सांग ना...का रे दुरावा
सांग ना...का रे दुरावा


मन न सांगता कळलंय
दुःख न हसता रडतंय
काळजीचा पान्हा फुटतोय
सांग ना...का रे दुरावा
शब्दात काव्य रुचतंय
आनंदात संगीत डोलतंय
प्रेमात सुख शोधतंय
सांग ना...का रे दुरावा
आठवणींचा नुसता काहूर
स्पर्शाचा सुखद आभास
ओठांवर फक्त एकच नाव
सांग ना...का रे दुरावा
बोलण्यात माझ्या तुझी वाणी
हास्यात माझ्या तुझी लया
प्रेमाचा रंग हा असा मुरला
सांग ना...का रे दुरावा
प्रेमछंद आता असा जडला
सहन होत नाही हा दुरावा
घालमेल जीवाची जखमांची
सांग ना...का रे दुरावा