STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

संतान मोह

संतान मोह

4 mins
397

  माझा जन्म एका लहाणशा शहरात, एका साधारण परिवारात झाला होता. सधारणता मला जेव्हा चांगली समज आली व मी प्राथमिक शाळेत जायला लागलो होतो, तेव्हा आमच्या घराच्या समोर एक परिवार किरायाने राहत होता. त्याच्यां कडे माझ्या मित्राच्या घरी किरायाने राहणारे भाऊ व वहिणी रोजच अनेक वेळा येत असे. मी बरेच वेळा माझ्या मित्रा कडे जात असो, तेव्हा भाऊंची वहिणीची भेट होत होती. व आम्ही गप्पा-गोष्टि पण करत असो. त्यामुळे माझा व त्यांचा चांगला परिचय झाला होता. भाऊ व वहिणीचे लग्न होवुन बरेच वर्ष झाले होते. त्यांना काही संतान प्राप्तीचे भाग्य लाभले नव्हते. भाऊ एका सुत गिरणीत काम करत असे. संतान नसल्यामुळे भाऊचे सुत गिरणी मध्ये कामाला जाणे हे त्यांच्या मनावर अवलंबुन होते. ते बहुतेक रात्रीच्या ड्युटिला नेहमीच बुट्टी मारत असे. घरात दोघेच प्राणी असल्यामुळे त्यांना पैशाची विशेष टंचाई जानवत नव्हती. दोघेही फार सुखी व आनंदी होते. त्यांना बघुन जुन वाटे कि ते पति-पत्नि नसुन भाऊ-बहिणच आहे असा भास होत होता. ते पति-पत्नि आहे याच्यावर कोणाला फारसा विश्वास होत नव्हता. कधी त्यांच्यात फुगा-फागी किंवा टंटा या वाद-विवादा सारखे पति-पत्नि मधील प्रश्न अगदी गौण होते. त्यांना संतान नाही याची खंत त्यांच्या चेह-या वर कधी दिसत नव्हती. पदरी पडले आणी पवित्र झाले.माझ्या घरा समोर त्यांचा भाचा राहत होता. संबंधा प्रमाणे त्यांचा मुलगा नातु म्हणुन सारखे खेळवत व लाड करत असे. त्या नाता मध्येच आपल्या मुलाचे रुप बघुन आनंदी होत असे. असे बरेच वर्ष सारखे चालु होते.

        माझ्या वडिलांना पंचाग व राशी आणी जन्मकुंडली काढता येते होती. पण त्यांचा या ज्योतीष्य शास्त्रा वर तीळ भर पण विश्वास नव्हता. एकदा ते आपल्या गांवच्या ओसरीत बसले असतांना गांवातील काही बुजुर्ग माणसे त्याच्या कडे आले होती. व त्यांनी त्यांच्या समोर पंचाग़ ठेवुन, काही प्रश्न त्यांना विचारले होते. माझ्या वडिलांनी कधी पंचागाचा अभ्यास केला नव्हता. त्यांनी पंचागा विषयी काहीच माहित नव्हते. त्यामुळे ते आलेल्या बुजुर्ग किंवा वडिलधारी मंडळीला काही सांगु शकले नव्हते. तेव्हा एका पितातुल्य गावक-याने माझ्या वडिलांना एक प्रश्न केला कि बापु मी अशे ऐकले आहे कि तु इथुन-इतक्या भागात सर्वात जास्त शिकला आहे. आणी म्हणतो कि तुला हे काही समजत नाही. जर तुला काही यातील येत नाही तर तुझ्या शिक्षणाचा आम्हां गांवक-याना काय उपयोग ?. या प्रश्नाचा त्यांच्या मना वर फार परिणाम झाला होता. ते एक कटु सत्यच होते. व त्यांनी नंतर या सर्व गोष्टि शिकला होत्या. त्यांनी आम्हा सर्व मुलांना पण शिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्या मध्ये माझा मोठा भावाने आणी त्याच्या मित्राने, त्यात जातीने लक्ष घातले होते. नंतर माझ्या भावाच्या मित्राने, जो आमच्या घराच्या जवळच राहत असे. त्या ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. जिथे पिकतं तिथे विकतं नाहीं. सुरुवाताला ते असेच परिचित व मित्रांचे भविष्य सांगत होते.नंतर त्याना आमच्या जिल्हात, जिल्हाच्या ठिकाणी सरकारी नौकरी लागली होती. समोर त्यांना अनेक पुस्त्के वाचुन जोतिष्य शास्त्रावर प्रभुत्व जमवले होते. प्रयत्ने वाळुचे कण रगडीता गळे तेल.

      आता त्यांचा भविष्य सांगने एक व्यवसाय झाला होता. सुट्टिच्या दिवशी त्यांच्या कडे भविष्य बघणा-याची झुंबड होत होती. पी हळदं अन हो गोरी. काही काळानंतर लोकांना विहित कार्यासाठी नोंदणी करावी लागत असे. जरी ते बहुजन समाजाचे असले तरि त्यांची ख्याती आता पंडित किंवा शास्त्री म्हणुन होती. अति परिचयता अवज्ञा. त्यामुळे ते आमच्या साठी फ्क्त मोठे भाऊंच व इतरान साठी मित्र व कर्तबगार मुलगाच होते. भाऊ व वहिणी आणी शास्त्री हे एकाच जातीचे किंवा कदाचित संबंधी पण होते. त्याच हस्तरेखाशास्त्रज्ञ ने भाऊ व वहिणीचे हात बघुन त्यांना सांगितले कि भाऊंचे दुसरे लग्न निश्चित होणार !. असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.पण भाऊंचा याच्यावर फार विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या जीवणाचे ध्येय ठरविले होते. कोल्हा काकडीला राजी. त्यांना फक्त वहिणी सोबतच संसार करायचा होता. दुसरी पत्नि करुन जीवचे अष्टकोणी वाटोळे करुन घेण्या इतकी आर्थीक क्षमता त्यांची नव्हती. पण जातीच्या ज्योतिष्याने सांगितले होते कि भाऊचे दुसरे लग्न नक्कीच होणार !. हे वहिणीच्या डोक्यात व त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्यात फार आत पर्यंत शिरले होते. पण भाऊंचा या गोष्टिला फार पाठिंबा नव्हता. वहिणीना असा समज झाला होता की ईश्र्वाराने भाऊंच्या नशिबात व्दिभार्याचा संसार लिहला आहे. त्यामुळे ईश्र्वराने माझ्यात काही कमी ठेवली आहे. आणी म्हणुन मला काही संतान होत नाही आहे. हा विचार त्यांच्या डोक्यात सारखा भ्रमण करत होता. शेवटि त्यांनी भाऊला दुसरे लग्न संतान प्राप्ती साठी कसे जरुरी व आवश्यक आहे हे समजवण्यात यशस्वी झाली होती. स्त्रीहट्टा समोर कोण्याही पुरुशाचे काही चालत नसते. शेवटी नातेवाईकांनी भाऊची सोयरिक जुळवुन आणली होती. भाऊ आता दोन पत्निचे पतिदेव झाले होते. भविष्यवाणी खरी ठरली होती. बरेच वर्ष लोटल्या गेली होती. पण भाऊंना काही संतान प्राप्ती झाली नाही. शेवटी घरात दोन स्त्रीयां मध्ये, वाद-विदाद, तंटे ,भांडने सुरु झाले होते. शेवटी मोठ्या वहिणीचे भाऊ विषयीचे प्रेम आटले होते. वहिणी भाउंशी सारखे वाद घालत होती. धाकटया पत्निवरुन तिघांचे भांडण जे घरात होत होते,ते रस्त्यावर आले होते. नावडतीचे मीठ अळणी अशी परिस्थिति झाली होती. वाद इतका वाढला की गोष्ट घटस्फोटावर जावुन ठेपली. भाऊंच्या विरुध्द ,बिना पत्निच्या परवांगी शिवाय लग्न केल्याचा आरोप करण्यात आला. भाऊंच्या विरुध्द आता कोर्ट- कचे-याच्या तारिका लागल्या होत्या. त्याच काळात सुतगिरणी पण बंद पडली होती. भाऊ आता बेरोजगार झाले होते. आता एका दुकाणात नौकर म्हणुन काम करत होते. आलीया भोगाशी असावे सादर. व येणारा प्रसंगाना कशे-बशे तोंड देत होते. शेवटी भाऊंचे काय होईल हे सांगणारे शस्त्रीबा पण जग सोडुन, स्वर्गात आनंदात असतील !.पण स्वर्गात जाण्या पूर्वीच भाऊ ईथे नरकाचा आनंद घेत आहे असे म्हणने वावगे नाही होणार !.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy