Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

kanchan chabukswar

Inspirational


4.5  

kanchan chabukswar

Inspirational


शिंदेशाही तोडे..................

शिंदेशाही तोडे..................

4 mins 158 4 mins 158

मी मीरा आणि माझी धाकटी बहीण मानसी, त्या दिवशी अचानक आईचा फोन आला." किती दिवसात दोघी भेटायला आल्या नाहीत, या रविवारी जेवायला या." आई बँकेतून निवृत्त झाली होती. मीरा, मानसीच लग्न झाल्यावर ती प्रापंचिक कर्तव्यापासून मुक्त झाली होती.


बाबांना जाऊन पंधरा वर्षे झाली होती. अर्ध्यावरच या संसारातून बाबा निघून गेल्यावर त्यांच्या जागेवर आईला नोकरी मिळाली. फंडाचे पैसे, पगार, थोडी एलआयसी ची रक्कम असं सगळं आईने एकदम निगुतीने ठेवलं.


कॉमर्स ची पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे इकोनॉमिक्स उत्तम ज्ञान आईला होत. कितीतरी वर्षापासून तिने इकडे तिकडे गुंतवणूक करून ठेवली होती. बाबा असतानाच पुण्याच्या सिंहगड रोडला त्यांनी प्लॉट घेऊन छोटसं घर पण बांधलं होत. आमच्या दोघांच्या नावाने बाजूला दोन प्लॉट पण त्यांनी घेऊन ठेवले होते. मध्यमवर्गीय संसारामध्ये बंगला बांधणे वेळी पैसे आमच्या दोघींकडे पण नव्हते.


  नेहमीप्रमाणे आईकडे आल्यावर मस्तपैकी खव्याची पोळी, मसाले भात, कोशिंबीर आळुच्या वड्या असा मस्त बेत जेवल्यानंतर आईने आम्हाला दोघींना तिच्या झोपायच्या खोलीत बोलावले.

आईचे दागिने आम्हाला माहिती होतं. लग्नाच्या वेळेस तिने मला बांगड्या आणि मानसीला पाटल्या दिल्या होत्या. तसा आईला दागिन्यांचा फार शौक होता बाबा असेपर्यंत ती अगदीच सजून नटून राहत असे.


       आमच्या दोघांच्याही मुलांची मुंज आम्ही एकाच हॉलमध्ये करणार होतो, कारणही तेच होतं, माहेरचे पाहुणे तर कॉमन् होते सासरकडची थोडीफार मंडळी येणार होती आणि मुंज ही आपल्या इच्छेनुसारच करायची असते.

काटकसरीचे धडे आईकडूनच आम्हाला मिळाले होते. आमच्या या निर्णयाचे स्वागत आमच्या दोघांच्याही सासरच्यांनी केले होते.


     आईने तिचे जुने लोखंडी कपाट उघडले, त्यातून स्वतःचे 10 तोळ्याचे शिंदेशाही तोडे बाहेर काढले.

" तुम्हाला दोघींना 1,1 दिला तर ते पण वाईट दिसेल म्हणून तुमच्यापैकी एकीने दोन्ही तोडे घ्या आणि दुसरी ने तिला एका तोड्याचे पैसे द्या."


आईचं पण बरोबरच होतं. मानसी एकदम म्हणाली," आई मला दे तोडे. मी मीराताई ला त्याचे पैसे देईन."

मी काहीच बोलले नाही. कारण लहानपणापासून मानसीला तोडे घालायची अतिशय हाऊस होती. घरी आल्यावर माझा पडलेला चेहरा बघून यजमानांनी चौकशी केली. मी काहीच बोलले नाही.


  मुंजीला अजून बराच अवकाश होता. मानसी ने दिलेल्या पैशातून मी वेगळीच गोष्ट केली.


जानेवारीच्या गुलाबी थंडी मध्ये मी आईच , आणि सासू-सासर्‍यांचे चारधाम यात्रा चे तिकीट काढलं.

आई एकटी झाली होती, बरोबरीचं कोणी नव्हतं, तिला कोण यात्रा घडवणार? तोडे काय केव्हा पण करता येतील, पण वय थोडी थांबून राहतं? आत्ताच आईचे हात-पाय चालत आहेत तोपर्यंतच तिला प्रवासाची आणि ठिकाण बघण्याची सवड होती, एकदा वय वाढत गेलं की मग बरीच ठिकाणं आपोआपच गळून पडतात. 


     चार धामच्या यात्रेच्या वेळेला आईच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. दहा वेळेला मला फोन करून, फोनवरूनच माझा चेहरा कुरवाळून ती म्हणत असे," तुला कसं कळलं, माझ्या मनातली इच्छा? तुझे बाबा असते तर मी हट्ट केला असता पण आता मला कोण देणार होतं?"


मी तिला पुढे काहीच बोलू दिलं नाही. आईचे ऋण मुलांनी फेडायचं असतं, सोनं-नाणं ठीक आहे समारंभ पुरतेच मिरवता येतात पण आयुष्यातला आनंद एकमेकांना काहीतरी देण्यातच असतो, मानलं तर आनंद हाच तर खरा दागिना आणि खरच सुख आहे.

माझ्या सासूबाई आणि आई मैत्रिणी होत्या, यात्रेच्या दरम्यान मध्ये त्यांच्यामध्ये पण अजूनच गूळपीठ निर्माण झालं. सासरे बरोबर असल्यामुळे दोघींना भक्कम सोबतही होती, चांगल्या शा ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोंदणी केल्यामुळे मला किंवा यजमानांना कुठलीच काळजी नव्हती.

माझी नोकरी मुलांची शाळा मानसीचे नोकरी चालू होती. मधून मधून आईच्या घरी जाऊन साफसफाई करून आम्ही दोघी येत होतो.

 मानसी तोडे मिळाल्यामुळे ज्याम खुषीत होती. तीर्थयात्रेचे पैसे मी कुठून आणले हे तिने मला विचारले देखील नाही. मी पण तिला काहीच सांगितले नाही.

 आई सासुबाई सासरे यांच्या प्रत्येक देव दर्शन झाल्यावर ती खूप आनंदी चेहऱ्याचे फोटो घरी येत होते. ते बघूनच मला खूप समाधान वाटत होते.


     एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंजीची ची तारीख निघाल्यामुळे आता आमची खरेदी आणि बाकीच्या गोष्टींची धामधूम उडणार होती. अजून वेळ असल्यामुळे मी ठरवलं की सगळ्यांची तीर्थयात्रा पुर्ण होऊ द्यायची आणि मगच खरेदी करायची.


     पंधरा दिवसानंतर जेव्हा तिघेजण घरी आले तेव्हा ते अतिशय प्रसन्न होते. सासुबाई तर अतिशय खूश होत्या, सासर्‍यांची तब्येत छान झाली होती, आणि आई पण खूपच प्रसन्न दिसत होती. तिच्या भिशीच्या ग्रुप मध्ये रोज सांगण्यासारख्या कथा आता तिच्याकडे निर्माण झाल्या होत्या. तिच्यासारख्या कित्येक बायकांना तिचा हेवा वाटत होता. आईने मला आणि मानसीला बनारस होऊन खुप सुरेख बनारसी शालू आणले होते, दोघेही जावयांना सिल्क चे कपडे, तसेच नातवंडांसाठी पण छान छान भेटवस्तू आणल्या होत्या. मुंजी साठी घरातले दोन जाड चांदीचे पेले तिने पॉलिश करून तयार ठेवले होते.   


एप्रिल महिन्याचे अचानक सासूबाई आणि सासरे बँकांमध्ये जाऊ लागले, कधी कधी यजमान देखील त्यांच्याबरोबर असत. मला काहीतरी न सांगता त्यांची काहीतरी जुळवाजुळव चालू होती. त्याचा उलगडा मला गृह यज्ञाच्या दिवशी झाला.  गृह यज्ञाच्या दिवशी सासूबाईंनी मला कुंकू लावून हातामध्ये एक सुरेख बॉक्स ठेवला, उघडून बघते तो काय! माझ्या आईसारखेच, शिंदेशाही तोडे बॉक्स मध्ये ठेवले होते.

माझे डोळे एकदम पाण्याने भरून आले, " तुझी बहीण तोडे घालणार, म्हणून तुझ्यासाठी पण केले हो. मी आणि तुझ्या सासर्‍यांनी ठरवलं होतं तुला आवडेल अशी कुठली तरी सोन्याची गोष्ट तुला भेट म्हणून द्यायची. तुझ्या मनाचा मोठेपणा पाहिला हो. तुला मिळालेल्या पैशात तू आमच्यासाठी तीर्थयात्रेचा तिकीट काढलं तेव्हाच मी ठरवलं. अशीच आनंदी रहा." तोंड भरून सासुबाई आणि सासर्‍यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. मी भरून पावले.


Rate this content
Log in

More marathi story from kanchan chabukswar

Similar marathi story from Inspirational