Prashant Ruikar

Romance

1.8  

Prashant Ruikar

Romance

शालिनी आणि अनिलचं प्रेम

शालिनी आणि अनिलचं प्रेम

6 mins
1.0K


रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळीही उशीराच उठायची सवय लागली त्याला. रोजच... आजही शांत झोपला होता. एकदम गाढच... सगळं काही शांत शांत वाटत होतं त्याला. ना कसली दगदग ना कुठला आवाज. इतक्यात मोबाईलचा आवाज झाला... ट्रिंग ट्रिंग... ट्यून जुनी असली तरी त्याला फार आवडायची. तो गाढ झोपेत होता. त्याला काही ऐकू येत नव्हतं. पण परत आवाज झाला ट्रिंग ट्रिंग... त्याला काहीतरी आवाज होत असल्याचं जाणवलं... त्यानं चादर वर केली आणि मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं तर त्याच्या तिचा फोन... शालिनीचा फोन... बऱ्याच दिवसांनी... हा उतावीळ झाला नेहमीसारखाच... 


एक तर वर्ष दोन वर्ष झाली होती दोघांना भेटून... बोलून... आणि बघूनही... अर्थातच तिचा तो म्हणजे कुमठेकरांचा अनिल. अनिल आज वेगळ्याच धुंदीत होता. त्या धुंदीत त्याला तिचा फोनही उचलता आला नाही. तो परत परत मोबाईलकडे पाहू लागला. नक्की तिचाच होता का??


शालिनीचा परत फोन आला. आता हा काही थांबणार नव्हता. अर्थातच उचलला फोन आणि लावला कानाला. 


हॅलोss

हां... अनिल...

हां बोलतोय...

अरे मी शालिनी बोलतेय... शालिनी करंजकर...

हां बोल शालिनी... 

अरे मी आज सकाळीच पुण्यात आले... परांजपेच्या मीरीनं सांगितल की, तू सध्या इथेच आहेस ते. मी तिच्याकडेच थांबलेय...

अरे काय रे हल्ली फोन नाही मॅसेज नाही कुठं असतोस?

अगं काही नाही थोडी कामं लागलीत मागे कॉलेजची, एन.एस.एस. ची त्यामुळे वेळ भेटत नाही.

आज भेटतोस का? 

कुठे?

शर्मिली चौकात

हां चालेल

चल ठेवते

हा चालेल

चल बाय

बाय बाय...


शालिनीने फोन ठेवला. पण अनिलच्या कानाचा फोन काही त्याला सोडवत नव्हता. तो आता जामच खूष होता. आज शालिनी आणि अनिल दोघे भेटणार होते. तब्बल वर्ष-दोन वर्षानी... 


डिग्रीला दोघेही एकाच कॉलेजात होते. मागच्या बाकावर बसून, ती घरी जाताना तिचा पाठलाग करुन, घराचा पत्ता काढून, गाडीचा नंबर तोंडपाठ करुन, असंच... एकमेकांना पाहत-पाहत, बोलत-बोलत यांनाही प्रेम झालं. इतरांसारखंच... कळत नकळत... 

सध्या शालिनी ही कोल्हापूरला स्पर्धा परीक्षेचे क्लास करतेय आणि अनिल हा पुण्यात एमबीए करतोय. 


अकरा साडेअकराच्या सुमारास अनिलला फोन आला.

अर्थातच शालिनीचाच तो.

अरे कुठे आहेस अनिल?

निघालास का?

हां निघालोच, बस्स पाच मिनिटांत...

मी शर्मिली चौकात आलेय, ये तू लवकर

आलोचss...


अनिल मागच्याच साऱ्या आठवणीत रमला होता. कसाबसा लवकर तयार झाला नि कपड्याला परफ्युम फासला. तशीच पीएमटी पकडली. थेट शर्मिली चौकच... 


शालिनी वाट पाहून निघून गेली तर? किती वेळ लागेल जायला? आपल्याकडेही बाईक हवी होती? लवकर गेलो असतो. असे प्रश्न त्याला सतावीत होती. कधी पोहोचतो असं त्याला झालं होतं. 

इतक्यात, कंडक्टरचा आवाज... चला शर्मिली चौक... शर्मिली चौक... उतरा लवकर शर्मिली चौकवाले... आता अनिलला फार बर वाटत होतं. 


अनिलने शालिनीला फोन केला. 

हॅलोss शालिनी

मी आलोय शर्मिली चौकात 

तू कुठे आहेस?

विश्रामबाग वाड्यासमोर येतोस का??

बरं आलोच. थांब दोन मिनिटं...


रस्त्यावरच्या गर्दीला मागे सारत सारत फूटपाथवरनं अनिल पळतच सुटला होता. विश्रामबाग वाड्याकडे... अर्थातच विश्रामबागवाड्याच्या पश्चिमेला तोंड करुन निळा टॉप आणि फॉरमल जीन्स घातलेली एक पाच-साडेपाच फूट उंचाची मुलगी उभी होती. अगदी अंदाजेच. सुंदर, गोरीपान, मऊ मऊ गाल, गोल गोल चेहरा, केस मानेवर सोडलेले, मोकळे... अर्थातच... 

अनिलला तीच वाटत होती शालिनी... इतक्यात तिनेच तेवढ्या गर्दीत हात वर केला आणि आवाज दिला.

अनिलss इकडे इकडे... गर्दी असल्यामुळे कधी वर झालेला हात स्पष्ट दिसायचा... आणि नाजूक हातातल्या बांगड्याही... तर कधी गर्दीत हात कुठे हरवून जायचा कळायचं नाही. अर्थातच ती थोडीफार बदलली होती पण अनिल अगोदरचा होता तसाच होता. अगदीच आत्ताही... शालिनीने त्याला अचूक ओळखलं. कशीबशी गर्दी बाजूला झाली. अनिल एकदाचा शालिनीजवळ पोहचला.


मिस शालिनी करंजकर तुमचं पुण्यात स्वागत आहे... 

अनिल, काय रे हा वेडेपणा

शालिनी किती बदललीस तू

होय रे

तू मात्र आहे तसाच आहेस आणखी 'काडीपैलवान'...

बर ते सोड

काय म्हणते तुझी कलेक्टरी?

अजून कुठे झालेय रे

काल दिलाय पेपर होईल वाटतंय काहीतरी बघू पुढे?

झालीसंच गं तू कलेक्टर आता

अरे किती बोलशील 

चहाबिहा पाज, काहीतरी खाऊ-पिऊ घाल

चल फर्स्ट क्लासपैकी चहा घेऊ 

एबीसी चौकातला 

बरं झालं चल... मला ही एबीसी चौकातून पुस्तक घ्यायची आहेत

अच्छा चल मग...


विश्रामबाग वाड्यासमोरुन दोघे निघाले एबीसी कडे... दोघांत अंतर होतं. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. आत खूप काही दाटलं होतं. पण कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता. सगळं काही चिडीचुप... काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, कुणी बोलावं, हेच चालू होतं. आतल्या आतच... दोघांच्याही... अर्थातच...


त्यांचा मागच्या आठवणींचा कप्पा आता भराभर मोकळा होऊ लागला होता आणि शालिनीचा हात अनिलच्या हातात कधी आला हे त्यालाही कळल नाही. शालिनीही आता सारं काही आठवू पहात होती. तिलाही आता शांत वाटत होतं. सुकूनच... 


सारं काही निवांत... इतक्यातच आवाज... गरम चाय गरम चाय... चहाचं दुकान आलं... दोघांनी चहा घेतला... चहाचं बिल टेबलावर आलं... तसा दोघांचाही हात एकदाच त्या बिलावर पडला. पण अनिलचाच हात त्या बिलावर अगोदर पडला होता. नेहमीप्रमाणेच... अनिलनेच चहाचं बिल दिलं आणि दोघेही बाहेर पडले.


शालिनीने एबीसी चौकात पुस्तकांची खरेदी केली. आवडीचीच तिच्या... अर्थातच... अनिलला आजचा दिवस वाढतच जावा अस वाटत होतं... 


लक्ष्मी रोडला शालिनी आणि अनिलची क्लासमेट मीरा... अर्थातच... मीरा परांजपे... ही येणार होती... चार-पाचच्या सुमारास... मीरा परांजपे ही शालिनीची खास मैत्रीण... मीरेच्या घरची परिस्थिती थोडी हलाखीचीच... म्हणून ती सध्या बी.टी.डब्लू ग्रुपला जॉईन झाली होती... सेल डिपार्टमेंटला... अर्थातच... अनिलनेच तिच्या नोकरीकरिता धडपड केली होती... आणि बी.टी.डब्लू ग्रुपला तिला लावून दिलं होतं... 


साडेचार झाले होते... मीरेचा अजून काही पत्ता नव्हता. लक्ष्मी रोडच्या कॉर्नरला शालिनी आणि अनिल मीरेची वाट पाहत होते. अनिलला मात्र मीरा उशिराच यावी असं वाटत होतं म्हणून तो मीरेला फोनही करत नव्हता. 


पुणे स्टेशनला जाणारी पीएमटी लक्ष्मी रोडजवळ आली. मागच्या दाराने एक मुलगी सावकाश उतरत होती. थोडीशी दबकत दबकतच... सावळी, सोज्वळ, अर्थातच... शालिनीने पाहिलं... मीराच होती ती... शालिनीने आवाज दिला... नेहमीप्रमाणेच...

ए.. मीरेss... 


शालिनी, अनिल आणि मीरा तिघेही एकत्र जमले. शालिनी आणि मीरा दोघीच बोलू लागल्या. बकबक सुरुच झाली दोघांची. अनिल शांत होता. आता त्याचं काही चालणारही नव्हतं... अर्थातच...


मीरेला तुळशीबागेत जायचं होतं. कपडे घ्यायला. अर्थातच... तिने शालिनीचा हात हातात घेतला आणि तिघेही तुळशीबागेकडे जाऊ लागले. अनिल एकटाच पडला. इतका वेळ अनिलच्या हातात असणारा शालिनीचा हात आता मीरेच्या हातात पडला होता. 


तुळशीबागेत कपड्यांची खरेदी झाली. मीरेनं चांगले दोन-तीन ड्रेस घेतले. एकदाचे... मीरेनं शालिनीसाठीही एक टॉप घेतला. लाल रंगाचा. फर्स्टक्लासच... शालिनीला अनिलची मनःस्थिती चांगलीच परिचयाची होती. तिला अनिलची परेशानी कळत होती. पण काही पर्यायच नव्हता. अर्थातच...


मीरा म्हणाली, 

अरे अन्या चल की ऊसाचा रस पिऊ थोडा... मस्तपैकी... 

हो हो चला की,

काय गं शालिनी घ्यायचा का रस?

हो हो चला...


शालिनी आणि अनिल एकमेकांकडे पाहत होते... इशाऱ्यावरच चाललं होतं सारं काही त्यांचं... अगदी शांतच... शालिनीही मीरेच्या बकबकीला कंटाळली होती... मीरेच्या उजव्या हाताला शालिनी झाली आणि शालिनीच्या उजव्या हाताला अनिल होता. नेहमीप्रमाणेच... मंडई आली. मंडईजवळ तिघांनी ऊसाचा रस घेतला. साडेसहा झाले होते. साधारणतः... 


मीरा म्हणाली, 

शालिनी चल आता निघायला हवं साडेसहा झालेत

तुला निघायचंही आहे आज आणखी

इतक्यात अनिल म्हणाला 

आजच जातेयस का कोल्हापूरला?

हो रे निघायला हवं आजच 

उद्यापासून नवीन बॅच चालू होतेय 

अच्छा अच्छा


मीरेन अनिलकडे पाहिलं... विचारात मग्न दिसत होता. मीरेनं अचूक ओळखलं. अर्थातच... मीरेनं आपल्याला कुणाचा तरी फोन आल्याचा बहाणा केला. 

हॅलोss हॅलोss करत ती थोडंसं लांब निघून गेली.

शालिनीला तिचा बहाणा चांगलाच कळला होता. नेहमीसारखाच... पीएमटी स्टॉपला अनिल आणि शालिनी दोघेच थांबले होते. 


शालिनी म्हणाली,

अनिलss खूप छान वाटलं तुला आज भेटून बोलून

आजचा दिवस मागच्या वर्ष-दोन वर्षाच्या आठवणी पुसून काढणारा होता. सारं काही तसंच आहे. अजूनही आपल्यात... आजही तू तसाच आहेस, अगदी पूर्वीसारखाच... तितकाच प्रेमळ... मला आवडलेला अन्या... अर्थातच... अनिल कुमठेकर... अजूनही बदलला नाही... खरंच किती गोड आहेस रे अन्या तू... तू ना कभी बदला है और ना कभी बदलेगा... पिणं वगैरे परत चालू केलं नाहीस ना अन्या... खरंच किती मस्त राहायचो यार आपण पूर्वी... आज वर्ष- दोन वर्ष झाली भेटून आपल्याला तरीही तू मला तितकाच आवडतोस... 


अनिल म्हणाला, 

शालिनी किती बोलशील, मलाही बोलू दे काहीतरी... आज सकाळपासून मी तुझ्या तोंडून आत्ता अन्या ऐकलंय... मला वाटलं कलेक्टरीच्या अभ्यासात तुला अन्या विसरला काय की? ज्या शालिनीला मी फक्त पाहण्याकरीता पूर्ण कॉलेज करायचो... घरी जायचा मार्ग बदलायचो... आज तीच शालिनी तितकीच गोड आणि सुंदर आहे... अगदी होती तशीच... फारच हळवी... मला आवडलेली शालिनी... शालिनी करंजकर... अर्थातच... पिणं वगैरे सारं काही बंदच आहे.

आता नको दुरावा वाढवायला शालिनी... आता राहू आपण संपर्कात... पूर्वीसारखेच...


साडेसात होत आले होते... मीरेनं त्यांचं निरोपाचं हास्य अचूक ओळखलं... आणि सरकन ती शालिनीजवळ आली. 

अगं शालिनी काही नाही, कंपनीचा कॉल आला होता.

वेळ लागला थोडासा सॉरीss...

शालिनीने हसत हसत मान उजवीकडून डावीकडे केली...


मीरेनं अनिलला शेकहॅन्ड केला. चल येते अन्या... भेटू परत... हो चालेल... 

शालिनी म्हणाली, चल निघते अन्या आता... निघायला हवं उशीर होतोय... काळजी घे स्वतःची... और तबियत भी सुधार थोडीसी खुद की... नेहमीसारखंच...

अनिलने हसत हसत शालिनीच्या मुठीला मूठ लावली...


सिंहगड ची पीएमटी आली... शालिनी आणि मीरा आत चढल्या... शालिनी खिडकीत बसताच खटकन तिने खिडकी मागे सरकवली आणि अन्याला पाहू लागली... नेहमीप्रमाणेच... 


अनिल खालीच उभा होता... विचारात पडला होता... आठवणीत रमला होता... पीएमटी चालू झाली... शालिनी अनिलला हात बाहेर काढून निरोप देऊ लागली... अनिलही खालून तिला बाय बाय करु लागला... अनिलला आता स्पष्ट दिसत होत्या त्या फक्त तिच्यासोबतच्या आजच्या आठवणी... आणि तिचा खिडकीतून अनिलसाठी बाहेर आलेला हात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance