STORYMIRROR

vaishali vartak

Fantasy Others

2  

vaishali vartak

Fantasy Others

श्रावणधारा

श्रावणधारा

4 mins
106

गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख सरून गेली तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.

पण , साधारण पणे , श्रावण मासात सर्वत्रच सरीवर सरी पावसाच्या येऊ लागतात. आषाढातील पावसाने सृष्टी हिरवळी जाते . ग्रीष्माने, आलेले सुकेपण, रुक्ष पण ,निस्तेजता जाऊन पावसाच्या आगमनाने सृष्टी कशी तरारलेली असते. हिरवागार शालू नेसल्यागत दिसते.आणि कुसुमाग्रजांच्या कविते प्रमाणे ,"हसरा नाचरा जरासा लाज-या " श्रावणात तर, निसर्गाचा एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा आणि म्हणूनच तर ऋतू हिरवा म्हणून संबोधला जातो. झाडे स्वच्छ धुतली गेल्याने मस्त हिरवीगार दिसतात. आपण आपल्या घरच्या रोपांना ,झाडांना कितीही पाणी घाला ,पण नैसर्गिक पावसाच्या पाण्याची त्याला सर येत नाही.

पण ,खर सांगू ? मला तर या श्रावण सरींचे वा पावसाळ्याचे जराही कौतुक नाही. तुम्ही म्हणाल काय अरसिक बाईआहे. अहो! पण आमच्या सोसायटीत की नाही पाणी भरते .बाहेरचे रस्त्यावर चे पाणी आत येते. जरा 2/4 इंच पाऊस पडला की झाsssले. जरा कुठे पावसाचा आनंद लूटत असता बाहेरचे पाणी आत येऊ लागले की पावसाची मजा जाऊन टेंssशन मात्र वाढते . कवितेतून ,पुस्तकातून, साहित्यातून, कवी मनातून श्रावणसरींची किssती कौतुक वाचलीत तरी प्रत्यक्षात पाऊस , पाऊसानंतर पाणी तुंबणे , घरात तर पाणी येणार नाही ना याची धास्ती.व घरात पावसाच्या पाण्याने येणारी ओल या सर्व गोष्टीेंमुळे पावसाचे येणे, म्हणजे दडपणच वाढविते.

नुसते काळ्या ढगांनी भरून आलेले आभाळ, ढगांचा कडकडाट , थंडगार वारे , ओल्या मातीचा सुगंध हे सारेssसारे काही सुखद वाटते. अशावेळी की नाही, घराबाहेर मागच्या अंगणात वा पुढे झोपाळ्यावर , ओट्याच्या कट्टयावर वा बाल्कनीत बसून, हातात मस्त वाफाळलेला कॉफीचा कप तसेच जोडीला टॕब वा मोबाईल घेऊन व्हाट्सअपचे मेसेज वाचीत बसावे व त्या वातावरणाचा उपभोग वा मजा लुटत बसावे अशी तीव्र ईच्छा होते.पण जर, मेघराज गर्जना करत बरसायला लागले व पाऊस वाढला व बाहेरचे पाणी सोसायाटीत घुसू लागले तर या श्रावण सरी ज्यांचे आपण आता गुणगान करतोय ना ,त्यांचा जोर वाढला तर , "देवा बस कर रे बाबा हा पाऊस, आवर घाल या श्रावण सरींना. नको हा पाऊस ." असे विचार मनात येतात आणि त्या वाढत्या पावसाने पाणी घरात येईल तर ? या विचाराने जीवाची घालमेल सुरू होते.

तसे तर जून महिन्यातच घराच्या एन्ट्रन्सला भिंत घातली जातेच.लहान रांगती मुले घराबाहेर जाऊ नयेत म्हणून भिंत घालतात ना?तशी .बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून सोय करण्यात येतेच .

     बर हा पाऊस दिवसा असेल तर ठीक. आणि जरी ही दिवासा पाऊस असला व वाढला की लगेच मुलाचा , सुनेचा आॕफीस मधून फोन खण-खणणू लागतात, "आई, येथे पाऊस फार आहे .आपल्याकडे कसाकाय? पाणीतर भरू लागले नाही ना? " एवढेच काय माझ्या इंजीनीअर मुलाने तर बाथरूमला खास दट्टे बनवून घेतले आहेत . त्या मुळे बाहेरचे पाणी वाढले तरी गटर बॕक मारीत नाहीत.तर सांगयचे की त्यांचे ,मुलांचे विचारणे सुरू होते दट्टे घट्ट लावलेत का? तपासून पहा म्हणून. आणि पाऊस रात्री असेल तर मग काय ? मंगळागौर नसतांना पण जागरण करणे आलेच. बाहेर व-हांड्यात वारंवार जाऊन, पाणी येऊ लागले का ? पाण्याची लेव्हल वाढत तर नाही ना? सतत पहाणे. चालूच रहाते. धड झोप पण निवांत मिळत नाही.      अरे हो !पाणी भरणे यावरून आठविले . परवा भिशीत ,पुढची भिशी कोणाची तर ही आपली अपर्णा लगेच म्हणाली, "ए मी आॕगस्ट च्या पुढे भिशी घेईन ह .कारण माझ्या flat खाली भरपूर गुडघा भर पाणी जमते , मग कशा येणार तुम्ही ? या वैशालीचे ठीक आहे येईल दोन चार हात मारत ," त्यावर मी तिला म्हटले ,"तुझे ठीक आहे ग ,तू वर रहाते.आमचा तळमजला. त्यामुळे एकदा दोनदा तरी पावसाळ्यात, काश्मिरला न जाताच शिकारात रहाण्याचा अनुभव घेतो.आणि सरी थांबल्या व पाणीओसरले की मग काय ? तळमजला त्यामुळे सर्व जण कामास लागतो.त्या पावासाच्या पाण्याने अंगण , घरासमोर , मागचे आंगण वगैरे सफाई काम करावे लागते ते वेगळेच. पण काय करणार ?श्रावण सरी तर बरसल्याच पाहिजेत ना! 

   पण, मला काय वाटते ? इंद्राच्या दरबारात एक application च करावी. लिहावे अन् सांगावे की अरे बाबा रोजचा एकच इंच पाऊस पाड म्हणजे पाणी पण जमिनीत मुरेल,व ज्यामुळे बोअरच्या पाण्याचा प्रश्न रहाणार नाही.व महत्त्वाचे श्रावणसरींचा आनंद लुटता येईल आणि असाही गुजरातमधे सरासरी 30 ते 35 इंच पडतो. म्हणजे काय? लहान पणी आपण पत्त्यांचा पांच/ तीन/ दोन डाव खेळ खेळायचो ना? त्यात जेवढे आपल्यास डाव करावायाचे असायचे तेवढे झाले की म्हणायचो ना? माझे झाले बाबा पोटापाण्या पुरते डाव .तसे इंद्र सरकारला सांगावे रोज एकच इंच पाऊस पाड.मग श्रावण सरींचा आनंद लुटता येईल मजा घेता येईल . पण इंद्र दरबार वा सरकार काय आपली स्टेटअकांउट आहे? ठराविक रक्कम प्रमाणे रोजचा एक इंच पाऊस withdrawalकरता यायला . रोज 1" पाऊस पाडायला.?


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy