सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले


सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक कार्यप्रणालीचा पहिला मान त्याचांच होता. सावित्रीबाईचे समाजकार्यात फार मोठे योगदान होते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी अद्वितीय कामगिरी बजावली होती. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री पण होत्या. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई या मराठी शिक्षणप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पण होत्या आणि समाजसुधारक महिला होत्या.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये इस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाईनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. पण त्यासाठी सावित्रीबाईंला कितीतरी अडचणीतून धीरोदात्तपणे सामना करावा लागला.असंख्य यातनेतून त्यांना जावे लागले. या यशस्वीतेमागे त्यांनी कितीतरी आव्हाने पेलली,समर्थपणे सामना केला. पुढारलेल्या सनातनी लोंकांना आपल्या मुलींनी बाहेर जावून शिक्षण घेणे आवडलेले नव्हते. सोवळ,ओवळ आणि धर्मांधता असल्यामुळे समाजात आगपाख़ड झाली. जुण्या विचारांना ते मान्य नव्हते.
समाजात काही चांगली तर काही वाईट,कुत्सीत बुद्धीच्या लोकांशिवाय कुठेही समाज चालत नसतो. या सर्व बाबींवर आजही पुढारलेल्या २१व्या शतकातही होते आहे. त्यावेळी विरोध होणे म्हणजे आश्चर्य मुळीच नव्हते.काही प्रमाणात आजही चांगल्या कामाला विरोध होतो .हे मला आवर्जून सांगावेसे वाटते.अनेक संघर्ष करून सावित्रीबाईने धीर सोडला नाही. त्यामागे ज्योतिराव फुले यांचे मार्गदर्शन त्यांचा आधार सावित्रीबाईच्या पाठीशी होता. त्यांचे सढळ आधार इतका मजबूत होता की, ज्योतिबांचा स्वर्गवास झाल्यावरही सावित्रीबाई डगमगली नाही. सगुनाताई पण सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई ठाम उभी राहिली.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बालविवाह प्रथेमुळे अनेक मुलींचे लहान असतांनाच लग्न लावून द्यायचे. कमी जास्त वयात मुलींना वैधव्य यायचे. त्याकाळात समाजात पुनर्विवाहाची पद्धत नव्हती. पतीच्या निधनानंतर विधवांना सती जावे लागत असे किंवा त्यांचे केशवपन करण्यात येई. विरोधाचा प्रतिकार करणे संस्कारात बसत नव्हते.त्या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत असे. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत असे किंवा भ्रूणहत्या करत असे.
ज्योतीबारावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. बालवयाच्या विधवांचे पुनर्वसन गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत असे. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी हाती घेवून पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यात ही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता..
महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा खांद्यावर घेतली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. सावित्रीबाईंनी रचलेली ‘काव्यफुले’ ‘बावनकशी' आणि सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी स्वत: लिहिली. पुढील काळात त्यांनी भाषणेही केली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्या महिलांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाईंच्या अपार सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.कष्टाने गरीबीतून शिक्षण घेतलेल्या मुलींना किंवा स्त्रीयांना सावित्रीची लेक म्हणु लागले. त्यामुळे कित्येक साहित्य सावित्रीच्या लेकी’ किंवा ‘लेकी सावित्रीच्या’ अशी नावे देण्यात आली.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला " स्त्रियांनी शिकावे " हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. "अनाथांना आश्रय " मिळावा यासाठी ही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. सावित्रीबाईनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी कार्य केले. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना दुर्दैवाने सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन
अशी एकमेव महिला आपल्या भारतात नावलौकीक मिळवून अजरामर होवून गेली.तिच्या पुण्याईने आजच्या स्त्रिया चंद्रावरसुद्धा जावून पोहचल्या आहेत. आणि समाजात आपले अढळ स्थानासाठी झटत आहेत.