Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.5  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

सोशल मीडिया एक वादळ

सोशल मीडिया एक वादळ

8 mins
477


इतका वेळ झाला तन्वी अजून कशी आली नाही? एवढा उशीर कधीच होत नाही... सुजाता इकडून तिकडे फेर्या मारत होती तन्वीच्या काळजीने फोन हातात घेऊन सारखा फोन करत होती... फोन पण स्वीच ऑफ येत होता.. ह्या मुली ना सारखेच त्या फोनशी चाळा करत असतात त्यामुळे जेव्हा हव ना तेव्हा फोन कधीच लागत नाही.. काय उपयोग ह्या फोनचा? जर वेळेला लागत नसेल? ह्यांच्याशी बोलता याव, उशीर होणाऱ असेल तर संपर्क करता यावं म्हणून हा फोन.. पण नाहीच काही उपयोग नाही.. जीवाला घोर लावतात ही मुले, अरे सनी तूला अजून कोणाचे नंबर माहीती असेल तर लाव की फोन.. काय ते हेडफोन्स लावून गाणी ऐकतोस... ( रागाने हेडफोन्स ओढले तीने) हे आले ना की सांगतें ह्यांना कसे वागता तें...


ओह्ह मॉम गप ग... जस्ट चिल.. सनी


सुजाताने डोळे काढले, तसा सनी तीच्या गळ्यात हात घालून प्रेमाने म्हणाला, मी बघतो... शांत हो...


तेवढ्यात तन्वी आली...


काय ग एवढा उशीर....?? सुजाता


ओह्ह्ह कम ऑन मॉम... आता आल्या आल्या सुरवात करू नको... तन्वी


अगं तूला उशीर होणार होता तर कळवायच होत ना... उगाच माझ्या मनात तुझ्या काळजीने विचारांचे वादळ उठत ना.... सुजाता


आज सान्वीची बर्थडे पार्टी होती, किती मस्त सेलेब्रेट केले त्यांनी.. काय ती पार्टी.. काय डेकोरेशन.... काय सांगू तूला ... तन्वीचा चेहरा आणि डोळेच जास्त बोलत होते..


सुजाता बघतच बसली... अविनाश काही कामा निमित्ताने बाहेर त्यामुळे ती आणि दोन मुले असली की ती बारीक सारिक गोष्टींची देखील काळजी करायची..

मनात स्वतःलाच म्हणाली, आता शांत हो, आले ना लेक..


दुसऱ्या दिवशी सनी ओरडत ओरडत बाहेर आला आई.. आई...


सुजाता मनात म्हणाली मॉम बोलता बोलता परत आई वर आला म्हणजे कायतरी गंभीर आहे, पडला की काय हा? काय झाले?


धावत धावत त्याच्या खोलीत गेली, त्याने जे दाखवले तें बघून सुजाता तिथेच बसली.. कपाळाला हात लावुन...


कालच्या पार्टीत काही बड्या बापाची वाया गेलेली मुले पण होती.. त्यांनी मुलींचे काही फोटो नकळत काढले की काय? अशी शंका मनात आली कारण त्यात तन्वीचा फोटो पण होता आणि आज सर्व बॉयझ व्हाट्सअप गृप वर तो फोटो फिरत होता.. अगदीच घाणेरडा फोटो नव्हता.. पण छोटे छोटे कपडे आणि त्यामुळे होणारे अंगप्रदर्शन अगदी उठून दिसत होते..


सुजाता म्हणाली, अरे काल हि आली तेव्हा तर वेगळेच कपडे होते... म्हणजे हे कपडे कसे आले हिच्याकडे...


रागातच ती तन्वीच्या खोलीत गेली... ह्या मॅडम झोपलेल्या... सुजाताने रागातच अंगावरल अंथरूण ओढत तिला उठवलं... तन्वी आईला असे बघून खूप घाबरली...


सनीने त्याचा मोबाइलल दाखवला, सर्व प्रकार तिच्या लक्षात आला, तीने आईला सांगितलं, सान्वीनेच आम्हाला असे ड्रेस दिले घालायला...


खूप घाणेरड्या कंमेंटस येत होत्या, हे सर्व ऐकून सुजाताचे डोक सुन्न झाले... तिला काहीच सुचत नव्हते, आता हा फोटो आणि मेसेज किती जणांना गेलाय काय माहिती? तिला काहीच सुचत नव्हते, तीने सुवर्णाला म्हणजेच तिच्या बहिणीला फोन केला... ती जवळच रहात होती, आणि एका सॉफ्टवेर कंपनीत कामाला होती...


बहीणीचा रडवेला आवाज ऎकून, सुवर्णा धावतच आली.. सगळा प्रकार बघताच त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे सुवर्णाला समजले..


पण चिडुन, ओरडून काहीच उपयोग नाही, शांतपणे सर्व सांभाळायला हवे... तीने सुजाताला सांगितलं, हे बघ ताई तुझी काळजी साहजिकच आहे.. पण तू ओरडलीस तर ती खरे काही सांगणार नाही...


सुवर्णा मावशीला बघितल्यावर तन्वी खूप रडली, कारण सर्वात छोटी मावशी असल्यामुळे मैत्रीचे नाते होते. मावशी प्लीज विश्वास ठेव फक्त फोटो काढले ग मी हौस म्हणून, पार्टी मध्ये ते कपडे घालून अनइझि वाट्त होते म्हणून बाकी मुले यायच्या आधीच आम्ही चेंज केले आणि लगेच निघून आले, आणि तें फोटो मी कुठेच शेअर केले नाहीत.. आपण नेहमीं पिक्चरमध्ये बघतो ना असे ड्रेस होते म्हणून फोटो काढले ग... मला नाही माहित हे असे कॊणी केले...


सुवर्णा तिला म्हणाली, तनु तू खूप लहान आहेस बाळा अजून, आता जमाना बदलत आहे त्यामुळे तुम्हाला एवढ्या लवकर हे फोन मिळतात, आणि या सोशल मीडिया नावाच्या समुद्रात तुम्ही उडी घेता.. पण हा समुद्र खूप मोठा आहे बाळा... एखाद वादळ आले ना तर त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता आपल्याला माहिती आहे का? आपण तेवढे सक्षम आहोत का? हा विचार सुद्धा तुम्ही मुले करत नाही...


तन्वी, मला सांग तुमचे व्हाट्सअप स्टेटस, डीपी, फेसबुक अपडेट, इन्स्टाग्राम सगळीकडेच फोटोची चलती असते, तें फोटो आपण पोस्ट करताना तें कोणाला दिसू शकतात सांग मला, तुमचे फ्रेंड्स जे लिस्ट मध्ये आहेत किंवा कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत त्यांना व्हाट्सअपचे बरोबर की नाही? तुमच्याच गोष्टी तुम्ही पब्लिक केल्यावर पर्सनल कसे राहीलं? सांग मला.. स्क्रीनशॉट काढला की, फोटो कोणीही घेऊ शकतो बरोबर कि नाही, म्हणूनच खूप विचार करावा प्रत्येक गोष्टीचा...


फायदा आहे तिथे तोटा हा असतोच... त्यामुळे काहीहि माहिती नसताना किंवा अर्धवट माहीती असतंना या समुद्रात उड्या मारू नका.. पण, तुम्हाला आमचे बोलणे पटत नाही.. असो माझे दीर सध्या सायबर क्राईम डिपार्टमेंटला आहेत, त्यांना सांगतें मी...


तेवढ्यात सान्वीचा फोन आला, ती पण रडत होती कारण तिनेच तें फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवले होते, आणि तिच्या काही फोटोंचे अश्लील एडिटींग करून ते फोटो फॉरवर्ड झाले होते....


सुवर्णाने आणि तिच्या दिरांनी मिळून या प्रकरणाचा छडा लावला तर आरोपी हा सान्वीचा जुना ड्राइवर होता, त्याचा नंबर सान्वीने सेव केला होता तो डिलीट करायचा विसरून गेली आणि तिच्या बाबांनी त्याला कामावरून काढले म्हणून त्यांनी तो राग असा बाहेर काढला...


थोडक्यात सर्व काही निभावले आणि वेळीच लक्षात आल्यामुळे धोका टळून गेला होता... पण या सर्व मुलींना तसेच मुलाना सुद्धा आपण काही माहिती दिली पाहिजे.. म्हणून तिने तन्वीला आणि तिच्या काही मैत्रीणींना छोटीशी पार्टी द्यायच्या निमित्ताने एकत्र बोलावले, मावशी आता सगळ्यांचीच मावशी कमी आणि मैत्रिण जास्त झाली होती... तीने खूप उदाहरण देऊन सर्वाना या सोशल मिडीयामुळे एखाद वादळ येऊन आयुष्य कसे उध्वस्त होते याची कल्पना दिली मग् ऑनलाईन बँकिंग असो नाहीतर तुमचे सोशल अपडेटस असो... त्याचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा आहे.. तुमचे प्रकरण सुद्धा वेळीच लक्षात आले नसते तर त्याचे परिणाम किती भयंकर झाले असते आणि हे सर्व मी तुमची मैत्रिण म्हणून सांगतें...


आज तेच मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे, आई- ‌वडीलांचे न ऐकणार्या मुली आज मावशीचे मात्र सर्व ऐकत होत्या.. कारण त्यांनी नुकतेच सोशल मिडीया नावाच्या वादळाचा तडका थोडा फार का होईना अनुभवला होता... तुमच्या आवडत्या गोष्टी व्हाट्सअप आणि फेसबुक डीपी व त्याचे स्टेटस ह्याबद्दल सांगणार आहे...


वॉट्सअँप च्या दुनियेतील ओळख प्रत्येकीचा डीपी असतो त्या वरून आपण पटकन ओळख तो अरे ही तर आपल्या ओळखीची आहे, नंबर जरी सेव नसला तरी आणि तो डीपी वरून कोणाला ओळखले तर फार आनंद होतो अरे आपण तर ओळखतो हिला.

मनाचा आरसा असतो डीपी, खूप छान छान असतात डीपी पाहुन लगेच मस्त आहे ग डीपी तुझा असे म्हणत असतो.. डीपी म्हणजे डायरेक्ट पर्सन

व्यक्ती दिसते न ती, डीपी पाहताना फार भारी वाटते , प्रत्येकीचे वेगळे असते , कधी चेहऱ्यावरील भाव , सांगून जातो डीपी कधी मनातला अंतरंग दाखवतो डीपी, कधी निसर्ग, कधी देवाचे दर्शन घडते डीपी मुळे , कधी कलेचे सौन्दर्य टिपतो डीपी.

दोन अक्षरांचा हा शब्द पण किती छान आहे नाही??


आजच्या आधुनिक युगात व्हाट्सअप आणि फेसबुक आपल्या स्मार्ट फोन मध्ये असतातच त्याच्याशी आपण इतके एकरूप झालो आहोत की आपल्या फोन मधील कुठलीही बाब असो आपले स्टेटस किंवा आपली पक्की ओळख सांगणारा डीपी म्हणा आपल्या हसऱ्या मनाला फुलपाखरू बनविणारा आपला प्रोफाईल फोटो आपल्या व्यक्तिमत्वाचा जणू आरसा असतो यावरून आपली आवड आणि आपली मनातील सर्व विचार आणि आचार या डीपी वरून दर्शवित असतात जिला खुप सजण्याची आवड आहे तिचे फोटो भरपूर दागिने घालून असतो तर अगदी माडर्न विचार असतील तर तसे डीपी असतात राजकारण व्यक्तीचा तास सुंदर आणि सोज्वळ असा फोटो असतो एकंदरीत काय तर मैत्रिणींनो हा डीपी आपल्या अगदी जवळच आपल्याला आनंद आणि भरपूर लाईक मिळवून देणारा आहे तो आपलं स्वतःची ओळख दर्शविणारा असतो.... पण मैत्रिणींनो यावरून आपली ओळख तर होतेच पण त्याचा एक तोटेही असतो तो म्हणजे कधी कधी आपला फोन हायजॅक होऊन आपल्या  व्यक्तिमत्वाला काळिमा लावू शकते म्हणून आपण ती ही  खबरदारी घेतली पाहिजे आपल्या फोनमध्ये आपल्या सुरक्षेसाठी काही सेेंटीग्ज असतात त्या समजून घ्यायला हवे..


फोटो म्हटले की आपले प्रतिबिंब... मग ते कसे असावे?यासाठी आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. कारण इंग्रजीत म्हण आहे की First impression is a last impression. मग आपले प्रथमदर्शनी चांगले चित्र दिसले पाहिजे. आता आपल्या विषयात हेच विचारले की तुमचा फोटो कसा असावा?आताचे युग हे मोबाईल,व्हँटस्अँपमुळे खूपच क्रियाशील झाले आहे.आपण आपले ओळखू यावेत म्हणून फोटो ठेवतो.मग हा फोटो ठेवताना कोणी स्वतःचा,कोणी निसर्गाचा, पाना फुलांचा,कोणी देवाचा,कोणी एखादा सुविचार असलेला,असे अनेक फोटो आपल्याकडून ठेवले जातात.हे ठेवण्यामागचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो.आणि या प्रोफाइल फोटोमुळे आपली एक ओळख जगासमोर येते. कारण प्रोफाइल चा अर्थच मुळी ओळख असा आहे. मग या फोटोमुळे आपली ओळख लक्षात येते. त्यानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. मला असे वाटते की आपण स्वतःला आरशात बघून नीटनेटके ठेवतो,असे का करतो.तर आपण चांगले दिसावे,पाहणा-यांनी चांगलं म्हणावं हा साधा सरळ अर्थ त्यामागे असतो. ओंगळवाणा फोटो कधीच आपण डीपीला ठेवत नाही. कारण ओंगळवाणा या शब्दाचा अर्थच मुळी घाणेरडे... मग मला सांगा आपण असे फोटो ठेवू का?नाही ना....!! फोटो आपला ठेवताना बरेचजण विचार करतात की आपला चेहरा हा फोटोजनिक असावा,म्हणून आपण अगदी साध्या पद्धतीने आवरण्याचा विचार करतो. कारण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.असा देखील काहींचा विचार असतो. थोडक्यात काय तर त्या व्यक्तीचा स्वभाव,आचारविचार फोटोवरून लक्षात येतो, काहीजण पानाफुलांचे चित्र डीपीला ठेवतात. त्यावरून त्यांची आवड लक्षात येते, स्वभावाची थोडक्यात ओळख होते. इतर फोटो ठेवण्यापेक्षा पानाफुलांचे फोटो ठेवले की आपल्यालाही शांत वाटते, मन प्रसन्न राहते, एक टवटवीतपणा येतो. निसर्गाची विविध रुपे अनुभवता येतात. काही जण देवाधिकांचे फोटो ठेवतात, म्हणजे मोबाईल हातात घेतला तर पहिल्यांदा ईश्वराचे दर्शन होते,त्यामुळे आपला दिवस हा चांगला जाईल.कारण आपल्यापेक्षा आपल्याला निर्माण करणारा हा विधाता इतका सुंदर आहे... म्हणून या विधात्याचे फोटो लावणे पसंत करतात. काहीजण सुविचार डीपीला ठेवून आपली विचारांची पातळी दाखवून देतात, पण दुसरे सांगायचे असे की या व्हाटस्अँपमुळे एकमेकांचे विचार, चित्र आपण एकमेकांना पाठवत असतो. डीपीबरोबरच आपण आता स्टेटसला सुद्धा छान छान फोटो ठेवतो. रोज ते बदलत असतो.ते इतरांनी पाहिले की मग आपली वाहवा होते, त्यावर आपण आपली मते मांडतो.. 👌👌👍🏻👍🏻 अशा चिन्हाने शिक्कामोर्तब करतो. पण अंतरंगात डोकावून कोणीच पाहत नाही की मी कशी आहे? किंवा कसा आहे? कधीकधी आपण स्वतः त्या विचारांप्रमाणे वागतो का? तर कदाचित उत्तर हो किंवा नाही यामधील असेल.


मला या विषयाला अनुसरुन एवढेच सांगायचे की मोबाईल, व्हाटस्अँप हे माध्यम खूप उपयोगी आहे त्यामुळे आपल्याला भरपूर शिकायला मिळाले आणि मिळते आहे, त्यामुळे त्याचा वापर हा उपयक्तच असावा. कारण त्याच्यावर ठेवणारा फोटो एका सेकंदात सगळीकडे पोहचतो, त्यामुळे तो सोबर असावा. आपल्याला शोभणारा असावा, आपली ओळख कायमची जपणारा असावा.आणि ओळख वाढवणारा असावा.


काही जण आपल्या व्यवसायाचे अपडेटस डीपीवर ठेवतात, त्यामुळे सातासमुद्रापार अगदी उंच भरारी घेऊ शकतात.. त्यानुसार त्यांचा व्यवसाय, नोकरी, परस्परांमधील संबंध अबाधित ठेवतात. आणि तुमची आजकालची तरुण पिढी तर अगदी तासातासाला डीपी बदलत राहतात. परंतु हे सर्व करताना सामाजिक सुरक्षेचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे, तुम्हाला सुद्धा पटतय ना आता??


मी तुम्हाला हे सर्व करू नका असे मुळीच सांगणार नाही.. हल्ली तुमची पिढी हे करते त्यामुळे तुम्हाला पण असे करावं वाटणार स्वाभाविक आहे. कारण हल्लीचे ‌प्रगत तंत्रज्ञान यामुळे 'इंटरनेट' सारखे एक चांगले माध्यम आपल्याला मिळाले आहे, अन् या माध्यमामुळे चांगल्या-वाईट या दोन्ही गोष्टींचा खजाना अगदी सहज उपलब्ध आहे, पण त्याच बरोबर तंत्रज्ञानाच्या या मायावी जाळ्यात अडकून आपले नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने 'सायबर सुरक्षा' व्यवस्थित समजून घ्यायला हवी...


सर्व मुलींना मावशीचे म्हणणे पटले, आणि या समुद्रात. वावरताना कोणत्याही वादळामुळे आमचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची आम्ही या पुढे काळजी घेऊ असे प्रॉमिस सुद्धा केले... मावशीने सुद्धा मुलींना हाय-फाय देत सेल्फी काढले, आणि आपण आपला ग्रुप करून तिथे आपले हे फोटो शेअर करूयात चालेलं ना मुलींनो... !! सर्वांनी होकार दिला आणि सेलेब्रेट केले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational