दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

शाल (लघुकथा)

शाल (लघुकथा)

1 min
137


डिसेंबर महिन्यात पुण्याची कडाक्याची थंडी

सकाळच्या साधारण सहा वाजेची वेळ असेल.

पहिली ट्रेन असल्यामुळे आनंद लवकरच आला होता

रेल्वेस्टेशनला मनातच थंडीच्या नावाने कुरकुर करत होता.

"स्वेटर, मफलर, कानटोपी सर्व असुनही थंडी किती लागतेय? बरं झालं आईने दिलेली ही शाल आहे.तिच्यामुळे बरीच ऊब मिळते.". आनंदला प्लॅटफॉर्म वर येऊन बराच वेळ झाला होता.. केव्हापासून तो पाहतोय एक कोपऱ्यावर एक बाई आपल्या लहानशा बाळाला घेऊन एवढ्या मरणाच्या थंडीत कुडकुडत बसली होती.थंडीपासुन बचावासाठी तर काही नव्हतेच.पण अंगावर पुरेसे कपडे देखील नव्हते.तिचे पाच सहा महिन्यांचे बाळ थंडीने लालबुंद झाले होते.आनंदला ते पहावत नव्हते.शेवटी न राहवून त्याने न राहवून आपल्या अंगावरची आईने दिलेली शाल त्या बाळाच्या अंगावर टाकली तसे त्या बाईने वर मान करून पाहिले. आणि दोन्ही हात जोडून ती बोलली..

   "सायब तुमच्या शालीमुळं माझ्या बाळाचा जीव वाचला."

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational