साथ कुणाची...
साथ कुणाची...
कुणाची साथ हवीशी असेलही कधी
पण केव्हा....हेही तितकंच महत्वाचं
गरज नेमकी कुणाची कुणाला
हे मुळीच नसतं ठरवायचं आधी
ते कुणा दुसऱ्याची साथ देता देता
आपोआप ज्याचं त्याला कळत जातं...
="background-color: rgba(255, 255, 255, 0);">विरलेल्या आठवणींना उजाळा देताना
नकळत भावनांना घातला जातो हात
साथीची गरज नक्की कधी गुपित असतं
उलगडताना आपुलकीचा बंध प्रेमाचा
साथ हसत बोट धरते अंतर्मनी सुखाची
मिळतो हात एका साथीदाराचा शेवटी...