सहज सुचल
सहज सुचल
सकाळी "धक्कादायक" गोष्ट घडली, मोबाईल बंद पडला. उठून चार्जिंग ला लावला आणि "दिलासा" देणारी बाब म्हणजे मोबाईल चक्क चालू झाला.. नंतर काय आंघोळीला गेले तर नळाला पाणीच नव्हते,,, सगळ्या आंघोळीचा "फज्जा" उडाला.... किचनमध्ये जाऊन चहा टाकणार तर दूध संपले आणि चहाच्या मुडची "ऐशी की तैशी" झाली.... कपडे बदलून बाहेर आले आणिमुलीने आवाज दिला.. ममी बघ काय झालं.. तस "काळजाचा ठोका"चुकला...
वळून पाहिलं तर फ्रिजमध्ये दुधाची पिशवी मुलीनं दाखवली आणी "ताजी बातमी" असल्यासारखं मनाला हायस वाटल... बाहेर जाण्याचा निर्णय मग "रद्द" करावा लागला...
कमरेला पदर खोचून किचनमध्ये गेले, विचार केला असे कधीपन काही संपायला नको म्हणून नवऱ्याला सामानाची "यादी जाहीर" केली... तस नवऱ्याने सामान आणन्यास नकार दिला, मी विचार केला "परिस्थिती हाताबाहेर" जात आहे, वेळीच "नियंत्रित" नाही केली तर परिणाम होईल.... चहा बनवला आणि विचारातच हॉलमध्ये कप घेऊन बसले आणि टीव्ही चालू केला, तस बातम्यांवर हेडलाईन आली... की आज मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असून सगळ "नियंत्रणात"आले आहे...
आणि काय सांगू तुम्हाला, मला पहिल्यांदा न्यूज पाहिल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला.....
