Vasudha Naik

Tragedy

3  

Vasudha Naik

Tragedy

संयमाची कसोटी भाग ६

संयमाची कसोटी भाग ६

2 mins
21


संयमाची कसोटी. भाग ६


  तीन महिने हे हॉस्पिटल मध्ये. माझी धावपळ सुरूच होती. मुलांचे अभ्यास, नोकरी चालू होती.

  कसेतरी तीन महिन्यानंतर यांना घरी सोडले. दुसरा दिवस उजाडला. पहाटे पाचला उठले. यांना पाहिले तर खूप घाबरले. यांना पूर्ण अंगावर फोड आले होते. मोठे मोठे फोड होते. अगदी गुप्त अंगी सुद्धा.आणि काही फोडामधून रक्त आणि पस येत होता. मी आणि हे हवालदिल झालो.

  मी डॉ. ना फोन केला "डॉ. मी यांचे काय करू आता. तुम्ही काल घरी सोडले. आज हे सर्व फोडाने भरले आहेत. मला काही सुचेना."

  डॉ. म्हणाले " वहिनी, घेऊन या परत मी पाहतो. दुसरे डॉ. बोलवतो. बघू काय झालेय. "

  मी यांना परत ऍडमिट केले. दुसरे डॉ. आले, ते म्हणाले "या पेशंटला खूप पेनीसिलीनची injections दिली असतील तर हे होवू शकते."

   त्यांनी स्किन स्पेशल डॉ. कडे पाठवले. इथे अजून एक वाईट अनुभव आला. यांना घेऊन गेले. डॉ. नी पाहिले. औषधे दिली व मला परत बोलवले, म्हणाले "मॅम तुम्ही इतक्या सुंदर आहात. असा कसा नवरा केला हो "

   मी ताबडतोब बोलले "हा माझा नवरा आहे गेली 25 वर्षे मी यांच्या बरोबर संसार करतेय. असे बोलू नका."जरा चिडूनच बोलून बाहेर पडले.

   काय डॉ. हे असे असतात का? खूप विचार येऊन गेले.

   परत दवाखान्यात गेलो. ट्रीटमेंट घेतली. परत महिनाभर तिथेच. दिवाळ सण तिथेच साजरा केला.पाच महिन्यानंतर हे घरी बरे होऊन आले.

   आता घराची वास्तू शांत केली. त्याच दिवशी मोठया मुलीचे लग्न जमले. माझ्या जुळ्या मुलींपैकी एकीचे लग्न जमले...

  जून 2010 लग्न झाले. हे बसूनच होते. माझी धावपळ होतीच. मदतीला माहेर, सासर दोन्ही होते.

  लग्न लागले. पार पडले. दिवाळीत परत यांना डोकेदुखी सुरु झाली...


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy