akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

शक्तिमान आणि लक्ष्या

शक्तिमान आणि लक्ष्या

2 mins
268


लक्ष्याच आमंत्रण असल्याने शक्तिमान लक्ष्यच्या गावात श्रीरंगपूर मध्ये येतो. तशी त्याची जुनी मैत्री आपल्या मित्राचा चागला पाहुणचार करावा यासाठी त्यानी खास तयारी केली होती. 

मस्त पैकी जेवून दोघे हि गावात फिरण्यासाठी बाहेर पडले 

"ये शक्तिमान उडून जाऊ आपण म्हणजे कसं पाय पण दुखणार नाही "

"नाही लक्ष्या आज चालत जाऊ वरून पाहण्या पेक्षा समोरून पाहायला मज्जा येईल "

"बरं चल तर '

शक्तिमान आणि लक्ष्या फेरफटका मारण्यासाठी निघाले. 

लक्ष्या मोठया दिमाखात सगळ्यांना सांगत होता कि माझा शहरी मित्र आहे.  

फिरत फिरत ते दोघे डोगंराच्या पायथ्यशी पोहोचले 

"लक्ष्या वर जाऊया "

"नको रे बाबा किती वर चढायचं "?

"चल रे "

"चला आता आणि काय "

दोघेही वर चढत असताना एका ठिकाणी त्याना गुफा दिसते 

"हि कसली रे गुफा "?

"काय सांगू शक्तिमान असं म्हणतात कि त्यात खजिना आहे पण आत गेलेले कोणी परत येत नाही म्हूणन कोणी शोध घेतला नाही "

"काय खजिना "

"हो "

"मग पाहूया आपण "

"नको रे बाबा परत आलो नाही तर जीव जायचा "

"कसला भित्रा रे तू चल दाखव तूंचि ताकद "

"भित्रा मी नाही चल "

दोघेही आत प्रवेश केला शक्तिमान ने जादू ने मशाल हातात घेतली त्या उजेडात ते दोघे चालू लागले काळाकुट्ट अंधार 

"ये शक्तिमान चल निघू आपण काळोख आहे खूप "

"लक्ष्या चल पाहूया तरी कसला खजिना आहे त्यात "

थोडे अंतरावर गेल्यावर सोनेरी चमक दिसली समोर पेटी भरून सोने होते ते पाहताच 

"ये मी स्वप्न तर पाहत नाही ना "

'नाही लक्ष्या चल हे आता आपल्याला बाहेर नेयायला हवे "

"वाह शक्तिमान आपण काय करायचं एवढ्या सोन्याचं "?

"हे आपला नाही आपण सरकार ला देऊ"

शक्तिमान ने जादूने ती पेटी आणि लक्ष्या सह उडत बाहेर आणली सरकारला सोपीत केली 

लक्ष्याला अर्धी संपत्तीची रक्कम बक्षीस म्हूणन मिळाली तर शक्तिमान ने सरकारला सोपीत केली 



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy