स्वादआस्वाद komal's kitchen's

Tragedy Inspirational

4.5  

स्वादआस्वाद komal's kitchen's

Tragedy Inspirational

#आयुष्याच्या एका वळणावर...

#आयुष्याच्या एका वळणावर...

4 mins
251


         सीताराम गरीब घरात जन्माला आला होता. वडिलांचा व्यवसाय रिक्षा चालवण्याचा असल्याने त्याने त्याच मार्गाने जायचं ठरवलं. सीतारामकडे प्रखर बुद्धिमत्ता होती, पण गरिबीमुळे शिक्षण मागे पडले. रिक्षाचालन करून स्वतःची उपजीविका तो करू लागला. स्वतःचा संसार त्याने थाटला. सुनंदा नावाची गरीब घरची आणि शिक्षण जेमतेम घेतलेली स्वभावाने साधी असणारी सुनंदा त्याच्या आयुष्यात आली. दोघांचा संसार सुरळीत चालू होता. गरीबी असूनही दोघे आनंदाने संसार करत होतें. पुढे त्यांना दोन मुले झाली.


सीताराम नेहमी लोकांच्या मदतीला धावणारा करुण हृदयाचा होता. त्यामुळे समाजात त्याला खूप मान होता. कोणाच्याही कोणत्याही समस्या असतील तरी तो त्याच्या परिने होईल तशी तो मदत करी....! त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर लोक आधी त्याच्याकडे येत असत. रोजच्या धंद्यावर घर आणि मुलांच्या शिक्षनावर पैसे तो घालवत असे. कारण त्याच एकच मत होतं की, मी गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकलो नाही, पण मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणार. त्यामुळे मुलांना कोणत्याही गोष्टीची तो कधी कमी करत नसे.


आज सकाळी सुनंदाने सीतारामच्या आवडीचे पोहे केले होतें. सीतारामने पोहे खायला घेतले,तर बाहेर रस्त्यावर गाडी पंक्चर झाल्याचा आवाज आला. त्याने पोह्याची डिश खाली ठेऊन बाहेर जाऊन पाहिले तर, बाहेर गाडीमध्ये एक प्रेग्नन्ट लेडीज विव्हळत होती,आणि तिचा नवरा गाडीची वाट पाहत सैरभैर फिरत होता. तिच्या ओरडण्याने त्याला आणखीनच भीती वाढत होती. कारण तिची परिस्तिथी खूप दयनीय झाली होती . कारण तिला लेबर पेन्स सुरु झाल्या होत्या. कोणत्याही क्षणी तिची डिलिव्हरी होण्याची शक्यता होती.

सीताराम ने पाहताच त्याने तिच्या नवऱ्याला हाक दिली.दोघांनी मिळून त्या स्त्रीला गाडीतून बाहेर काढून रिक्षात बसवले, आणि रिक्षा हॉस्पिटलच्या दिशेला फिरवली.


हॉस्पिटलमध्ये तिला ऑपेरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यात आलं होतं की, लवकर आलात म्हणून बरं झालं....,नाहीतर आईच्या जीवाला धोका होता. डॉक्टरांचा बोलणं ऐकून तिचा नवरा सीतारामकडे येऊन पाया पडला. आज माझी बायको तुमच्यामुळे वाचली. त्या माणसाने पैसे काढायला किशात हात घातला, आणि सीतारामला पैसे देण्यास हात पुढे केले . सीतारामने नाही नको मी कोणाचे कधी पैसे घेत नाही....,असे म्हणून पैसे घेतले नाही, "आणि बोलला ही तर माणुसकी आहे, यामध्ये पैसे कसले असे म्हणून सीताराम तिथून निघून गेला.


पुढे सीतारामची मुले मोठी झाली. शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी राहिली. सीताराम ने दोघांची लग्न लावून दिली. मुलं स्वतःची घरं घेऊन वेगळी राहिली. आता सीताराम आणि सुनंदा दोघंच राहत होतें. सीताराम अजूनच रिक्षा चालकच होता. इमानदारीने त्याने व्यवसाय केला.


खूप दिवसांपासून सुनंदाची एक इच्छा होती, आग्रा ला जाऊन ताजमहाल पाहायचा चार दिवसांनी ते निघणार होतें.

सीतारामनेही विचार केला,"आयुष्य नेहमी दुसऱ्यासाठीच जगलो, सतत मन मारलं,आता या वयात तरी बायकोची इच्छा पूर्ण करावी. स्वतःसाठी आयुष्य जगावं म्हणून दोघेही फिरायला जायला आनंदी होते.


सुनंदाला आलेल्या अचानक चक्करमुळे त्यालाही काही सुचेनास झालं. सुनंदाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तर तिला हृदय विकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सांगितले लगेच हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल, लगेच केली नाही तर रुग्ण दगावू शकतो. आताच्या आता पाच लाख रुपये जमा करा.


डॉक्टर एवढं पैसे नाहीत पण मी ऍडजेस्ट करुन देतो,"सीताराम डॉक्टरांना म्हणाला.

डॉक्टर, तसं नाही करता येणार आधी पैसे जमा करावे लागतात. डॉक्टरांच्या बोलण्याने सीतारामच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होतें.

सीतारामला सुनंदा जीव की प्राण होती, आणि म्हातारपणात जगण्याची आशा एकमेव तीच होती. मुलं त्यांच्या प्रपंच्यात आयुष्यात व्यस्त झाली होती. त्यांना आईवडिलांची आठवणही नव्हती.


सीतारामने थोरल्या मुलाला राजेशला कॉल केला. राजेश मला पाच लाखाची खूप गरज आहे. त्याने काही ऐकून न घेता. बाबा तुमचं आयुष्य गेलं तरी तुम्ही एवढी रक्क्म साठवू शकला नाही का....? त्याच बोलणं ऐकून सीतारामने फोन ठेऊन दिला. त्याच बोलणं सीतारामच्या खूप मनाला लागलं. सीतारामने काळजावर दगड ठेऊन,आता धाकट्या मुलाला यशला कॉल केला...! त्यालाही पाच लाखाची मागणी केली. त्याने बाबा जास्तीत जास्त एक लाख देऊ शकेल असं सांगितलं. ट्रान्सफर करतो मी तुमच्या अकॉउंटवर असं तो म्हणाला, आणि फोन ठेऊन दिला. दोघांनीही साधी कशासाठी, काय झालं याची चौकशी केली नव्हती.


पाच लाखातले एक लाख झाले, आता चार लाख दोन दिवसात कोठून जमा करायचे असा प्रश्न त्याच्याकडे होता. सगळे पाहुण्यांना कॉल करुन झाला, पण कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. सीतारामला आता कोणाजवळ हात पसरायचा असं वाटू लागलं . अशी कधी परिस्थिती उभी राहिल.... त्याला त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. स्वतःची कसलीही हौसमौस न करता मुलांना घडवले,पण मुलांनी त्यांचीच मापं काढली होती. शेवटी तो हतबल होऊन बसला होता. देवाला बायकोला वाचव असं म्हणत होता. डोळ्यातून अश्रू टपकत होतें.


त्या वेळीच तिथे एक गृहस्थ आला. तुम्ही तेच ना रिक्षाचालक....? आहो तुमच्या रिक्षामुळेच माझी बायको आणि माझ बाळ वाचलं होतं. तुम्ही त्यावेळेस देवसारखं धावून आलातं माझ्यासाठी....! तुम्ही का एवढे हतबल होऊन बसलात....?? काही टेन्शन आहे का....? त्या गृहस्थने विचारणा केली, तर सीतारामने सगळं सांगितलं. त्यांना ऐकून खूप वाईट वाटलं.


गृहस्थ, "त्यावेळी तुम्ही माझ्याकडून माणुसकी म्हणून काही पैसे घेतले नव्हते. आज मीही माणुसकी म्हणून मी तुम्हचे सगळे पैसे भरणार आहे. तुम्ही काही एक शब्द बोलू नका. चला माझ्याबरोबर....!


त्या गृहस्थाने काउंटरवर जाऊन सीतारामचे सगळे पैसे भरून टाकले होतें, आणि वरील खर्चासाठी त्याच्याजवळ पैसेही ठेवले होतें. सीताराम आज त्याच्या पाया पडत होता. देवासारखा धावून आला. खूप उपकार झाले, माझ्या सख्यांनी सुद्धा मला मदत केली नाही. तुमचे हे ऋण कधीच फेडू शकणार नाही.


गृहस्थ, "तुम्ही हे काय करताय तुमच्याकडून तर मी माणुसकी शिकलो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात असं पाया पडू नका. मला मुलगाच समजा तुमचा असं म्हणून तो गृहस्थ तिथून निघून गेला.


रात्रीच सुनंदाच ऑपेरेशन करायला घेतलं आणि त्यातून ती सुखरूप बाहेर ही आली. आज सीतारामला आयुष्यातील मोठी परीक्षा जिंकल्यासारखं वाटत होतं. आज त्याची माणुसकीच त्याच्या कामी आली होती.


समाप्त...

©️®️komaldagade 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy