प्रेमाची लोकल
प्रेमाची लोकल
पनवेल वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडली,
घाईत होते ,अस पण घरातून निघायला उशीर झालेला, लोकलची सुटण्याची अनाऊन्स होताना पळत जाऊन ट्रेन पकडली...
आता एवढ्या घाईत लेडीज डबा धावत पकडणं शक्य नव्हतं म्हणून मग समोर जेन्ट्स डब्यात कशीबशी स्वतःला सावरत ढकलत आत चढली......
केस धुतलेले ते सुखवायला पण वेळ मिळाला नाही,
तसेच गुंडाळून क्लच लावून सावरले होते...
रात्री बारा वाजेपर्यंत ऑफिस च काम केल्यामुळे झोप पण पूर्ण झाली नव्हती.
जेव्हापासून ऑफिस मध्ये खडूस बॉस आला होता तेव्हापासून हे रोजचंच झाल होत.
अगोदरचे बॉस खूप छान होते, म्हणजे मायाळू'आप भी आराम करो मुझे भी आराम करणे दो'....
पण आताच भयताड दिसायला तर हॅड्सम होता पण खवट्या होता,
काम कस, क्लिअर झालं पाहिजे....
या सगळ्या ऑफिस च्या कटकटीत रोजची धावपळ चालू होती.
लग्नाच वय झालं होतं( पंचवीस) पण नाकी डोळी थोडी कमकुवत असल्यामुळे बऱ्याच नकारघंटा वाजायच्या....
आणि प्रेम वगैरे हे डोक्यावरून जायच.
सगळ्या विचारात स्वतःला सावरून कोपऱ्यात उभी होते,
तेवढ्यात विंडोसीट वाला म्हणाला मॅडम इकडे जागा होते आहे,मी कुर्ल्यात उतरत आहे...
काय भारी वाटल म्हणून सांगता...
सकाळच्या गर्दीत विंडोसीट मिळण म्हणजे पळत शिवनेरी सर केल्यासारखा फिल्लिंग आलेला...
एकदाची जागा भेटली, जेन्ट्स च्या गर्दीत स्वतःला चोरून किल्ला सर केला..
जुलै चालू होता त्यामुळे सकाळची मस्त थंडगार पावसाळी हवा गुदगुल्या करून जात होती,
निवांत बसल्यावर बॅगेतला मोबाईल आणि एअरफोन काढला,
कानात खुपसून काही रोमँटिक गाणी सरचिंग केली .....
..सापडले एकदाचे..
तेवढ्यात माझी समोर बसलेल्या तरुणाकडे नजर गेली,तो ही एकटक माझ्याकडेच बघत होता..
का बघत असेल हा?
राग ही आला, बोलू का त्याला, का पाहतोय म्हणून,
नको उगीच सकाळी वाद नकोच...
त्याने नजर चुकवली तस माझी नजर त्याच्यावर खिळली...
किती हँडसम दिसत होता तो......
गोरापान, थोडीशी रजनीकांत स्टाईल कोरीव दाढी,ब्राऊन केलेले दाट डोक्यावरचे केस हवेमुळे झळकून अजूनच शायनी दिसत होते.......
vanitabhogil
लाईट पिंक शर्ट,आणि ब्लॅक जीन्स...
फिल्मी हिरो वाटत होता...
मनात आल मला का नाही एखाद अस हँडसम च स्थळ सांगून आल....
जाऊदे माझ कुठल एवढ नशीब.
पण त्याच्यावरची नजर काही हटेना,
त्यात मोबाईल मध्ये गाण चालू होत कुमार सानू च 'राहो मे उनसे मुलाकात हो गयी'
अगदी ऑफिस, बॉस,लोकलची धावपळ,जेन्ट्स डबा सगळ ब्लेंक झाल..
विंडोला डोक टेकवून बसले,
वाऱ्याच्या झुळकेत मन त्या हँडसम हिरोसोबत संध्याकाळच्या लखलखत्या दिव्यात अगदी मरीनड्राइव्ह ला फिरत होत..
प्रेमात त्याच्या हातात हात घालून चौपाटी ची भेळ सुद्धा खाल्ली, अरबी समुद्र प्रेमाचा वर्षाव करत असल्याची जाणीव होत होती,,,, फेसळलेल्या लाटा जणू आम्हाला ओलचिंब करण्यासाठीच किनार सोडून येत होत्या ,
स्वप्नातील राजकुमार राजकुमारीसाठी पांढऱ्या घोड्यावरून येऊन कवेत उचलून घेत असल्याचा भास होत होता.....कधी प्रेमात न पडणार मन म्हणत होत जा सिमरन जा जग आपलं आयुष्य.... ...पुढे**
पुढे काय???
थोड्या वेळात आवाज आला...
अरे क्या आप भी आरामसे बैठे हो,,अभी थोडा टाइम तो बच्चे को गोद मे ले लो,
आवाज ऐकून डोळे उघडले...
स्वप्नातील भेळ कागद टराटरा फाटून वाळूत सांडली आणि
....
एक सिंदूर ने मांग भरलेली स्त्री त्याच्या कडे ( माझ्या तथाकथित हिरोकडे) दीड दोन वर्षांच मूल पुढे करत बडबडत होती,
सारे गर्दी मे मैने संभाला ईस्को तुम क्या खाली पापा कहेने को ही हो क्या?
त्या हँडसम वजा पापा ने ते मूल मांडीवर घेतलं अन फिदीफिदी हसू लागला...
च्यामारी इथ पण नशीब फाटक ( फुटक) निघाल......
सरचिंग मधील रोमॅंटिक गाणी संपून
सुखविंदरने कधी सूर धरला समजलच नाही
"लाई वी ना गयी ते ,निभायी भी ना गयी,
मैने मार दा जहान मैनू सारा,
तेरी मेरी यूं टुट गयी सोणिये, जिवे टुटिया अम्बर तो तारा"
अनाऊन्स चालू झाले अन मोबाईल ,सुखविंदर csmt ला बॅगेत कोंबून प्रेमाच्या आहुतीला बाय बाय केल,,
पुढील खवट्याच्या शब्दाच्या आठवणीत प्रेमाच पिशाच्च विंडोसीट वर सोडून ऑफिस ची वाट धरली
... अन लोकलच्या प्रेमाचा दी end झाला....
नमस्कार
कथा आवडल्यास समीक्षा जरूर द्यावी..धन्यवाद
१४/७/२०२३
