Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Prashant Ruikar

Tragedy


2  

Prashant Ruikar

Tragedy


कथा दोन अवलियांची

कथा दोन अवलियांची

3 mins 8.9K 3 mins 8.9K

अखेर तो दिवस आलाच.नियतीला किती सांगितलं काहीही कर पण हा चिंतामय दिवस दाखवू नकोस. पण नियती पुढे कुणाचे चालणार? नियतीने घाव अखेर घातलाच त्यांच्या काळजावर

ना सुरीचा ना बाणाचा... हा घाव होता फक्त 'भावनांचा'...

खरंच किती विचित्र असतं काळीज... भावना बघत नाही, प्रेम बघत नाही, क्रूरता बघत नाही,

माया बघत नाही, आठवणी बघत नाही, पाप-पुण्य काहीच बघत नाही, काहीही आलं चांगल असो वाईट असो आपल्या विशालसागरात सामावूनच घेतंच घेतं. कसं जमतं ते त्यालाच ठावे...

ही कथा आहे, दोन शाही अवलिया मित्रांची...त्यांच्या निखळ, निस्वार्थी मैत्रीची... 'रव्या' आणि 'सुश्या' यांची... दोघेही अव्वल श्रेणीत डिग्री पास झाले होते. डिग्रीनंतर दोघांच्याही वाटा वेगळ्या होत्या.रव्या हा एम.एस्सी करणार होता आणि सुश्या आपला एम.बी.ए करणार होता...

दोघांची फार इच्छा की, आपलं ऍडमिशन पुण्यातच व्हावं, एकाच शहरात व्हावं आपण एकत्र राहावं. लागलीच दोघेही 'पुणे स्वप्नात' अगदी स्वछंद स्वछंद रमू लागले होते. भास करु लागले होते की, दोघे अजून परत सोबतच...

अविस्मरणीयच दिवस म्हणायचा 'तो'... आलाच मावळतीला घेऊन. तसा भास्कर पश्चिमी आपल्या लालसर रंगाचा नभसाज चढवत मावळत होता. नभही सुंदर दिसत होते. उद्या भेटण्याची आश्वासने देत तो भास्कर साऱ्यांना खुणवत बुडत चालला होता...

रव्याचा नंबर लागला तो नांदेडला विद्यापीठात. सुश्याचं आणखी कॅप राऊंड भरणंच चालू होतं.

दोघेही निवांत एकांतात गेले होते. डिग्रीतल्या दोन वर्षाच्या साऱ्या आठवणी दोघांच्या डोळ्यासमोरुन आज क्रमशः जात होत्या. आठवत होते कॉलेजचे 'यादगार' पल, कॉलेज 'कॅम्पस', कॉलेज 'गॅदरिंग' वगैरे वगैरे सारं काही... सारं काही आठवत होत दोघांना. भयाण 'शांतता', भयाण 'संध्याकाळ' 'ती', दोघांच्याही 'भावने'ला खायला उठलेली...

सुश्या शांत बसला होता. तसं रव्या म्हणाला,"अरे मला तुला काही भावनिक बोलायचंय" बोलू का? जाऊ दे बोलतोच" सुश्याने मान डोलावून होकार दिला.

बोलण्यास सुरुवात झाली. वक्तृत्वात - नेतृत्वात शाही, दमदार बोलत असणारा रव्या आज भावी 'करिअर गप्पा' या विषयावर 'साईलन्ट'च बोलत होता दोघांनीही एकटक पाहण्यासाठी एक खांब आणि एक झाड निवडला, कारण आज कुणीही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हतं.

रव्या म्हणाला," अरे सुश्या... तू माझ्यासाठी सदैव 'सुश्या'च राहा आणि मी ही तुझ्यासाठी 'रव्या'च राहीन. आता तुझा राग आवर रे बाबा आता तुला प्रत्येक गोष्ट समजून सांगायला तुझा रव्या तुझ्यासोबत नाही. आपलं प्रेम असंच राहील यात तीळमात्र शंका नाही, पण सांभाळ रे बाबा स्वतःला."

एरवी दोघे एकमेकांचे 'स्ट्रॉंग' पॉईंट होते पण आज नियतीपुढे दोघे एकमेकांचे 'वीक' पॉईंट म्हणून सादर होत होते वावरत होते. सुश्या 'आ' ना 'ऊ' काहीच बोलत नव्हता. त्याला आठवत होत फक्त इतकच की, "सुश्या आता तुझा रव्या तुझ्याजवळ नाही प्रत्येक गोष्ट समजून सांगायला राग आवर रे बाबा तुझा."

सुश्या बहुधा 'साईलन्ट'च झालेला होता. मन लावून, कान टवकारून रव्याचा शब्द अन् शब्द ऐकत होता. आपल्या शब्दकोशात ते शब्द साठवून घेत होता. आता सुश्या गंभीर खचला होता. ज्या रव्यानेच त्याला 'जगावं तर कशासाठी आणि कुणासाठी' हे शिकवलं तोच रव्या आज त्याला पुढे मी तुझ्यासोबत नाही असं म्हणतोय. प्रसन्न करणाऱ्या मंदिराला शोभेल असा कळसच त्याला नसावा तशीच काहीतरी अवस्था आज सुश्याची नक्कीच झाली होती. त्याचा कणाच आज मोडत चालला होता. त्याची जमीन आज कोरडी पडत चालली होती.

नेहमी इतरांना रडवणारा सुश्या आज स्वतःच बेभान रडत होता. डोळे पुसत होता. पण त्याच्या आठवणी काही पुसल्या जात नव्हत्या. खरंच असं असतं तर रडलं की साऱ्या आठवणी गायब.

एकदा रडल की परत आठवण येणार नाही असं असतं...

सुश्याच रडणं पाहून रव्याचेही अश्रू थांबत नव्हते. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारत होते. खांद्यावर डोके ठेवून रडत होते, डोळे पुसत होते. पण त्यांच्या आठवणी काही मिटता मिटत नव्हत्या. तो प्रेमस्पर्श ती ऊब त्यांना काही सोडता सोडत नव्हती...

शेवटी काय, प्रत्येकालच मैत्रीतून एकेकाळी वेगळं व्हावच लागत हेच खरं. जगात कुणी कितीही श्रीमंत असला तरी तो त्या वेळेला आणि त्या काळाला विकत घेऊ शकत नाही, ना थांबवू शकत नाही. कुठल्याही आठवणींच्या विस्तवावर अश्रूंचे कितीही भरेमाप शिंपडावे केले तरी ते विझतंच नाहीत. शेवटी धूर का होईना निघतोच. तसंच आठवणींच आहे... कितीही न आठवायचा प्रयत्न केला तरी त्या हमखास आठवतातच. नियती कुणाचाच हेवा देवा करत नाही आणि कुणालाच घाबरत नाही हेच खरं...


Rate this content
Log in

More marathi story from Prashant Ruikar

Similar marathi story from Tragedy