Click here for New Arrivals! Titles you should read this August.
Click here for New Arrivals! Titles you should read this August.

Varsha Shidore

Romance Others


3  

Varsha Shidore

Romance Others


साटंलोटं भावुक आयुष्याचं...

साटंलोटं भावुक आयुष्याचं...

1 min 441 1 min 441

आठवणींच्या कुपीला हळुवार हेरलं

स्वप्नांच्या रात्रींना अलगद प्रेमाने गोंजारलं

रोमांचकारी पात्रांतून मन वेडं मोत्यांत गुंफलं

मनमोहक नात्यांना काहीसं अलगद बिलगलं


शिंपल्यापरी अनेकविध शोधली मनं

ग्रहण जीवाला लागलं नकळत दुराव्याचं

डोळ्यातलं कोरडं पाणी सागरातुनी ओघळलं

मन वळवत पुन्हा पुन्हा नव्याने भरवलं 


शुभाशुभ घोराचं जाळं हिंमतीनं विणलं

उन्हं-पावसासारखं नाटकी बंधन अतूट जपलं

भेटींचं अनमोल भांडार हर्षाने साठवलं

आव्हानांचं डगमगतं धनुष्य सहज पेललं 


न्याहाळली हौशीनं हृदयातली स्पंदनं 

गुढ भुलवणारं साठवलं दाटीवाटीनं

अलिप्त मनाला सोईनुसार स्वतःच चोरलं

जगणं ठश्यात उमटवलं स्वभावाचं लेणं देणं 


प्रेमवेडं मन बहुढंगी घालमेलीच्या डोहात पानावलं

गणित मांडतं झालं सुंदर हर एक दिवसाचं

तप कडू गोड बोचऱ्या गजबजलेल्या गल्ल्यांचं

नव्यानं सजवेल रूप मोहक भावुक आयुष्याचं


Rate this content
Log in

More marathi story from Varsha Shidore

Similar marathi story from Romance