Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Prashant Ruikar

Romance Classics

1  

Prashant Ruikar

Romance Classics

शालिनी आणि अनिलच प्रेम

शालिनी आणि अनिलच प्रेम

6 mins
1.3K


रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी ही उशीराच उठायची सवय लागली त्याला... रोजच... आज ही शांत झोपला होता... एकदम गाढच... सगळं काही शांत शांत वाटत होत त्याला... ना कसली दगदग ना कुठला आवाज... इतक्यात मोबाईलचा आवाज झाला ट्रिंग ट्रिंग... ट्यून जुनी असली तरी त्याला फार आवडायची... तो गाढ झोपीत होता... त्याला काही ऐकवत नव्हतं... पण परत आवाज झाला ट्रिंग ट्रिंग... त्याला काहीतरी आवाज होत असल्याच जाणवल... त्यानं चादर वर केली आणि मोबाईल हातात घेतला... आणि पाहिलं तर त्याच्या तिचा फोन... शालिनीचा फोन... बऱ्याच दिवसांनी... हा उतावीळा झाला... नेहमीसारखाच... 


एक तर वर्षे दोन वर्षे झाली होती... दोघांना भेटून... बोलून... आणि बघूनही... अर्थातच... तिचा तो... म्हणजे कुमठेकरांचा अनिल... अनिल आज वेगळ्याच धुंदीत होता... त्या धुंदीत त्याला तीचा फोन ही उचलता आला नाही... तो परत परत मोबाईलकडे पाहू लागला... नक्की तिचाच होता का ??


शालिनी चा परत फोन आला... आता हा काही थांबणार नव्हता... अर्थातच... उचलला फोन आणि लावला कानाला... 


हॅलोss

हां... अनिल...

हां बोलतोय...

अरे मी शालिनी बोलतेय... शालिनी करंजकर...

हां बोल शालिनी... 

अरे मी आज सकाळीच पुण्यात आले... परांजपेच्या मीरीन सांगितल की, तू सध्या इथेच आहेस ते... मी तिच्याकडेच थांबलेय...

अरे काय रे हल्ली फोन नाही मॅसेज नाही कुठं असतोस ??

अगं काही नाही थोडी काम लागलीत मागे कॉलेजची, एन.एस.एस ची त्यामुळे वेळ भेटत नाही...

आज भेटतोस का ?? 

कुठे ??

शर्मिली चौकात

हां चालेल

चल ठेवते

हा चालेल

चल बाय

बाय बाय...


शालिनीने फोन ठेवला... पण अनिलच्या कानाचा फोन काही त्याला सोडवत नव्हता... तो आता जामच खूष होता... आज शालिनी आणि अनिल दोघे भेटणार होते... तब्बल वर्षाने  दोन वर्षांनी... 


डिग्रीला दोघेही एकाच कॉलेजात होते... मागच्या बाकावर बसून... ती घरी जाताना तिचा पाठलाग करुन... घराचा पत्ता काढून... गाडीचा नंबर तोंडपाठ करुन... असच... एकमेकांना पाहत पाहत बोलत बोलत यांना ही प्रेम झालं... इतरांसारखच... कळत नकळत... 

सध्या शालिनी ही कोल्हापूरला स्पर्धा परीक्षेचे क्लास करतेय... आणि अनिल हा पुण्यात एम.बी.ए करतोय... 


अकरा साडेअकराच्या सुमारास अनिलला फोन आला... 

अर्थातच शालिनीचाच तो... 

अरे कुठे आहेस अनिल ??

निघालास का ??

हां निघालोच बस्स पाच मिनिटात

मी शर्मिली चौकात आलेय, ये तू लवकर

आलोचss..


अनिल मागच्याच साऱ्या आठवणीत रमला होता... कसाबसा लवकर तयार झाला... नि कपड्याला परफ्युम फासला... तशीच पी.एम.टी पकडली... थेट शर्मिली चौकच... 


शालिनी वाट पाहून निघून गेली तर ?? किती वेळ लागेल जायला ?? आपल्याकडे ही बाईक हवी होती?? लवकर गेलो असतो... अशी प्रश्न त्याला सतावीत होती... कधी पोहोचतो अस त्याला झाल होत... 

इतक्यात, 

कंडक्टरचा आवाज चला शर्मिली चौक... शर्मिली चौक... उतरा लवकर शर्मिली चौकवाले... आता अनिलला फार बर वाटत होत... 


अनिलने शालिनीला फोन केला... 

हॅलोss शालिनी

मी आलोय शर्मिली चौकात 

तू कुठे आहेस ??

विश्रामबाग वाड्यासमोर येतोस का??

बर आलोच... थांब दोन मिनिटात...


रस्त्यावरच्या गर्दीला मागे सारत सारत फूटपाथवरन अनिल पळतच सुटला होता... विश्रामबाग वाड्याकडे... अर्थातच... विश्रामबाग वाड्याच्या पश्चिमेला तोंड करुन निळा टॉप आणि फॉरमल जीन्स घातलेली एक पाच साडेपाच फूट उंचाची मुलगी उभी होती... अगदी अंदाजेच... सुंदर गोरीपान... मऊ मऊ गाल... गोल गोल चेहरा... केस मानेवर सोडलेले... मोकळे... अर्थातच... 

अनिलला तीच वाटत होती शालिनी... इतक्यात तिनेच तेवढ्या गर्दीत हात वर केला... आणि आवाज दिला...

अनिलss इकडे इकडे... गर्दी असल्यामुळे कधी वर झालेला हात स्पष्ट दिसायचा... आणि नाजूक हातातल्या बांगड्याही... तर कधी गर्दीत हात कुठे हरवून जायचा कळायच नाही... अर्थातच... ती थोडीफार बदलली होती पण अनिल अगोदरचा होता तसाच होता... अगदीच आत्ताही... शालिनीने त्याला अचूक ओळखल... कशीबशी गर्दी बाजूला झाली... अनिल एकदाचा शालिनीजवळ पोहचला...


मिस. शालिनी करंजकर तुमच पुण्यात स्वागत आहे... 

अनिल काय रे हा वेडेपणा

शालिनी किती बदललीस तू

होय रे

तू मात्र आहे तसाच आहेस आणखी 'काडीपैलवान'...

बर ते सोड

काय म्हणते तुझी कलेक्टरी ??

अजून कुठे झालेय रे, काल दिलाय पेपर होईल वाटतय काहीतरी बघू पुढे ??

झालीसच गं तू कलेक्टर आता

अरे किती बोलशील , चहा बिहा पाज काहीतरी खाऊ पिऊ घाल

चल फर्स्ट क्लास पैकी चहा घेऊ , ए.बी.सी.चौकातला 

बर झाल चल... मला ही ए.बी.सी. चौकातून पुस्तक पण घ्यायची आहेत.

अच्छा चल मग...


विश्रामबाग वाड्यासमोरुन दोघे निघाले ए.बी.सी कडे... दोघात अंतर होता... बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती... आत खूप काही दाटल होत... पण कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता... सगळ काही चुडीचापच... काय बोलाव कुठून सुरुवात करावी... कुणी बोलाव... हेच चालू होत... आतल्या आतच... दोघांच्याही... अर्थातच...


त्यांचा मागच्या आठवणींचा कप्पा आता भराभर मोकळा होऊ लागला होता... आणि शालिनीचा हात अनिलच्या हातात कधी आला हे त्यालाही कळल नाही... शालिनी ही आता सार काही आठवू पहात होती... तिलाही आता शांत वाटत होत... सुकूनच... 


सार काही निवांत... इतक्यातच आवाज... गरम चाय गरम चाय... चहाच दुकान आल... दोघांनी चहा घेतला... चहाच बिल टेबलावर आल... तसाच दोघांचाही हात एकदाच त्या बिलावर पडला... पण अनिलचाच हात त्या बिलावर अगोदर पडला होता... नेहमीप्रमाणेच... अनिलच चहाच बिल दिल... आणि दोघेही बाहेर पडले...


शालिनीने ए.बी.सी चौकात पुस्तकांची खरेदी केली... आवडीचीच तिच्या... अर्थातच... अनिलला आजचा दिवस वाढतच जावा अस वाटत होत... 


लक्ष्मी रोडला शालिनी आणि अनिलची क्लासमेट मीरा... अर्थातच... मीरा परांजपे... ही येणार होती... चार पाचच्या सुमारास... मीरा परांजपे ही शालिनीची खास मैत्रीण... मीरेच्या घरची परिस्थिती थोडी हलाखीचीच... म्हणून ती सध्या बी.टी.डब्लू ग्रुपला जॉईन झाली होती... सेल डिपार्टमेंटला... अर्थातच... अनिलनेच तिच्या नोकरीकरिता धडपड केली होती... आणि बी.टी.डब्लू ग्रुपला तिला लावून दिल होत... 


साडेचार झाले होते... मीरेचा अजून काही पत्ता नव्हता... लक्ष्मी रोडच्या कॉर्नरला शालिनी आणि अनिल मीरेची वाट पाहत होते... अनिलला मात्र मीरा उशिराच याव वाटत होत... म्हणून तो मीरेला फोन ही करत नव्हता... 


पुणे स्टेशनला जाणारी पी.एम.टी लक्ष्मी रोडजवळ आली... मागच्या दारान एक मुलगी सावकाश उतरत होती... थोडीशी दबकत दबकतच... सावळी... सोज्वळ... अर्थातच... शालिनीने पाहिल... मीराच होती ती... शालिनीने आवाज दिला... नेहमीप्रमाणेच...

ए.. मीरेss... 


शालिनी, अनिल आणि मीरा तिघेही एकत्र जमले... शालिनी आणि मीरा दोघेच बोलू लागले... बकबक सुरुच झाली दोघांची... अनिल शांत होता... आता त्याच काही चालणार ही नव्हत... अर्थातच...


मीरेला तुळशीबागेत जायच होत... कपडे घ्यायला... अर्थातच... तिने शालिनीचा हात हातात घेतला आणि तिघेही तुळशीबागेकडे जाऊ लागले... अनिल एकटाच पडला... इतका वेळ अनिलच्या हातात असणारा शालिनीचा हात आता मीरेच्या हातात पडला होता... 


तुळशीबागेत कपड्यांची खरेदी झाली... मीरेन चांगले दोन तीन ड्रेस घेतले... एकदाचे... मीरेन शालिनीसाठी ही एक टॉप घेतला... लाल रंगाचा... फर्स्टक्लासच... शालिनीला अनिल ची मनस्थिती चांगलीच परिचयाची होती... तिला अनिलची परेशानी कळत होती... पण काही पर्यायच नव्हता... अर्थातच...


मीरा म्हणाली, 

अरे अन्या चल की ऊसाचा रस पिऊ थोडा... मस्तपैकी... 

हो हो चला की,

काय गं शालिनी घ्यायचा का रस??

हो हो चला...


शालिनी आणि अनिल एकमेकांकडे पाहत होते... इशाऱ्यावरच चालल होत सार काही त्यांच... अगदी शांतच... शालिनी ही मीरेच्या बकबकीला कंटाळली होती... मीरेच्या उजव्या हाताला शालिनी झाली... आणि शालिनीच्या उजव्या हाताला अनिल होता... नेहमीप्रमाणेच... मंडई आली... मंडई जवळ तिघांनी ऊसाचा रस घेतला... साडेसहा झाले होते... साधारणता... 


मीरा म्हणाली, 

शालिनी चल आता निघायला हव साडेसहा झालेत

तुला निघायचही आहे आज आणखी

इतक्यात अनिल म्हणाला 

आजच जातेयस का कोल्हापूरला ??

हो रे निघायला हव आजच 

उद्या पासून नवीन बॅच चालू होतेय 

अच्छा अच्छा


मीरेन अनिलकडे पाहिल... विचारात मग्न दिसत होता... मीरेन अचूक ओळखल... अर्थातच... मीरेन आपल्याला कुणाचा तरी फोन आल्याचा बहाणा केला... 

हॅलोss हॅलोss करत ती थोडस लांब निघून गेली...

शालिनीला तिचा बहाणा चांगलाच कळला होता... नेहमीसारखाच... पी.एम.टी स्टॉपला अनिल आणि शालिनी  एकटेच थांबले होते... 


शालिनी म्हणाली,

अनिलss खूप छान वाटल तुला आज भेटून बोलून

आजचा दिवस मागच्या वर्ष्या दोन वर्ष्याच्या आठवणी पुसून काढणारा होता... सार काही तसच आहे... अजूनही आपल्यात... आज ही तू तसाच आहे... अगदी पूर्वीसारखाच... तितकाच प्रेमळ... मला आवडलेला अन्या... अर्थातच... अनिल कुमठेकर... अजूनही बदलला नाही... खरच किती गोड आहेस रे अन्या तू... तू ना कभी बदला है और ना कभी बदलेगा... पिण वगैरे परत चालू केल नाहीस ना अन्या... खरच किती मस्त राहायचो यार आपण पूर्वी... आज वर्षे दोन वर्षे झाली भेटून आपल्याला तरीही तू मला तितकाच आवडतोस... 

अनिल म्हणाला, 

शालिनी किती बोलशील... मलाही बोलू दे काहीतरी... आज सकाळपासून मी तुझ्या तोंडून आत्ता अन्या ऐकलय... मला वाटल कलेक्टरीच्या अभ्यासात तुला अन्या विसरला काय की ?? ज्या शालिनीला मी फक्त पाहण्याकरीता पूर्ण कॉलेज करायचो... घरी जायचा मार्ग बदलायचो... आज तीच शालिनी तितकीच गोड आणि सुंदर आहे... अगदी होती तशीच... फारच हळवी... मला आवडलेली शालिनी... शालिनी करंजकर... अर्थातच... पिण वगैरे सार काही सार काही बंदच आहे...

आता नको दुरावा वाढवायला शालिनी... आता राहू आपण संपर्कात... पूर्वीसारखेच...


साडेसात होत आले होते... मीरेन त्यांच निरोप हास्य अचूक ओळखल... आणि सरकन शालिनी जवळ आली... 

अगं शालिनी काही नाही, कंपनीचा कॉल आला होता...

वेळ लागला थोडासा सॉरीss...

शालिनीने हसत हसत मान उजवीकडून डावीकडे केली...


मीरेन अनिलला शेकहॅन्ड केला... चल येते अन्या... भेटू परत... हो चालेल... 

शालिनी म्हणाली, चल निघते अन्या आता... निघायला हव उशीर होतोय... काळजी घे स्वतःची... और तबीयत भी सुधार थोडीसी खुद की... नेहमीसारखच...

अनिल ने हसत हसत शालिनीच्या मुठीला मूठ लावली...


सिंहगड ची पी.एम.टी आली... शालिनी आणि मीरा आत चढल्या... शालिनी खिडकीला बसताच खटकन तिने खिडकी मागे सरकावली... आणि अन्याला पाहू लागली... नेहमीप्रमाणेच... 


अनिल खालीच उभा होता... विचारात पडला होता... आठवणीत रमला होता... पी.एम.टी चालू झाली... शालिनी अनिलला हात बाहेर काढून निरोप देऊ लागली... अनिल ही खालून तिला बाय बाय करु लागला... अनिलला आता स्पष्ट दिसत होत्या त्या फक्त तिच्यासोबतच्या आजच्या आठवणी... आणि तिचा खिडकीतून अनिलसाठी बाहेर आलेला हात...



Rate this content
Log in

More marathi story from Prashant Ruikar

Similar marathi story from Romance