STORYMIRROR

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

घुंगरू - भाग 10

घुंगरू - भाग 10

6 mins
377


रत्नाचा काही नाही पटल तरी बापूंन पुढे मालतीच काही चालत नसे.....    एक दिवस माय लेकी असताना रत्नाने चाळ बांधले, अन नाचाचा ठेका धरला, मालतीला अगोदरच त्याचा राग येई, त्यात आज घरात दुसरं कुणी नव्हतं, मालतीने रत्नाला खूप समजावल पण ती काही केल्या ऐकेना मग मात्र मालतीला राहवलं नाही, तिने तशीच रत्नाच्या कानफटात ठेऊन दिली,   कळायला लागल्यापासून आई कधी ओरडून बोलू नाही आणि आज मारलं कस हे रत्नाला पण कळत नव्हतं...... मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली,,,   रत्ना तिच्या जवळ गेली...  ए आई ,आग का रडतीयास, मला सांग की, म्या काय बी केलं तरी तू कवा रागात बोलत सुदीक नाय मंग चाळ बांधल्यावरच तुला का ग एवढा राग इतु?रत्नाला जवळ घेत मालती जास्तच रडू लागली,,,, बाय तू लहान हायस तुला नाय कळायचं ........


रात्री जेवण चालू होती,  आज रोजच्यासारखी रत्ना काही बोलत नाही .... म्हणून बापू म्हणाले ,, आमच्या लाडक्या लेकीचं काय बिनासल?  काय कमी पडल का आमच्या बाईला??तस रत्नाला रडू आलं.. बापू म्हणाले, रत्ना आग काय झालं? कुणी काय बोल का तुला?  तुला काय पाह्यजी मला नुसतं सांग.......... त्यावर रत्ना उठून बापूजवळ जाऊन बसली....    आयनी मला मारल... बापू म्हणाले.... काय? का मारल ग मालू ती काय बारीक हाय व्हय, आन माराय तुला काय तरास झाला ग?   माईना पण आश्चर्य वाटलं आणि राग पण आला, साता नवसाने झाली होती रत्ना....... सगळ्यांनाचा जीव होता तिच्यात...  माईंचा पारा चढला, माई म्हणल्या, माले का ग मारल पोरीला?    त्यावर रत्नाचा म्हणाली,, आग माई म्या रोजच्यासारक चाळ बांधून नाचत व्हते, आन आईला काय झालं कुणाला ठाव, मला मारल बग तीन.......... 


तेव्हा बापू मात्र भडकले, मालू तुला म्या कितीदा सांगितलं हाय तिला कायबी बोलायचं नाय मनुन,, तिला जे वाटलं ते करूंदे...आता मात्र मालतीला राहवलं नाही, जेवत्या ताटाला हात जोडून मालती उठली,   डोळे भरून आले होते, रत्नाकडे रागात बघून म्हणाली....  काय बी म्या केलं तरी तू तुझ्या आय वरच जायची.. अस म्हणून आत निघून गेली, तिच्या बोलण्याचा अर्थ कुणालाच कळला नाही...... माई म्हणाल्या ,माली आस काय बोलून गिली, आय वरच जायची मनजी? हीच तर हाय की रत्नाची आय, मंग आस कस बोली,ईडी झाली का माली?   बापू पण विचारात पडले..रात्री झोपताना बापू मालतीला म्हणाले, मालू आज आस काय झालं ग एवढं रागात व्हतीस???  अन रत्ना आपली पोर हाय तू तिची आय हाय न ? मंग तिला अस कस मनली की आय वरच जाईल मनुन???   त्यावर मालती म्हणते...  आता माझ्याकडं तुमच्या कांच्याबी परसणाचं उत्तर नाय...  येळ ईल तवा सांगणं म्या सवताहून....पुढे आठ दिवसाने गावात जत्रा असते, जत्रेसाठी बापू सगळं गावाच पुढे होऊन करत असत...  


गावचे जमीनदार म्हणून बापुना गावात मान होता....जत्रेत दरवर्षी प्रमाणे तमाशाचे फड लागले......जत्रा आठ दिवस असायची..एक दिवस रत्ना बाहेर गेली ती परत आलीच नाही...... संध्याकाळ झाली, अंधार पडला, सगळीकडे शोधाशोध चालू झाली....बापूच्या वाड्यावरल्या बाया, गड्यांपासून अगदी माई , मालती सुद्धा घराबाहेर पडले...सारा गाव पिंजून काढळपन रत्नाचा कुठच पत्ता नव्हता.........  जेवणाची वेळ झाली, सगळी कडे शोधाशोध करून सगळे दमून गेले,     ,,  गावातील एक गडी धावतच बापूकडे आला...  बापू चला बिगीन,  बापू म्हणाले, आर कूट? गडी म्हणाला , चलातर तुम्हासनी काय तरी दावायच हाय,बापू म्हणाले.. माझी पोर गाव्हना आन तू कूट नेतोस मला? गडी म्हणला... बापू ठाव हाय मला, त्यासाठीच तुमाला चला म्हणतोय........ बापू धोतराचा सोगा हातात धरून गड्या माग निघाले.......  दोघे जत्रेच्या ठिकाणी आले.......    ढोलकीची थाप कानावर पडली,,, तस गडी म्हणाला चला बापू फडात....... बापू लालबुंद झाले,,, आर तुला काय हाय का नाय?? हीत माझी पोर सापडणा आन तू तमाशाला घेउन आला व्हय मला........ त्यावर गडी म्हणला, नाय बापू तमाशाला नाय काय तरी दावायच हाय मनुन घिऊन आलो हाय तुमाला......... अस म्हणून बापूचा हात धरून गडी बापूला फडाच्या आत घेऊन जातो..........  


समोरच चित्रबघून बापू चक्रावून जातात,  समोर स्टेज वर रत्नमाला नऊवारी साडीत साज घालून नाचत असते...... बापूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही,अस कस असू शकत....... हे खोट हाय....... बापू स्वतःशीच पुटपुटत असतात, शेजारी उभा असलेला गडी म्हणतो, नाय बापू हय खर हाय, ही आपली रत्ना हाय..........बापू भानावर येतात...  तिथूनच रत्नाला जोराची हाक मारतात,,,, रत्ने......  त्यांच्या आवाजाने सारी तमाशा बघायला आलेली मानस फिरून बापूकडे बघायला लागतात, बापू पुन्हा ओरडतात ,,, रत्ने हे काय हाय,,, उतर खाली...  अब्रू घालीवलीस...     आताच्या आता घरला चल ,, मंग बघतो......  त्यावर रत्ना म्हणते... बापू म्या सुपारी घेतली हाय, म्या अस सुडून नाय यायचे....... बापू स्टेज जवळ जातात तिच्या हाताला धरून खाली ओढतात, रत्ना खाली पडते..... बापू तिच्या कानाखाली वाजवतात....... रत्ने लाडात वाढवली त्याचा असा फायदा घेतलास व्हय,   पार अब्रूची लत्कर करून ईशील टांगलीस की ग........ रत्नाला ओढत बापू वाड्यावर घेऊन येतात.......  


माई ,मालती रत्नाचा अवतार बघून चकित होतात,   नऊवारी साडी, अंबाडा त्यावर सुगंधी फुलाची वेणी,   गळ्यात नकली साज, प

ायात चाळ......... मालतीच्या काळजाच पाणी झालं... माईंनी बापूला विचारलं, बापू कूट सापडली रत्ना?  बापू म्हणाले... माई काय सांगू तुला,,,, पोरीन घराण्याची इज्जत घालीवली,,, तमाशात नाचाय गेली व्हती....... माईंनी कपाळावर हात मारून घेतला तिथंच मटकन खाली बसल्या........ मालती नुसतीच बघत होती..  बापू मालतीला म्हणाले, माले बोल की काय.. बघ तुझ्या लेकीने काय दीव लावल्यात........ आता का गप. तू आय न तिची, मंग लेक मुठी झाली, ती काय करती काय नाय तुला ठाव असाय नग का???  ... मालती काहीच उत्तर देत नाही बघून बापू मालतीच्या अंगावर धावून गेले...तेवढ्यात रत्ना मध्ये आली.... बापू थांबा...  यात आयची काय बी चूक नाय....... तीन तर मला लय जीव लावला, समद समजून सांगितलं,  घराण्याच वळण लावल.......... तिची चूक नाय...... बापू म्या माझ्या आय वाणी हाय......... बापू म्हणाले..


रत्ने लाज नाय वाटत मालू सारखी हाय मनाय???  आग ती मला न सांगता ह्या वाड्याच्या बाह्यर नाय गिली आन तू मनती तिच्यासारखी हायस........ व्हय बापू म्या माझ्या माय वाणी हाय, पण माझी माय ही नाय....बापू म्हणाले...  रत्ने ..डोस्क फिरलय का तुझ??  काय बी बरळाय लागलीस....   रत्ना म्हणाली .. नाय बापू , म्या बराबर बोलती हाय......  या आय न मला वाढीवल हाय,पर मला जन्माला घालणारी आय दुसरीच हाय.......... बापू तावन म्हणाले,  माले आतातरी बोलशील का काय?   ... त्यावर रत्नाचा म्हणाली..... बापू म्या सांगते,     सोळा वरसापहिल काय आठवतय का तुमाला???       बघा काय आठवत आसल तर......  बापू म्हणाले.. काय ते सरळ सांग की, आस का बोलतीस.... रत्ना म्हणाली.. बापू सोळा वारसा आधी तुम्ही म्या पोटात असताना माझ्या आयला मारून लांब जंगलात सुडून आलतात....... 


बापू मालती कडे बघून बोलतात.. मालू आग ही काय मनती तुला कळत हाय का?तू का गप हायस??    त्यावर मालती रत्नजवळ जाऊन तिला विचारते ...   रत्नमाले काय माझ्या मायेत कमी पडल का ग?    तू आस का बोलतीस...  त्यावर रत्ना म्हणाली.. नाय ग आय तू तर माझ्यासाठी सगळं जग हायस....... पर म्या आता जे काय मनले ते तुला बी ठाव हाय....  मालती विचारते.. पर तुला कस माहीत????  आय तू त्या दिस मला मारल्यावर मनलिस तू तुझ्या आय वरच जाणार मला काय बी कळलं नाय,पर म्या तुझ्या माग आठ दिस माळावर येत होते......... मला समद ठाव झालं हाय....  मालतीची डोळे भरून येतात,बापू ओरडतात, काय चाल हाय मला बी कुणी सांगाल का???त्यावर रत्नमाला म्हणते बापू म्या मालू आयची नाय, बकुळाची लेक हाय......  बापूच्या चेहऱ्याचा रंग बदलला... कोण बकुळा???  त्यावर मालती म्हणाली...  बकुळा माहीत नाय व्हय तुमाला???    मला पोर होत नाय हे माहीत पडल्यावर तुमि बकुळाला नादाला लावलासा,,, लगीन करतो म्हणलासा...  आन ती पुटूशी राहिल्यावर तिला मारून जंगलात निहुन टाकली....... रत्ना तिचीच पोर हाय.......... माई म्हणाल्या माले खोट बोलू नगस, म्या तुझं बाळंतपण केलं हाय....... मालती....व्हय माई तुमचं बराबर हाय,  म्या पुटुशी असल्याचं नाटक केलं व्हत..... ह्यांनी बकुळाला जंगलात सोडल तिथं ती आपल्या माळावरल्या किन्नरांना सापडली,त्यांनी तिला सुदिवर आणून वस्तीवर घिऊन आलं,   ,, बकुळा ला काय बी आठवत नव्हतं,  तिला फकस्त तुमि ध्यानात व्हता.....  त्या किन्नरासनी जवा समजल तवा ती सगळी तुमच्याकडे बकुळाला घिऊन निघाली व्हती,म्या वाटत भेटले,त्यांनी मला सगळं सांगितलं,,,,, म्या त्यासनी वचन दिल, व्हणार पोर ज्याचं हाय त्याच्याजवळच जाईल,, मनुन माई मला नाटक करावं लागलं,... 

रत्नाची आय,बकुळा एक दिस आदी बाळंतीण झाली व्हती, म्या नऊ महिने तीच बघून तसच केलं,  रत्ना झाल्यावर दुसऱ्या दिशी म्या दुखायचे नाटक केलं, तवा किन्नरानी मागल्या दारान रत्नाला आणून माझ्या पदरात घातली, म्या लय भाग्यवान हाय रत्नामुळं म्या आय झाले...तुमि बकुळाची फसवणूक किली,,     तेव्हा बापू कडाडले.....  गप माले काय बी बोली नगस,  फडात नाचनारणीला घरात आणायला म्या काय येडा नव्हतो,   ...   पायात चाळ बांधून रोज नाचणारी तिला बायकू मनुन मिरवायच व्हत का म्या.....  तिची जागा घुंगरासारखी पायाजवळच..........तेव्हा माई म्हणाल्या,,, बापू तू चुकलासा, बाय कुनिबि आसना पर ती जवा आय व्हती ती कुणाला आयकत नाय, अजून येळ गेली नाय, तू तिला घिऊन ये........    मालती पण म्हणते,,,,, रत्नाला आय मिळल,  लोक थोड्यादिस बोलत्याल आन गप बसत्याल..  बापू म्हणतात,...... नाय माझ्या घराण्याची इज्जत म्या अशी नाय घालवायचो............  रत्ना बोलते,,, बापू तुमि आयला वाड्यावर आणणार का नाय???  बापू तयार होत नाहीत.....   रत्नमाला माईच्या पाया पडते,,, मालतीच्या पाया पडते...... बापू समोर जाऊन उभी राहते ....बापू ज्या घुंगरपायी तुमि माझ्या आयच हाल केलं आज तीच चाळ आन घुंगर घालून फडात नाचणार हाय,   तुमचा माझा के बी संबंध नाय....... म्या पुन्हा तुमच्या वाड्यावर येणार नाय,,   आज माझा बा हारल आनं माझी माय जिकल......  अस म्हणून रत्नमाला वाड्याबाहेर निघाली,,,   कायमची.. ज्याचा तिरस्कार करत होते त्याच चाळ, घुंगरकड बघत बापू नाईलाजानं उभे होते. 

(समाप्त)


Rate this content
Log in