Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.1  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

स्त्री मनाची एक खंत...

स्त्री मनाची एक खंत...

7 mins
396


इंजिनीरिंग करून नामांकीत कंपनीत जॉब करत असता ओळखीतले स्थळ सांगून आले.. घरात मोठी त्यात आजी- आजोबा नाही त्यामुळे आई- बाबा यांनीं योग्य तो विचार करून होकार देऊया असे म्हणत तिचे मत वळवायचा प्रयत्न केला..


आई म्हणाली, हे बघ मधू आपल्या घरात जाणत माणूस कॊणी नाही ग... घरात म्हातार माणूस असल म्हणजे अनोळखी ठिकाणी सोयरीक झाली तरी काही वाट्त नाही.. त्या माणसांना पारख असते.. तुझे बाबा आणि मी दोघेही या बाबतीत अनुभवाने, वयाने लहान आहोत बाळा.. त्यामुळे सागरच स्थळ आम्हाला योग्य वाट्त बघ.. आपली जुनी ओळख आहे.. अन् घरापासून पण तू जास्त लांब नाही जाणार.. तालुक्याला आलो की तुझी भेट होईल.. मला समजतय बाळा, आताच तुझे शिक्षण पूर्ण करून तूला नोकरी लागले.. पण, या बाबतीत मी तुझ्या बाबांना त्यांच्याशी बोलायला सांगेन.. मग् तुझी काय हरकत आहे सांग मला?


मधुरा मात्र गप्पच.. काय बोलाव काहीच कळत नव्हतं तिला...

तुला दुसर कॊणी आवडत का?... आई

नाही ग आई.. पण सागर खूप मोठा आहे.. ५ वर्षाने... मधुरा

आई हसून म्हणाली, आग तुझे बाबा माझ्यापेक्षा ८-९ वर्षाने मोठे आहेत.. असे असतंच ग..

मला नकोय एवढ अंतर... मधुरा

हे बघ, वयाचा मुद्दा सोडला तर... बाकी काही आहे का? आई म्हणाली.

नाही.. तोंड थोड खट्टू करून मधुरा म्हणाली..


पुढे सर्व बोलणी झाली, पत्रिका जुळली... बघण्याचा कार्यक्रम देखील झाला... सागरचे बाबा म्हणजे विजयकाका बाबांचे अगदी मित्रसंबंध होते.. सगळे एकत्र बसून गप्पा मारता मारता मधुला सर्वांचे स्वभाव आवडले.. दोन्ही बाजूने होकार आला, लगेच मुहूर्त, पत्रिका, खरेदी सर्वांची गडबड करत लग्न करून मधुरा सासरी आली..


नवनवीन दिवस अगदी आठवणीत राहतील असेच होते.. सागर खूप काळजी घायचा मधुराची... खुप् जपायचा... तिला ऑफिस ला सोडण, घेऊन येणे.. तिला प्रत्येक कामांत मदत करायचा.. घरात सासू-सासरे, दीर, आजीबाई होत्या पण प्रत्येक जण प्रत्येकाची प्रायव्हसी जपत असे त्यामुळे घरातले वातावरण हसत-खेळत असायचं...


दोन-तीन महिने अगदी मजेत गेले... तसे एवढ्यात मूल नको असे प्लांनिंग करायच्या आधीच मधूच्या पोटात दुखू लागले.. खुपच त्रास होत होता त्यामुळे सगळे काळजी करत होते.. दवाखान्यात नेले.. टेस्ट केली आणि गोड बातमी आली सर्वच खूप खुश होते.. मधुचा चेहरा मात्र सागरला बरच काही सांगून गेला.. त्याने मधूचा हात हातांत घेत म्हटलं.. काय झालं? खुश नाहीस का तू?


तसे नाही पण मी... इतक्यात.. कस सांगू.. मला नाही कळत.. मधुरा

हे बघ तुझ्या मनाची तयारी नसेल तर आपण नंतर विचार करू परत.. सागर


दवाखान्यात खोलीच्या बाहेर असलेल्या मधुच्या आईनं हे सारं ऐकले.. आणि तशीच आत आली.. माफ करा जावई बापू मध्येच बोलते, सहज कानावर पडल, चोरून नाही ऐकलं तुमचे बोलणे..


अहो, आई असे का म्हणताय? माफी का मागताय?... सागर


पहिल-वहील दान.. देवाने न मागता दिलय त्याला नाही म्हणू नका.. लोकांना वाट पाहावी लागतें.. तुम्हाला आपणहून मिळालय.. राहता राहीला प्रश्न तुमच्या काही अपेक्षा असतील, हौस असेल.. फीरण, बागडण राहीलं समजू शकते.. पण बाळ थोडे मोठे झाले की आम्ही आजी आहोत ना आम्ही सांभाळू त्याला.. तेव्हा तुम्ही तुमची हौस करा... मधूची आई म्हणाली.


आजीने सुद्धा त्यांच बोलणं ऐकलं त्यांनी सुद्धा तेच सांगितलं...


हो नाही करत मधुरा तयार झाली.. सागर खूप प्रेमळ होता.. आता तर तिला जिवापाड जपत होता..


मधुराला आईचं बोलणं ऐकल्याचे समाधान मिळत होते.. सागर आणि बाळ दोघांच्या बाबतीतले..


तिसरा महिना लागला, त्रास होऊ लागला... डॉक्टरांनी पूर्ण आराम सांगितला.. नोकरी सोडावी लागणार म्हणून मधू परत नर्व्हस झाली.. सागरने तिची खूप छान समजूत काढली...


महिन्यांमागून महिने गेले... लवकरच तिने छोट्या गोंडस परीला जन्म दिला... आनंदी आनंद झाला.. त्या छोट्या परीसोबत तिचा अख्खा दिवस जायचा.. बाहेरच्या जगाचा तिला विसरच पडत चालला होता..


परी मोठी होत होती तशी अजूनच मस्ती करत होती.. नाकी नऊ यायचे तिच्या.. ३ वर्ष कशी गेली कळलीच नाही..

शाळेत घालायला हवी म्हणून फॉर्म भरला, इंटरव्युसाठी शनिवारी शाळेत जायचं होते.. घरात सर्वांनाच या बदलत्या पद्धतीचे आश्चर्यच वाटले.. नर्सरीच्या अॅडमिशनच्या वेळेस इंटरव्यु??


छोटी परी आणि मधुरा शाळेत गेले.. सागरला नेमकी मीटिंग होती त्यामुळे त्याला काही ती वेळ साधण जमले नाही..


इंटरव्युसाठी प्रिन्सीपलने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर परी खूप छान देत होती.. ABCD बोलणे, नंबरस बोलणे, फळे,भाज्या नाव.. प्रिन्सीपल खूप खुश झाल्या.. सगळेच मस्त आहे.. मिसेस देशमुख तुम्ही काय करता?


मधुरा हळूच म्हणाली, सध्या घरीच आहे..


इंजिनीरिंग करून तुम्ही घरीच आहात? इंजिनीरिंगची एक सीट तुम्ही वाया घालवलीत... जोक्स अ पार्ट.. असे हसुन म्हणाल्या..


मधुराच्या कानात माञ ते शब्द अगदी घुमत होते.. सागर शाळेच्या गेटवर घायला आला तरी तिचे लक्ष नव्हते..


काहीतरी गडबड आहे.. सागरच्या लक्षात आले..

घरी गेल्यावर बघू असे म्हणून त्याने काही विषय काढला नाही...


मधुचे लक्ष कशातच लागत नव्हते... रात्री सर्व आवरल्यावर जेव्हा परी झोपली तेव्हा सागरने विषय काढला.. काय झालंय मधु?


काही नाही.. मधुरा रागातच म्हणाली..


अगं खरच मीटिंग आली माझी म्हणून आलो नाही मी शाळेत... सागर


मी कुठ काय बोलते.. मधुरा


अग मग चिडलेस का?... सागर


काही नाही स्वतः त्या प्रिन्सीपलच्या खुर्चीत बसली तर मला म्हणते, इंजिनीरिंगची एक सीट तुम्ही वाया घालवलीत... वर परत हसतं जोक्स अ पार्ट.. म्हणुन..


आता सागरला सर्व लक्षात आले.. तो हसुन म्हणाला एवढंच ना...


हस अजून.. खरच वाया घालवली मी सीट असे म्हणतं मधुरा रडू लागली..


सागर जवळ घेऊन म्हणाला, रडू नको ग... खरच वेडाबाई आहेस तू..


तुला नाही कळणार... खरच तुम्हा पुरुषांचे बरे असते.. सगळे अड्जस्ट आम्ही बायकांनीच करायच.. एवढा अभ्यास करून शिकायच.. चांगले मार्क्स, नोकरी मिळवायची आणि नंतर सगळं सोडून घरात बसायचं.. "खरच काय उपयोग ह्या शिक्षणाचा? काही फायदा आहे का?"


मधू तू आधी शांत हो... आणि मला सांग काहीच फायदा नाही का तुझ्या शिक्षणाचा?... सागर


सागर असे बोलल्यावर ती शांत झाली.. विचारात हरवली.. तेवढ्यात परत एकदा चाहूल लागलेल्या बाळाची तिला आठवण झाली.. पोटावरून हात फिरवत म्हणाली.. हे अस होत बघ.. चिडले की काही लक्षात रहात नाही माझ्या.. आज दिवसभर या गोष्टीवरून एवढी चिडले ना कि या गोष्टीची आठवणच राहिली नाही..


म्हणून तुम्हाला सांगतोय मॅडम शांत व्हा.. पण नाहीच.. सागर हसुन म्हणाला... हे बघ मला तुझी चिडचिड समजते पण हा कठीण काळ आहे.. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हा‌वे या साठी प्रत्येक आईला हा त्याग करावाच लागतो.. देवाला सुद्धा माहिती आहे की, आई एवढा बाळाचा छान सांभाळ, चांगली शिकवण, उत्तम संस्कार कोणी करू शकत नाही.. परी बघ आपली किती ऍक्टिव्ह आहे.. कोणामुळे? तुझ्यामुळेच ना.. आणि तिच्याकडून कस करून घ्यायचं? काय शिकवायच हे तूला किती छान समजत.. मला नाही ते जमत.. म्हणुन काय मी अस म्हणू का? बाबा म्हणुन माझा काय फायदा? असे मी बोलू का?


मधुराला त्याचे बोलणे पटले, मी नाही म्हणणार असं काही परत.. माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या मुलांना, कुटुंबाला होणाऱ हे विसरूनच गेले मी.. आता परत कधीही असा विचार करणार नाही.. सॉरी..


सागर तिला म्हणाला, आपले येणार बेबी थोडे मोठे झाले की तूला हवे तें कर तू.. पैशा साठी नाही हं... तुझ्या आनंदासाठी... मी नेहमीच तुझ्या सोबत आहे...


दुसरा मुलगा झाला.. सगळ्यांना आनंद झाला.. त्यांच्या कुटुंबाची चौकट पूर्ण झाली.. दोन्ही मुले खूप गुणी.. परी आपल्या लहान भावाला खूप छान सांभाळून घ्यायची..


सागरच्या मित्राचा मुलगा इंजिनीरिंग करत होता.. पहिल्याच वर्षी M1, M2 दोन्ही राहिले... काय करू सागर सांग ना.. क्लास लावायला पण तयार होत नाही.. त्याचा मित्र बोलत होता.. हे ऐकताच सागरच्या डोक्यात कल्पना आली..


त्याने घरी येऊन मधुराला विचारले, इंजिनीरिंगचे मॅथ्स क्लास घेशील का?


मधुरा ऐकतच राहिली.. कस शक्य आहे? एवढ्या वर्षाने?


काहीच अशक्य नाही.. सागर


सागरने तिला सर्व सांगितलं... तिला तयार केले... आपल्या मित्राला फोन करून सांगितल.. मित्र तयार झाला.. काकू क्लास घेणार म्हणून त्याचा मुलगा सुद्धा तयार झाला..


मधुराच्या क्लासचा श्री गणेशा झाला... त्याची प्रगती बघून अजून बरेच जण कलासला येऊ लागले.. घरी राहून क्लास घेता येतं होते त्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत होते.. घरंच सर्व बघून ती क्लास घेत होती..


आज बऱ्याच वर्षांनी तिच्या शाळेचे रीयुनियन होते.. सर्व  मित्र- मैत्रिणी जमले.. त्याच शाळेत परीच्या शाळेची प्रिन्सिपल बघून तिला जरा वेगळेच वाटले... शाळेतल्या मैत्रिणींनी जुनी ओळख सांगितली.. तिच्याच शाळेत वेगळ्या तुकडीत होती ती.. हिंदी, मराठी भाषा निवडून तिने शिक्षण पूर्ण केले.. तिला इंजिनर व्हायचं होत पण.. घरच्या लोकांनी नाही म्हंटलं..


आता मधुराच्या लक्षात आल.. ती अस का म्हणाली? एवढा बदल झालेला तिच्यात की मधुरा आेळखुच शकली नव्हती.. शाळेत असताना मधू तशी अभ्यासात गर्क असायची....


सर्व मैत्रिणी मात्र मधूचे कौतुक करत होत्या... दोन लहान मूल असून क्लास घेतेस.. खरच.. मधू कस करतेस ग... नाहीतर आम्ही.. आमच्या शिक्षणाचा काय फायदा? घरातच बसलोय... मधुराने हसुन सर्वांना समजून सांगितलं की, मी पण असेच बोलायचे पण सागरने मला समजावून सांगितलं आणि मग मी स्वतःकडे बघायचा दृष्टीकोन बदलून टाकला... आता सुद्धा त्याची साथ आहे म्हणून माझ्या शिक्षणाचा फायदा होतोय... जॉब करायला मिळाला नाही म्हणून वाईट वाटायचं... पण, आता ह्या मुलांना शिकवताना वेगळाच आनंद मिळतो बघ.. असे सांगताना मधुराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती...


मैत्रिणींनो कथा पुर्ण काल्पनिक असली, तरी आजू बाजूला दिसून येईल अशीच आहे.. प्रत्येक स्त्रीला मातॄत्वाच्या वाटेवर अनेक त्याग करावे लागतात.. पण काय निसटून गेलय याचा विचार न करता काय मिळवू शकतो, आहे तें सुंदर कस करू शकतो याचा विचार करा.. मग् आयुष्य कस बदलून जाईल बघा... आणि चुकूनही म्हणायचं नाही किंवा मनात आणायचं नाही,

आमच्या शिक्षणाचा काय फायदा? हा विचार सुद्धा मनाला शिवून द्यायचा नाही... पटतय ना तुम्हाला....??


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational