Rohit Surve

Horror

3  

Rohit Surve

Horror

शापित

शापित

3 mins
219


हल्ली पुढारलेल्या आपल्या महाराष्ट्र मधेय एक जुनी परंपरा चालूच आहे, ती म्हणजे नर बळी देण्याची... काही ठिकाणी तर हा प्रकार सुशिक्षित तरुणांकडूनही होताना दिसत आहे... हि गोष्टं नक्कीच लज्जास्पद आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला. आज आपण एकविसाव्या शतकामधेय आहोत, जिथे आपण नव-नवीन टेक्नोलोजीचा शोध लावून माणसांच्या कामा मुळे त्याच्या मनावर पडणारा ताण कमी होण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आज आपल्या देशात शिक्षणाचा दर्जाही इतका सुधरत चालला आहे कि कोणाला वाटणारच नाही कि आपण दोनशे वर्ष पारतंत्र्यात राहत होतो म्हणून. आज मुंबई सारख्या शहरा मधेय जिथे माणसाला आपल्या जिवाभावाच्या नातेवाईकांनाही भेटायला वेळ नाही, अश्या ह्या आपल्या प्रगत महाराष्ट्रात अजूनही नर-बळीची हि अघोरी परंपरा चालूच आहे, हे पाहून फार वाईट वाटतं.    


खेडेगावात तर जणू काही ह्या लोकांना दुसरा धंदाच नाही अश्यातरेने ह्या गोष्टी झपाट्याने होतायेत. आणि ह्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न कुठलाही कायदा करू शकत नाही ह्याचं सर्वात वाईट वाटतं, कारण हि गोष्टच मुळात अंधश्रधेतून निर्माण होत आहे. आणि हि अंधश्रध्दा निर्माण करणारे लोकं कोण असतात तर स्वतःला परमेश्वरी अवतार म्हणवून घेणारे. आणि ह्यांच्या म्हणण्याला बळी कोण पडतात, तर ज्यांना देव ह्या गोष्टी वरच विश्वास नाही अशी लोक...   ह्या भोंदू बाबांची पद्धत सुद्धा एक सारखीच असते ती म्हणजे एखादा दगड घ्यायचा त्याला कसा तरी कोरून कोरून जरासा का होईना पण देव दिसेल असा कोरायचा, नंतर शेंदूर ,हळद , कुंकू लावायचं आणि मग जगाला सांगत सुटायचं कि मला देव नेहमी भेटतो, माझ्याशी बोलतो , माझ्या बरोबरच जेवतो... आणि ह्या असल्या बोलणाऱ्याला भुलून लोकं त्यांच्यासाठी वाट्टेल ते करतात? अगदी आपल्या अगदी प्रिय असलेल्या नात लागाचा बळी सुद्धा द्यायला तयार होतात?   


अवघ्या जगातले वैज्ञानिक एड्स ह्या गंभीर आजारावर औषध शोण्यात व्यास्त आहेत आणि ते एक दिवस कदाचित ते औषध शोधण्यात यशस्वी सुद्धा होतील परंतु आपण आपल्या देशातल्या ह्या भोंदू बाबा आजारावर कधी तरी औषध शोधू शकू कि नाही ह्याचीच चिंता वाटते.   अश्या भोंदू बाबांवर विश्वास ठेवणार्यांना भोळी लोकं म्हणायचं कि मूर्ख असाच प्रश्न मना मधेय येतो. आज आपण आपल्या देशात आलेल्या परदेशी पाहुण्यांना आपल्या देशातल्या चांगल्या गोष्टी दाखवतो आणि ते त्यांना आत्मसाद कराव्याश्या वाटतात. आणि आपण आपली मन हि गर्वाने उंच करतो. अश्या प्रगत महाराष्ट्रच्या संस्कृतीमध्ये ही एक गोष्ट मात्र काळा डाग लावल्याशिवाय राहत नाही.   


अंधश्रद्धा ही एक अशी वाळवी आहे जी आपल्या पुरोगामी संस्कृतीला पोखरत चालली आहे. आपल्या हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत असे पुराणात म्हटले आहे. पण ह्या तेहतीस कोटी देवांपैकी एकही देव असा नाही जो त्यांनीच निर्माण केलेल्या विश्वातल्या जीवांचा बळी घेऊन आनंदी होईल. पण ह्या मुठभर भोंदू बाबांच्यामुळे फक्त आपल्या संस्कृतीवरच काळा डाग लागत नाहीये तर आपल्या धर्मावर आणि देवांवर हि लागतोय. आणि हा डाग जर का आणखीन वाढू नये असं जर का वाटत असेल तर सगळ्या सुशिक्षित वर्गाने एकत्रित येवून तो डाग पुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सरकारने सुद्धा कडक पाउलं उचलायला हवीत, आणि जो कोणी भोंदूगिरी करत असेल त्याला कोणाचीही गय न करता कडक शासन केलं पाहिजे. तरच ह्या पुढारलेल्या महाराष्ट्राला भोंदू बाबा या शापातून मुक्त करता येईल. अन्यता महाराष्ट्र हा नेहमी असाच शापित राहील...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror