साक्षर भारत,समर्थ भारत
साक्षर भारत,समर्थ भारत
भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यातील, शहरातील प्रत्येक माणूस हा साक्षर झाला पाहिजे. तरच देशात भेडसावणाऱ्या समस्या ह्या शिक्षणामुळे त्यांच्या पर्यंत पोहचतील. शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे असे आपण नेहमी म्हणतो. हा तिसरा डोळा म्हणजे शिक्षण खेड्यापाड्यातील दुर्मिळ, डोंगराळ भागात पोहचले पाहिजे. दुर्मिळ भागातील लोकांचा उदरनिर्वहासाठी वेळ जातो. त्यांना वारंवार भटकंंती करावी लागते. त्यामुळे साक्षरतेचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यात अडथळा येतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत. काहीना शिक्षणाची भूक आहे; पण आर्थिक अडचनींमुळे मेडिकल, इंजिनियरींग,तांत्रिक शिक्षण घेण्यात अडथळा येतो. भारताचे बुद्धिवान विद्यार्थी गरीब परिस्थितीमुळे मागे पडतात. भारताच्या विकासाला हा फार मोठा अडथळा आहे. म्हणून अशा आर्थिक स्थिति नसलेल्या भारत सरकारने दत्तक घ्यावे. उच्च, तांत्रिक, संशोधन ह्या कार्यात अशा विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश द्यावा. त्यांच्या बौद
्धिक पातळीला न्याय मिळावा. स्थलांतर होऊ नये ह्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे.
शासकीय यंत्रणा खेड्यापाडया पर्यंत जलद गतीने पोहचली पाहिजे. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहता कामा नये. शिक्षण गरीबांपर्यंत ,खेड्या पाड्यात जो पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत भारत विकसित झाला असे म्हणता येणार नाही. शिक्षणाच्या सुविधा थेट शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. ग्रामीण भागात वस्तीगृहांची संख्या वाढवली पाहिजे. खरे आर्थिक गरजू विद्यार्थी आहे की नाही याची खातरजमा शासकीय पातळीवरून झाली पाहिजे. राजकीय हस्तक्षेप अजिबात नको. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्ह्यवी. संगणकीय शिक्षण भारतात शंभर टक्के विद्यार्थ्यांना मिळाले की भारत शिक्षणाचे उद्दिष्ट गाठेल. तरच भारत साक्षर होईल, समर्थ होईल, बलवान होईल.