Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

kanchan chabukswar

Crime


4.4  

kanchan chabukswar

Crime


शिकार आणि शिकारी

शिकार आणि शिकारी

10 mins 1.0K 10 mins 1.0K


अबोटाबाद हे थंड हवेचे ठिकाण हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात वसलेलं.

अफगाणिस्तान मधून आलेले कबाली जमातीचे काही लोक येथे स्थायिक झाले होते. मुख्यत्वेकरून पुष्तू , मुगल, मुसलमान, काही हिंदू लोक अबोटाबाद मध्ये मध्ये वास्तव्याला होते. लोक . थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे बरेचसे पर्यटक देखील जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी  नॅशनल पार्कमध्ये जात.

एका उच्चभ्रू पुष्तू खानदाना मधल्या कुटुंबामध्ये साहिल आणि सारा यांचा जन्म झाला. साहिलच्या आईच्या मागासलेपणामुळे त्याला लहानपणी पोलिओचे डोस दिले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे तो एका पायाने पांगळा होता. आई-वडिलांना त्याच्या पांगळेपणIचा अतिशय त्रास व्हायचा, म्हणून आणि पैशाला काही कमी नसल्यामुळे त्याच्या संगीताचा छंद, त्यांच्या भल्या प्रचंड वाड्यामध्ये जोरदार चालू होता.

माया आणि रुबी या दोघी जुळ्या बहिणी रूपांनी अतिशय सुरेख ोर्‍यापान नाजूक उंच. दिसायला सुरेख होत्या तसा त्या दोघींचा स्वभाव पण मनमिळावू शांत असा होता. या दोघींचे आई-वडील युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर असल्यामुळे कुटुंब अतिशय पुढारलेले होते. मुलींना शिक्षणाची, आणि कला जोपासण्याची मुभा होती. बुरसटलेल्या जुन्या रुढींना या कुटुंबाने फाटा दिला होता. त्या दोघी अतिशय मोकळ्या वातावरण मोठ्या होत होत्या. रुबी ने आपला क्लासमेट बेहरोज याला जीवनसाथी म्हणून निवडले होते, तर साहिलच्या आई-वडिलांनी मायाला मागणी घातली होती. रुबि न लॉ करून आपला नवरा बेहरोज बरोबर प्रॅक्टीस चालू केली, तर मायाने साहिल ला त्याच्या पांगळे पणासकट स्वीकारून त्याच्या आई-वडिलांवर जणू उपकारच केले. साहिल दिसायला रुबाबदार, गोरा उंच पठाण, अतिशय सज्जन, नरम स्वभावाचा, कलासक्त, एक उत्तम चित्रकार म्हणून तसेच एक उत्तम संगीतकार म्हणून नावारूपाला येत होता. त्याचा पांगळेपण सोडला तर साहिल हा अतिशय उत्तम जोडीदार माया ला मिळाला होता.

दोन अतिशय उत्तम जावई या मुलींना लाभले म्हणून माया आणि रुबी चे आई वडील अतिशय खुशीत होते. दोघींचीही शादी एकदमच करून गेले सहा महिने तिनही कुटुंब अगदी आनंदात होते. मोठ्या मंडळींनी तर पुढच्या वर्षी हज यात्रा करायची हे पण ठरवले होते.


साहिल ची धाकटी बहीण सारा, युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी विषयांमध्ये मास्टर्स करत होती. सारा उंच देखणी रंगाने गोरीपान,  कुरळे सोनेरी केस असलेली एक अतिशय सुरेख पठाण मुलगी. माया आणि सारा यांची इतकी मैत्री झाली ही जणू गुळपीठ. रुबी माया आणि सारा शॉपिंग ला जाणे सिनेमाला जाणे, सगळे बरोबरच करत.


दोन्ही कुटुंब म्हणजे साहिल आणि माया, रुबी आणि बेहरोझ

सुट्टीच्या दिवशी नॅशनल पार्कमध्ये फिरायला जात, तसेच कुठेही जायचे झाले तरी साहिल आणि माया, साराला बरोबर घेऊन जात.


खरे म्हणजे त्या दिवशी त्यांचा उंबरला जाण्याचा बेत होता, पण बेहरोज ला काम असल्यामुळे साहिल ,सारा ,माया आणि रुबी यांना घेऊन नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेला.

साहिल जरी पांगळा असला तरी त्याला गाडी व्यवस्थित चालवता यायची. त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ठराविक हॉटेलमध्ये नाश्ता करून गाडीनेच हळुवारपणे नॅशनल पार्क ची थंड हवा घेत ते पुढे जात होते.

अचानक एका वळणावर एक मोठी क्रुझर येऊन थांबली. मोठ्या लँड क्रुझर मधून एक मध्यमवयीन माणूस उतरला त्याच्या बरोबर दोन गुंड खाली उतरले. उतरल्या उतरल्या त्यांनी साहिलच्या गाडीचे मागचे टायर पंचर केले तोपर्यंत दुसऱ्या गुंडाने जबरदस्तीने सगळ्यांचे मोबाईल हिसकावून घेतले.

चेहऱ्यावर हसू आणून तो मध्यमवयीन माणूस म्हणाला," एका अपाहिज हो! फिर भी तीन-तीन औरते?" स्वतःचे रक्षण करता येत नाही आणि तीन-तीन बायकांना घेऊन कुठे फिरतोय ?” दोन बंदुकधारी दांडगट माणसं खाली उतरले, साहिलच्या चांगल्या पायावर लाथ मारून गुंडांनी त्याला खाली पाडले, त्याच्या कपाळावर पिस्तूल रोखून, तो मुलींच्या कडे बघून म्हणाला," कोई एक हमारे साथ चलो. नही तो आप सब मर जाओगे.," गयावया करणाऱ्या साहिल ला त्यांनी चांगलेच बदडून ठोकून काढले. तोपर्यंत दुसऱ्या गुंडांनी गाडीचे दार उघडून साराला बाहेर ओढली." हम इस को ले जायेंगे हम" असं म्हणत ते साराला गाडीकडे ओढायला लागले.

साहिल अशी अवस्था पाहून आणि लहानग्या सारा वर आलेला प्रसंग बघून, माया पुढे झाली, सारा लहान असल्यामुळे तिला पाठीशी घालून माया म्हणाली” मी येते, पण रुबी आणि साराला सोडा”.

त्या दोन दांगट माणसांनी मायाला आपल्या गाडीत कोंबले. साहिल् ला जमिनीवर ढकलून देऊन निघून गेले.

हे सगळे इतक्या पटकन घडलं हि कोणाला काही समजलेच नाही, मायाचा नवरा प्रत्यक्ष तिथे उभा असूनही दांडगट माणसांनी मायाला उचलून नेली होती. मुली कशासाठी उचलून नेतात हे सगळ्यांनाच माहीत होतं. काही धनदांडगे, किंवा काही राजकारणी, किंवा काही गुंड स्वतःच्या वासना शमविण्यासाठी सरळ रस्त्यावरून मुली उचलून नेत..

 साहिल, सारा आणि रुबी कमालीचे घाबरून घरी परत आले, साहिल चे वडील पण कबाली जमातीचे मुख्य होते, ते परत परत विचारत राहिली कि कोणी त्यांच्या सुनेला उचलून नेले. पण जर त्या लोकांनी काही पत्ताच सांगितलं नाही तर पुढे काय करणार.

 केवळ साराला वाचवण्यासाठी माया ने तिचा बळी दिला होता. माया शिक्षित होती, तिथे सासर आणि माहेर दोन्ही समजूतदार होते. तिला तिच्या आवडीचे स्वातंत्र्य होते. भल्या-बुऱ्या गोष्टींची तिला समजत होती. जेव्हा गुंड साराला ओढून न्यायला लागले, तेव्हा पुढचा काहीही विचार न करता केवळ साराला वाचवण्यासाठी मायाने स्वतःचा बळी दिला. नवीन निर्माण झालेल्या पाकिस्तानामध्ये जणू काही धनदांडग्यांचे राज्य होते. ज्याच्याकडे अमाप पैसा त्याची सत्ता. देशाच्या फाळणीनंतर ज्यांचे कारखाने, शेती उद्योगधंदे पाकिस्तानात होते आणि त्यांना तिथेच राहायचं होतं, त्यांचे फारच फावले. सर्वसाधारण माणसाला अतिशय धोकादायक वातावरणामध्ये राहावं लागत होतं. एक प्रकारच मोगलाई वातावरण परत निर्माण झालं होतं.

अचानक घरचा फोन वाजला, पलिकडे बोलणारा माणूस म्हणाला, “तुमची मुलगी तीन दिवसांनी परत येईल, तोपर्यंत पोलिसात गेलात तर बाकी दोघींना पळून येऊ पळवून नेऊ. “

उद्विग्न मनस्थितीत साहिल बाहेर निघून गेला. , त्याचा फोन वाजला, कोणीतरी त्याच्यावर व्यवस्थित रित्या पाळत ठेवून होता. साहिल काय करतोय कुठे जातोय, त्यांच्या घरातून कोणाला फोन जातोय सगळ्याची बित्तंबातमी पलीकडच्या लोकांना होती. परत परत फोन येत होता, पोलिसात गेलात किंवा कंप्लेंट केलीत तर बाकी दोघी मुलींना पण उचलून नेऊ.

     तिसऱ्या दिवशी माया परत आली. तिच्या हातावर आणि तोंडावर पट्ट्या होत्या. अतिशय मानसिक धक्का बसलेली माया घरी परतली होती. तिने कधी कल्पनाही केली नव्हती तिच्यासमोर असला प्रसंग येईल. . परत परत आपल्या वडिलांना विचारत होती ही पोलिसात तक्रार दिली की नाही?

 पोलिसात जाण्यात काहीच शहाणपणा नव्हता. सासू म्हणाली ,”झालं गेलं विसरून जा आणि नेहमीप्रमाणे नांदायला लाग”. साहिल काहिच बोलत नव्हता, त्याच्यामुळे मायाला अतिशय मनस्ताप होत होता. तिचं म्हणणं की पोलिसात जाऊन त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे. पण गुंड कोण होते कसे होते हे फक्त चेहऱ्यावरून तिला माहिती होतं त्यांचं नाव गाव पत्ता तिला काहीच माहीत नव्हता. मायाचे सासू-सासरे आणि आई-वडील तिची समजूत काढत राहिले. पण माया अतिशय भडकलेली होती. तिच्या पांगळ्या नवऱ्याने पोलिसात देखील तक्रार केली नव्हती याचा तिला अतिशय संताप येत होता. सारा बिचारी कोमेजून गेली होती कारण ते गुंड तिलाच पळवणार होती आणि तिच्या ऐवजी माया त्यांच्याकडे गेली होती. तिचा माया बद्दलचा आदर वाढला होता. साहिल आणि माया मध्ये समझोता व्हावा म्हणून ती जीवाची पराकाष्टा करत होती.

काही दिवसांनी हे वादळ शांत झाले आणि एक दिवस साहिल माया ला घेऊन सिनेमा बघायला गेला. जेव्हा साहिल तिकीट काढत होता तेव्हा त्यांनी मायाला कॉफी शॉप मध्ये जाऊन बसायला सांगितले. माया तिथे असताना अचानक कुठून तरी ते दोन्ही गुंड आले आणि माया ला एक गिफ्ट दिले. तिला म्हणाले," बहुत दिनो बाद बाहर निकले हो बहुत अच्छा लगा, हमारे शेहजादे आपको बडी याद करते है." साहिल नी त्या दोघांना ओळखलं आणि तो त्यांच्या अंगावर धावून गेला, पण त्या दोघांनी एका फटक्यात साहिल ला ढकलून दिले आणि निघून गेले. साहिल आणि माया नाराज होऊन घरी आले. साहिल न मायावर दोषारोपण केले , तिने त्या गुंडांना तिथे बोलावले, तर मायाने संतापून साहिल ला नामर्द म्हंटले.

   काही दिवसानंतर त्यांच्या दरवाजापाशी परत एक गिफ्ट पार्सल आलेले होते.

 कंटाळून माया आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली.

तर तिथे पण तिला त्या गुंडांचा सतत फोन येत राहिला. गुंड तिला साहिल पासून खुला करून आपल्या इथे यायला सांगत होते.

माया ,रुबी आणि बेहरोज विचारविनिमय करून एक आराखडा केला. त्यानुसार माया न त्या गुंडांना परत फोन केला की तिला पण भेटायचे आहे.

 ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्या रात्री मायाला घ्यायला गाडी आली, आणि माया शेहजादे सुलतान च्या जंगलातल्या रेस्ट हाऊस वरती जाऊन पोचली. अतिशय श्रीमंती थाटामाटात व्यवस्था असलेला रेस्ट हाऊस कोणालाही भुरळ घालेल असं होतं. सुलतान स्वतः मायाच्या स्वागताला दरवाजावर हजर होता. त्याचे डझनभर नोकर, चविष्ट अन्न वाढणारे वेटर्स, एकंदरीत मायाला त्याच्या संपत्तीची कल्पना आली. . सुलतान चे प्रादेशिक गव्हर्नर बरोबरचे फोटो बघून अतिशय नवल वाटले, आणि जेव्हा गव्हर्नर अली खान हे सुलतान चे वडील असल्याचे समजले तेव्हा तिला अतिशय धक्का बसला. बरोबर आहे पोलिस कंप्लेंट करून काहीही फायदा झाला नसता. तिच्याकडे काही साक्ष नव्हती का पुरावा नव्हता. आज मात्र ती तयार होऊन आली होती.

ठरल्याप्रमाणे सुलतान माया ला घेऊन त्यांच्या तळ्यावरती नौका विहारासाठी गेला. बोलत असताना तो म्हणाला की तो रोज दोन तास नौकाविहार करतो, त्याच्या आधीच्या दोन बायका गावी असतात, आणि त्यांच्या मध्ये कितीही लग्न करणं किंवा मुली पळवणे हे अतिशय सामान्य समजले जात.

 त्याचे उष्टे खाणारे नोकर, त्याचे पाय दाबणारे त्याच्या हाकेसरशी धावत येणारे सगळे गुलामच होते. अतिशय देखणा होता सुलतान, पैशाचा गुरुर, आणि तारुण्याचा जोश, कशाचीही फिकीर त्याला नव्हती. आणि मुली पळवणे हा गुन्हा आहे हेच त्याला माहित नव्हतं. एखादी भाजी आणल्यासारखे गुंडांना पाठवून रोज नवीन मुली आणत आणल्या जात. पण मायाची शालीनता, तिची हुशारी, देखणेपण, यामुळे सुलतान फारच भारावून गेला होता. तिला सारखा म्हणत होता साहिल पासून खुला कर आणि त्याच्या घरी येऊन राहा.

रात्री माया सुलतान बरोबर राहिली, आणि दुसऱ्या दिवशी तिने तडक पोलिस स्टेशन गाठले. सुलतान चे नाव न सांगता तिने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे कंप्लेंट केली.

डॉक्टरने तर मायाकडे साफ दुर्लक्ष केले. धनदांडग्यांचे ऐश्वर्य आणि त्यांचे छंद हे तिला पुर्ण माहीत होते. कुठलाही रिपोर्ट जरी दिला तरी त्याचा मायाला काहीही फायदा होणार नाही याची डॉक्टरला पूर्ण खात्री होती.

सुरुवातीला डॉक्टर तिच्याकडे बघण्या स तयार नव्हते, धनिकांच्या अशा कथा तिला माहीत होत्या, आणि पोलिस तक्रार करून काहीही उपयोग होत नाही हे पण तिला माहित होते. पण माया नी परत परत आग्रह करून तिच्याकडून आपली मेडीकल चाचणी करून घेतली. दुसऱ्या दिवशी रिपोर्टमध्ये मायावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आणि कोर्टामध्ये केस उभी राहिली.

कोर्टातील केस साधीसुधी नव्हती, प्रत्यक्ष गव्हर्नर च्या मुलावरती बलात्काराचा आरोप होता. साहिल ,माया त्यांचे आई-वडील या दोघांवरती जबरदस्त दबाव टाकण्यात आला, पैशाची भुरळ घालण्यात आली, दुबईमध्ये बिजनेस काढून देण्याची तयारी दाखवण्यात आली. सगळे गव्हर्नमेंट हादरून गेले.

सुलतान ला ताबडतोब दुबईला पाठवण्यात आले, त्याच्या पासपोर्ट वरती, खोटी एक्झिट डेट घालून तो देशाच्या बाहेर असल्याची ची साक्ष तयार करण्यात आली. डॉक्टरवर्ती दबाव आणून डीएनए सॅम्पल बदलण्यात आले, सुलतान च्या नोकराचे सॅम्पल तिथे ठेवण्यात आले. सगळा खोटा बनाव करून सुलतान पोलीस केस मधून बाइज्जत बरी झाला. न्यायाधीशाला जरी मायाच्या बाजूनी सहानभूती होती तरी समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार त्यांना निर्णय घ्यावा लागला.

टीव्ही, मिडीया, पेपर, सगळीकडे मायाच्या चारित्र्यावरती चिखल उडवण्यात आला. सर्व राजकीय खेळी. ज्याला त्याला आपल् सरकार टिकून पाहिजे होतं, तिथे माया सारख्या एखाद्या मुलीचा बळी गेला तर त्याची कोणाला काही फिकीर नव्हती. या सगळ्यांमध्ये मायाच्या आई- वडिलांनी आपल्याच बंगल्या खालच्या बेसमेंट मध्ये जाऊन स्वतःची कबर खणलि आणि आत्महत्या केली.

आता मात्र माया आणि रुबी एकदम एकट्या पडल्या, तरीपण त्यांनी हिंमत हारली नाही. मायावर झालेला अन्याय आणि त्यांच्या आई- वडिलांची झालेली आत्महत्या याचा सूड त्यांना घ्यायचा होता.

सारा ,रुबी, माया, साहिल आणि बेहरोज यांनी आता वकिली डावपेचांनी एक डाव टाकला. म्हणजे आता

“साप  पण मरेल आणि लाठी पण तुटणार नाही “

ठरल्याप्रमाणे ते सर्वजण रात्रीच्या अंधारात सुलतान च्या बंगल्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या तळ्याकाठी जमले. नेहमीप्रमाणे सुलतान नौकाविहार करत होता. याचे सगळे गुलाम आणि नोकर तलावाकाठी पत्याचा डाव टाकून बसले होते. सुलतान अतिशय बेफिकीर होता.

बेहरोज पोहत पोहत सुलतान च्या जवळ पोचला, बेसबॉल चा बॅटने सुलतान च्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याला बेशुद्ध केले. याच गाठोडं उचलून बोटीमध्ये झाकून, त्याने बोट किनार्‍यापाशी आणली. ताबडतोब साहिल दुसऱ्या बोटीत बसून सुलतान सारखेच बोट वल्हवत राहिला. तो विरुद्ध दिशेला आला. तिघी मुलींनी सुलतान गाठोडं उचलून गाडीच्या डिकी मध्ये टाकले. साहिल ने सुलतानचे मोबाईल तपासले, मायाला सुलतानचा पासकोड माहिती होता, साहिल न सुलतान च्या मोबाईल वरून , बराच मोठा मजकूर टाईप केला.

 मायाला दिलेल्या त्रासाबद्दल त्याने माफी मागितली. माया आणि बऱ्याच मासूम मुलींवरती

 त्याने बलात्कार केला होता हे त्याने कबूल केले. डॉक्टरच्या लॅबोरेटरी मधले वीर्याचे सॅम्पल बदलले होते हे देखील त्याने लिहिले. तो दुबई ला नसून बलात्काराच्या वेळेला घरातच होता हे देखील त्याने लिहिले. आईवडिलांची त्यांनी माफी मागितली. वडिलांचा गव्हर्नर असल्याचा त्याच्या गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे देखील त्याने लिहिले. त्यांनी स्वतःच्या दोन्ही बायकांची पण माफी मागितली,तो आत्महत्या करत असल्याचे लिहिले.

    माया, रुबी घरी पोहोचल्या. मायाने आपल्या वडिलांच्या कबरी शेजारीच एका मोठ्या लाकडी कपाटामध्ये सुलतान ला कोंबले. आणि त्याच्या डोक्यावर कॉंक्रीटचे मिश्रण ओतून दिले. सुलतान शुद्धीवर येऊन त्याने ओरडायला सुरुवात केली, पण माया नी सांगितले की हे तिच्या वडिलांचे घर असल्यामुळे आणि एका सुनसान जागेवर असल्यामुळे सुलतान चे ओरडणे कोणालाही ऐकू जाणार नाही. मायाने कपाट पूर्णपणे काँक्रीटचे भरून टाकले आणि सुलतान ला जिवंत समाधी दिली.

काम तमाम झाल्यावरती मायाने साहिल ला फोन केला. तोपर्यंत साहिल आणि बेहरोज सुलतान च्या सारखे नौकाविहार करत होते.

मायाचा फोन आल्यानंतर, सुलतान चे दोन्ही फोन वरून टाईप केलेला मेसेज मिडीया,, वकील, गवर्नर, पोलीस, या सगळ्यांना पाठवला. साखर मीठ कापूस आणि स्पंज घालून केलेला, सुलतान च्या आकाराचा मोठा भावला त्यांनी पाण्यात ढकलून दिला. त्यानंतर दोन्ही फोन नावे मध्ये सोडून साहिल आणि बेहरोज दुसऱ्या बोटीत बसून किनाऱ्यापर्यंत आले आणि आपल्या गाडीमध्ये बसून घरी निघून आले.

जेव्हा साहिल आणि बेहरोज गाडीमध्ये बसत होते तेव्हा अचानक तळ्यावरुन स्पॉटलाईट फिरायला लागला त्याचा अर्थ त्यांनी लिहिलेला मेसेज गव्हर्नर पर्यंत पोहोचला होता आणि त्यांनी बंगल्यातल्या नोकरांना सावध केले होते.

साखर मीठ कापूस आणि स्पंज घालून केलेला, सुलतान च्या आकाराचा मोठा भावला पाण्यावर थोडा वेळ तरंगला. साखरमीठ कापूस पाण्यात भिजले, शेवटी फक्त सुलतान चे कपडे पाण्यावर तरंगायला लागले.

गुलाम नोकर, सगळ्यांनी धडधड पाण्यामध्ये उड्या मारल्या, आणि तळ्यामध्ये पडलेल्या सुलतानला शोधण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही, न्युज पेपर, बाकीची मीडिया सगळीकडे एकच चर्चा,


“सुलतान ची आत्महत्या.” 

        .

.

.

.

     

शिकाऱ्याने केलेली शिकार त्याच्यावरच उलटली होती.Rate this content
Log in

More marathi story from kanchan chabukswar

Similar marathi story from Crime