे!भाई सुनो फुल गिर रहा है!"कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या माझ्या मुंबईकराने ऐकले, 'पूल गिर रहा है'!मग काय एकच गोंधळ पुल गिर रहा है!,पूल गिर रहा है!एकाच चुकीच्या शब्दसहित मुंबईकर सैरावैरा धाऊ लागला.धावता, धावता क्षणात एकमेकांवर कोसळून,,,,प्राणहीन झाला।चेंगराचेंगरी भयानक चेंगराचेंगरी।जिने माझे २३ मुंबईकर क्षणात गिळून टाकले।कितीतरी दिवसापासून मातृत्वाच्या पंखाखाली जपून ठेवलेली माझी लेकरे,मृत्यूच्या कुशीत निजले आणि मी काहीही करू शकले नाही.मी फक्त परमेश्वराला प्रश्न केला का?रे बाबा असा खेळ मांडला?सगळं संपलं,क्षणात सारं उद्ध्वस्त झालं।नवरात्रीचा नववा दिवस म्हणून ,फुलांनी सजवलेलं के इ एम हॉस्पिटल,प्रेतांच्या राशींनी न्हाऊन निघालं।दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माझ्या मुंबईकरांच्या माथ्यावर नोंदवलं गेलं बॉडी न.१,बॉडी न.२,,,,,,,,,,,,बॉडी न.,,,,,,।सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या माझ्या मुंबईकरला माहीत होतं का की,त्याचा बॉडी न.काय असेल?

११ वर्ष वय असलेल्या रोहीत ला माहीत होतं का की,शाळा बुडवून बाबांसोबत फुले विकायला जाण्याचा हट्ट त्याचा जीवचं घेऊन जाईल।

सुमालता शेट्टी,सुजाता शेट्टी यांना तरी माहीत होतं का की,दसऱ्याला जी फुले त्या बाजारात विकत घ्यायला निघाल्या,तिचं फुले त्यांच्या मृत देहावर साम्राज्य गाजवतील।

मिसेस टेरेसा फर्नांडिझ यांना तरी माहीत होतं का की,आपल्या ८ महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन त्या फुले विकत घ्यायला गेल्या की,मृत्यू?

२५ वर्ष वय असलेल्या श्रद्धा वरपे ला तरी माहीत होतं का की,मृत्यूने तिच्यासाठी चक्रव्यूह रचून ठेवलेला आहे."बाबा तुम्ही पुढे चला मी आलेच!"असे श्रद्धाचे शब्द ज्या पित्याने ऎकले, त्या पित्याला क्षणभरानंतर तिचा मृतदेह बघायला मिळावा?यापेक्षा दुर्दैव ते काय।अॅलेक्स कोरिया,मुकेश मिश्रा,प्रियांका पासलकर,सत्येंद्र कानोजिया,अंकुश जैस्वाल,सुरेश जैस्वाल,चंद्रभागा इंगळे,विजय बहादूर,ज्योतीबा चव्हाण,मुश्ताक रियान, मीना वाल्हेकर,मयुरेश हळदणकर,मसूद शेख,शकील भाई,यांना तरी माहीत होतं का की,मृत्यू त्यांची आतुरतेने वाट वागतोय।हे निर्माणकारा,का असा खेळ मांडलास?

हे मुंबईकरा,एका अफवेच्या डावाने,काळरुपी मृत्यूने मात्र बाजी मारली रे।

स्वातंत्र्य दिवसाला तुझ्या स्वातंत्र्याची आठवण करून द्यावी म्हणून तुझ्यासमोर मन मोकळं केलं रे बाबा।

जप ,स्वतःच्या जीवाला जप रे बाबा।


Rate this content
Log in

More marathi story from Jayashri Kailas Patil

Similar marathi story from Tragedy