पाठलाग
पाठलाग
1 min
2.7K
लहानपणी ठीक होते रे की मी फार अजाण होते,
तेव्हा खरच मला सहनशक्तीची जाण नव्हती.
पण जेव्हापासून तू माझ्या पाठीमागे लागलास,
तू तर माझ्या आयुष्याचा रंगच बदललास
नाही नाही म्हणते तरी तू पाठीमागे येतोस,
का बरं माझ्या मनाशी असा खेळतोस?
आयुष्यातील सप्तरंगांना तू काळं केलं आहेस,
मनातील नाजूक भावनांना तू दुखावलं आहेस.
क्षणिक सुखासाठी जीव झालाय रे भुका,
आतातरी पिच्छा सोडशील का जीवनातल्या दुःखा,
आतातरी पिच्छा सोडशील का जीवनातल्या दुःखा?