Deore Vaishali

Tragedy

3  

Deore Vaishali

Tragedy

शेवटचे दर्शनही नसे नशिबी..

शेवटचे दर्शनही नसे नशिबी..

3 mins
291


स्मिता उठुन झाडझूड करायला लागली .रोहनही उठला होतो. सकाळी दोघांचाही नित्यनियम तो सकाळी जॉगिंगला जाणार व ती तिची सकाळची काम रोहन येईस्तोवर आवरणार..मग दोघेंसोबत बसुन चहा घेणार.... रोहन गेला तस तिने पटकन ,सडारांगोळी केली. चहा टाकलाच होता कारण रोहनची येण्याची वेळ झाली होती.पण आज स्मिताला जरा अस्वस्थच वाटत होत... रोहनचा गेटमध्ये पाय पडतो न पडतो तोच फोन वाजला .त्याने पटकन जाऊन फोन घेतला. खरतर इतक्या सकाळी कोणाचा फोन येत नसतो ..तीही धावत आली.रोहन फक्त" हं ....हं..."करत होता...

तिला काही कळेनासचं झालं...

त्याने फोन ठेवला.मुल व आई बाबाही तोवरच उठली होती...

"आहो ...कुणाचा फोन होता..."

"तो काही नाही गं ...कामाचा होता माझ्या"...म्हणत शांततेने मध्ये गेला...

"अगं स्मिता चहा घे गं टेबलवर" म्हणत त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.चहा घेतांना तिला तो प्यावासाच वाटत नव्हता...


"आहो ,मला जरा भितीच वाटते हो... सगळीकडे हा खतरनाक विश्राणु वाढतो आहे ..व गावाकडे फोनला रेंज नसते हो...बाबा आई ठिक असतील ना?"... तसा त्याला ठसका आला काय करावं सुचत नव्हतं व चहाही पिला जात नव्हता.


"अगं टेन्शन नको घेऊ आता करु यात फोन थांब जरा.."

"हं." म्हणत स्मिताने मुलांचे आवरायला घेतलं ..ती पाठमोरी झाली आणि रोहनने आई बाबांना स्मिताच्या वडिलांबद्दल सांगितलं... त्यांनाही धक्काच बसला....


दोन तीन दिवसात नित्यनियमाने फोन करणारे ..कस घेईल हि मुलगी...भितीच वाटत होती त्यांनाही सांगायला पण बोलावं लागणारच होत. मुलगी व वडिलांचे ते घट्ट नाते सगळेच जाणुन होते.....ते तिची आवड जोपासत . आजही कोणतीच गोष्ट तिच्या मनाविरुद्ध करत नव्हते... दोन मुल मुलगा अमेरिकेत... तर स्मिता शहरात... उच्च पद्स्थ व्यक्ती पण तोरा तसा काही नव्हता...रिटायर्ड झाल्यावर गावी आईवडिल व भाउबहिणींसोबत राहायचं ही इच्छा ....सहा महिन्यापुर्वीच गावाला शिफ्ट झाले होते.... जातांना मुलीला सोबत नेऊन घर सजवलं होत तिच्याच हाताने ..


"स्मिता मी गावी चाललो, आता नाही होणार हं जास्त भेट बाळा...आता तुझ्या ह्या बाबांना जास्त बोर करू नकोस हं "...असा जातांना टोमणा मारुन गेले होते...सासऱ्यांना ते शब्दच आठवले...


"बाबा चला हो चहा घ्या तुमचा"...असा ताने आवाज दिला...

"अरे रोहन सांगु यात का हिला..."केविलवाणी हाक बघुन ते म्हणालेत...

"पण बाबा आता काय करायचं हो...ते बघायलाही नाही भेटणार तिला, त्याचेही डोळे पाणावले ...".

सासरे जवळ आलेत..."

"स्मिता ...अगं नको चहा बेटा....बस जरा", तशी ती खुर्चीत बसली .सासुबाईंनी तिच्या खांद्यावर मागुन हात ठेवलेतं.


."काय झालं आई". बाबा काय म्हणतात ऐक,


"बोला ना बाबा"..."

"स्मिता बेटा आज कोरोनाची परिस्थिती खुप भयानक आहे गं...जरा समजून घे ...तुझे बाबा काल पॉझिटिव्ह आलेले रॉपिड टेस्टमध्ये... तुझ्या काकांनी तालुक्यातील दावाखाण्यात नेलं.पण त्यात त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि ते गेलेत... आंतविधीही पार पडला रात्रीच... आता तेथे कोणाला जाउही देत नाही... आईची टेस्टही पॉझिटिव्ह आहे ..रोहन आणि मी जातो आहोत तिकडे त्यांना येकडे एडमिट करूयात ..आता आईचा आधार बनायला हवं...तू तशी समजदार आहेसच....झालेल्या गोष्टिचा विचार करण्यापेक्षा ...आहे ते जरा सावरूयात ...हो ना बेटा..."...


स्मिता तर गोंधळलीच...शांत झाली न अश्रू, न शब्द....निःशब्द झालेली ती ...फक्त सासुबाईंच्या मांडीवर डोक ठेवून त्याच्याकडे एकटक बघत होती..


"अगं पोरी रडून मोकळी हो गं"

"असं शांत नको राहुस'"...तशी तिने जोरात आरोळी दिली,

" बाबा"


सगळ घर शांत व त्यात घुमणारा तो आवाज जणु आसमंतात पोहचला होता...अश्रु वाहत होते... हात धरुन चालायला, बोलायला, हसायला, व जगायला शिकवणारे बाबा ....आज शेवटची भेटही तीच्या नशिबी नव्हती .राजा गेला पण राजकुमारीत त्याचा जीव अडकलेलाच असेल ना?... ती अस्वस्थ होती. आज ना डोळ्यातील अश्रू पुसणारे हात होते ना ....हसू आणणारे ते बाबा.... पण


"बाबा "...म्हटल्यावर डोक्यावर हात ठेवणारा दुसरा हात पडला होता... तो म्हणजे सासरेबुवांचा ....एक आधाराचा....


(कोरोनाच्या काळात किती तरी सखींची हिच परिस्थिती आहे...मैत्रिणींनों वेळ खराब आहे।..सांभाळा स्वतःला... आपल्या जवळच्या व्यक्तिंचे अंतिम दर्शन घेणे शक्य नसलं तरी..त्यांच्या आठवणी आहेत ना त्या जपा...परिवाराला जपा..,स्वतः ला जपा...

अंतिम वेळ ही विधिलिखित असते...हे शाश्वत सत्य आहे......काळजी घ्या व सावरा...)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy