दिपमाला अहिरे

Inspirational

2  

दिपमाला अहिरे

Inspirational

शाळा

शाळा

3 mins
90


शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आणि शिक्षक म्हणजे माणुस घडवणारा व्यक्ती ... हेच शिक्षक आपल्याला अभ्यास तर शिकवतात सोबतच आपले भविष्य घडवत असतात.... अशाच शाळेतील आठवणी ज्या संपूर्ण आयुष्याची शिकवण आणि शिदोरी देऊन गेलेल्या कथेच्या रुपात मांडते आहे...


 वात्रट छाया..


  "अगं ऐ बाई जरा गप्प बस?? तुझ्यामुळे इतर मुलींना काही कळत नाहीये." पाटील सर जे मराठी ची कविता शिकवत होते..छायावर जोरात ओरडले.

छाया एक अशी विद्यार्थीनी होती.जी दोन वेळा नववीच्या वर्गात नापास होऊन पुन्हा तिसऱ्यांदा त्याच वर्गात बसली होती.. म्हणून जवळ जवळ सर्वच शिक्षक आता तिला चांगलेच ओळखु लागले होते.

 एक बेशिस्त, आभ्यासात 'ढ' आणि एक वात्रट मुलगी म्हणून आता तिला पुर्ण शाळा ओळखु लागली होती.. वर्गातील इतर मुलींपेक्षा दोन वर्षे मोठी होती.म्हणुन दादागिरी ही तिचीच चालायची.. कुठल्याही शिक्षकांचे कधीही एका शब्दात ऐकत नसायची.. शिकवत असतांना सतत मध्ये मध्ये तिची काहीतरी बडबड चालुच असायची..पाटील सरांची तब्येत जरा बरी नव्हती.म्हणुन ते आज तिला जरा जोरातच ओरडले.. एरव्ही पाटील सर म्हणजे एकदम शांत होते..छाया ने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नेहमी प्रमाणे..

सर खुर्चीवरून उठून उभे राहिले... आणि म्हणाले "जा तु वर्गाच्या बाहेर उभी रहा.इतर मुलींना तरी शिकु दे.. तुझ्या मुळे पुर्ण वर्गाला डिस्टर्ब होतंय.. वात्रट कुठली?" छाया ने फटक्यात उत्तर दिले "हो..सर वात्रट बोलायचं नाही हं मला.". सरांच्या चेहऱ्यावर दिसत होते की, त्यांना खुपच त्रास होतोय.. त्यांनी आपल्या हातातील पुस्तक बंद केले आणि सर्व वर्गाला उद्देशुन म्हणाले "मी या वर्गात परत कधीही येणार नाही.. जोपर्यंत ही विद्यार्थिनी या वर्गात आहे..मी या वर्गात शिकवणार नाही..या विषयी मी आजच मुख्याध्यापक सरांशी बोलतो.." एवढं बोलून सर निघून गेले..

दुसऱ्या दिवशी साडेअकरा वाजेला शाळा भरली.सर्व विद्यार्थी पटांगणात जमा झाले.. प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झाले,प्रतिज्ञा झाली.. आणि मुख्याध्यापक सर माईक जवळ येऊन उभे राहिले.


 "सांगतांना अतिशय वाईट वाटते आहे की, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रिय,शांत, मनमिळावू आणि संयमी, हुशार शिक्षक एम.जी.पाटिल सरांचे काल रात्री अकरा वाजेला हृदय विकाराच्या झटक्नियाने निधन झाले.. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.. यासाठी सारे दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली देतील..

ंश्रद्धांजली देऊन शाळेला सुट्टी देण्यात आली.. सर्व विद्यार्थ्यीनींच्या डोळ्यात पाणी आले..पण छायाला मात्र रडु कोसळले.ती धाय मोकलून रडु लागली..

काल सर जे बोलुन गेले ते अशाप्रकारे खरे होईल.असे कुणालाही वाटले नव्हते..पण पाटील सर छायाचेही आवडते शिक्षक होते.सर नेहमीच तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे.. छाया रडत होती.

तिच्या रडण्याचे कारण फक्त आंम्हांला म्हणजे नववी 'ब' च्या मुलींनाच माहिती होते..त्या दिवसानंतर छाया खुपच शांत झाली...शाळेत वेळेवर येत, अभ्यास वेळेवर करत असे,शिकवतांनाही पुर्णवेळ व्यवस्थितपणे लक्ष देत होती.. कुणाशी काहीही बोलत नसे.. तिच्यातील हा बदल पाहून शिक्षकांना मोठा प्रश्नच पडला होता.. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे छाया यावर्षी नववी पास झाली होती.. आणि तेही चांगल्या मार्कांनी.तिच्यावर असलेला "वात्रट छाया" हा शिक्का ही आता हळूहळू पुसत चालला होता.. पाटील सरांच्या बोलण्याचा आणि लगेच त्यांच्या अशा अचानक पणे जाण्याचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला होता... कदाचित सरांनी तिच्या त काही सुधारणा व्हावी म्हणून बोलले असावेत.पण त्यानंतर ते कधीही या वर्गात काय तर या शाळेतही दिसणार नाही.याचा आंम्ही कधीही विचार केला नव्हता..पण या प्रसंगावरून एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात राहीली.विद्यार्थी आणि शिक्षकांचे ही एक वेगळे नाते असते.ज्याचे आपल्या आयुष्यात एक वेगळे स्थान निर्माण होऊन जाते..ते नाते शिकवण्याचे, शिस्तीचे असले तरी हळूहळू जिव्हाळ्याचे होत जाते.. कदाचित त्याच नात्यामुळे एक बेशिस्त विद्यार्थीनी,"वात्रट मुलगी" मध्ये बदल होतांना आंम्ही पाहिला आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational