Dr Ashwini Alpesh Naik

Romance Fantasy

3.4  

Dr Ashwini Alpesh Naik

Romance Fantasy

रेमंड... द कंप्लीट मॅन...

रेमंड... द कंप्लीट मॅन...

6 mins
214


श्रावणी आणि श्रीधरचे लग्न आता दोन महिन्यांवर येऊन ठेपले होते. श्रावणी २७ वर्षांची तर श्रीधर ३० चा. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. मनमिळावू, मितभाषी, राजबिंडा श्रीधर तर थोडीशी लाजाळू,स्वच्छंदी, हसतमुख श्रावणी. दोघांच्याही आया बालपणीच्या मैत्रीणी. सारच काही तस जुळून ही आलं अन् योग्य ही वाटलं म्हणून या दोघांचं लग्न ठरलं. हे टीपिकल अरेंज मॅरेज नव्हते. पण श्रावणी आणि श्रीधर पूर्णपणे एकमेकांसाठी अनोळखी होते. पद्धतशीर पणे कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला. कुटुंबाची तर या लग्नाला आधीच समती होती. श्रीधरला देखील बघताच क्षणी श्रावणी आवडली होती. नकार देण्यासारखे काही कारण नव्हते म्हणून श्रावणी ने ही होकार दिला. चार दिवसांतच त्यांचा साखरपुडा देखील झाला. तीन महिन्यांनंतरचा म्हणजेच एप्रिल महिन्यात लग्नाचा मुहूर्त निघाला. सर्वच खुश होते. लग्नाची तयारी सुध्दा अगदी जोरात सुरू झाली.


श्रावणीवर खूप खूश होती. पण मध्येच कुठेतरी हरवलेली असायची. श्रीधर तिला मनापासून आवडला होता. पण तीच त्याच्यावर प्रेम जडले नव्हते. तिच्या आयुष्यात दुसर कोणी होत असंही नव्हते. श्रावणी लहानपणापासूनच परिकथेत रमणारी. डीडीएलजे, दिल तो पागल है, असे सिनेमे पाहत मोठी झाली. तिचा प्रिन्स चार्मिंग पांढऱ्या घोड्यावर बसून येईल आणि तिला घेऊन जाईल मग ते सुखाने नांदतील अशा भावविश्वात रमणारी. रेमंडची जाहिरातचे स्लोगन खुप आवडतं होते. "रेमंड द कंप्लीट मॅन" हे स्लोगन ऐकून ती मनोमन म्हणे माझा जोडीदार ही असच असेल.... द कंप्लीट मॅन ... पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने जेव्हा व्यावहारिक आयुष्यात पाऊल ठेवले तेव्हा पांढरा घोडा, हॅप्पी इंडिंग, प्रिन्स चार्मिग या सर्व विश्र्वातून ती बाहेर आली. प्रिन्स चर्मिंग नको पण तिला समजून घेणारा. तिच्यावर खुप प्रेम करणारा जोडीदार हवा होता. महत्वाचे म्हणजे त्या दोघांमध्ये खुप प्रेम, रोमान्स असावा असे तिला मनापासुन वाटे. पण खरंच तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार इतक्या वर्षात भेटला नाही. श्रीधरचे स्थळ आल्यावर तिने स्वतः ची समजूत काढली. कदाचित तिच्या स्वप्नांचा राजकुमार नसेलच कुठे किंवा कदाचित श्रीधरच तो असेल. आणि मुळात आई बाबांनाही तो फारच आवडला होता. नकार देण्यासारखे काही कारणच नसल्यामुळे तिने होकार दिला. 


छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुध्दा श्रावणी खुप खुश असायची. तिच्या फार गरजा किंवा अपेक्षा सुध्दा नव्हत्या. त्यामुळे तिला सांभाळून आणि समजून घेणारा जोडीदार तिला मिळावा अशी तिच्या आई बाबांची ईच्छा होता. त्यातच श्रीधर चे कुटुंब ही छान होते. मुलीच्या आई बाबांना अजून वेगळं काय हवं असतं. त्यांना श्रावणीसाठी सर्व बाजूंनी श्रीधर योग्य वाटला. तसेच श्रीधरच्या आई बाबांचे सुध्दा श्रावणी च्या बाबतीत झाले होते. आणि अशा प्रकारे या दोघांचे लग्न ठरले.


साखरपुड्यानंतर सर्वच लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. श्रावणी आणि श्रीधरचे फोनवर बोलणे होत असे, पण श्रावणी फार मोजकाच बोले. तिची फार इच्छा असूनही ती श्रीधर सोबत जास्त बोलणे टाळत असे. तिलाही बरेचदा वाटे त्याच्याशी बोलावे. त्याच्या आवडी निवडी समजून घ्याव्यात. प्रेम नाही निदान लग्न आधी त्यांच्यात मैत्री तरी असावी अशी तिची अपेक्षा होती. पण हे अरेंज मॅरेज आहे. उगीचच काहीही चुकीचे बोलले तर. श्रीधर ला मी आगाऊ वाटले तर . त्यात नवीन घरात जायचं, नवीन माणसांमध्ये राहायचं थोड प्रेशर आलं होत तिच्यावर... बरेचदा खरेदी निमित्त घरच्यांसोबत भेटणे सुध्दा होत होते. पण तेव्हाही ती श्रीधरशी जास्त बोलणे टाळत असे.


आता त्यांच्या लग्नाला दोनच महिन्याचा काळ उरला होता. तेरा फेब्रुवारीच्या रात्री श्रावणी आपल्या खोलीत अशीच बसली होती. तिच्या स्वप्न रंजनांचा विचार करत होती. किती वेडे होतो आपण .असे तिला वाटत होते. चौदा फेब्रुवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी वेलेंटाइन्स डे होता. खरं तर प्रेम साजरा करण्यासाठी दिवसाची गरज नसते. तरी सुद्धा श्रावणीला या दिवसाचे कुतूहल वाटे. ती श्रीधरच्या कॉल ची वाट बघत बसली होती. त्याने निदान फोन वर तिच्याशी बोलवे ही तिची अपेक्षा होती. पण श्रीधरचा काही फोन आला नाही.त्याच्या फोनची वाट बघत ती खुर्चीतच झोपून गेली. तिचा हिरमोड झाला होता. पण तिने स्वतःची समजूत काढली.सकाळी उठून नेहमी प्रमाणे ऑफिस ला गेली. दिवसभरात तिने खुप वेळा फोन तपासला होता पण आज श्रीधरचा कॉल ही आला नाही आणि मेसेज ही आला नाही.


संध्याकाळी सात वाजता ती ऑफिस खाली आली तर समोर श्रीधर उभा होता. हातात तिला आवडतात तश्या गुलाबी रंगाच्या गुलाबाची फुले घेऊन. श्रावणीला विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतः ची उत्सुकता आवरली आणि ती श्रीधर पाशी जाऊन त्याला म्हणाली,"अरे तू इथे कसा..? आज शॉपिंग साठी जायचे होते का..? तसे काही ठरले होते का..? "

श्रीधर तिला म्हणाला," Happy valentine's day"

श्रावणी काही क्षण भांबावली.. 

श्रीधर पुन्हा म्हणाला," श्रावणी happy valentine's day" आणि त्याने ती गुलाबाची फुले तिच्या कडे दिली.

श्रावणी देखील त्यावर म्हणाली," same to you"

श्रीधर म्हणाला," चल आता... तुझ्या आवडत्या हॉटेल मध्ये आपण डिनर साठी जाणार आहोत."

श्रावणी म्हणाली," माझं आवडत हॉटेल?.. आणि ते तुला कसं माहित..?"

श्रीधर म्हणाला," मॅडम मला सर्व माहित आहे. चला तुम्ही."

दोघेही जेवायला गेले. सर्व जेवण श्रावणीच्या आवडीचे होते. श्रावणी श्रीधर चे हे रूप प्रथमच पाहत होती. 


जेवण झाल्यावर समुद्र किनारी ते गेले. श्रावणीला समुद्र खुप आवडे. म्हणूनच श्रीधर तिला तिथे घेऊन आला होता. दोघेही तिथे बसले.. श्रीधर ने त्याच्या बॅग मधून एक पिशवी काढून श्रावणीच्या हातात दिली. आणि श्रावणीला ती उघडण्यास सांगितली.. त्यात मोगऱ्याची फुले होती. ते पाहून तर श्रावणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रावणी त्याला म्हणाली, " हे अस सर्व.. म्हणजे मोगरा मला आवडतो हे तुला कोणी सांगितलं..? अजून काय काय शॉक देणार आहेस तू मला..? "


श्रीधर म्हणाला,"मॅडम आगे आगे देखो होता है क्या.. ये तो बस शुरुवात है.."


श्रीधर चे हे बोलणे ऐकून तिला हसू आले,"अरे तुझे हे असे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं."


त्यावर श्रीधर पटकन म्हणाला," अग आपण असे भेटलोच कुठे.. आणि तू तर फोन वरही नीट बोलत नाहीस.. श्रावणी खरं तर मला आज तुझ्याशी मनमोकळेपणे बोलायचं आहे. व्हॅलेंटाईन डे तर बहाणा आहे.. पण मी पाहतो आहे तू वर वर खुश आहेस.. तू दुखी आहे असे नाही म्हणणार मी.. पण कुठे तरी हरवलेली असतेस.. नक्की काय झाले आहे..? मला पाहिल्यावर तुझ्या डोळ्यात येणारी चमक मी पाहिली आहे.. तुझ्या चेहेर्‍यावरून.. देहबोलीवरून तुला मला भेटल्यावर होणारा आनंद ही लक्षात येतो माझ्या.. मग कुठे चुकत आहे..? "


श्रावणी म्हणाली,"तू मला फार आवडतोस.. पण आपल्या नात्यात ओढ हवी आहे. मैत्री , प्रेम हवे आहे मला.. खर तर हे अरेंज मॅरेज.. मी हे अस बोलणं चुकीचं आहे ना.. मला माहित आहे माझ्या अपेक्षा चुकीच्या आहेत."


श्रीधर तिला मध्येच रोखत म्हणाला," अग वेडोबा तू चुकीची नाही आहेस.. अरेंज मॅरेज असले म्हणून काय झाले... कुठल्याही नात्यासाठी मैत्री ,ओढ, प्रेम, आदर असणं गरजेचं असतं. श्रावणी मी तुला वचन देतो आपल अरेंज मॅरेज असलं तरी आपल्या नात्यात प्रेमाची, रोमान्स ची कुठेच कमी नसेल. बघताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो हे जर मी तुला सांगितलं तर तुला अतिशयोक्ती वाटेल.. पण हे खरं आहे.. त्यामुळे मी तुझ्याशी बोलण्याचा विचार केला.. फक्त घरचे सांगताहेत म्हणून किंवा सर्व काही छान आहे म्हणून लग्न केलं अस नात नको आहे मला सुध्दा.. मला सर्वात आधी तुझा मित्र व्हायचं आहे. आणि हो आयुष्य भरासाठीचा मित्र.. तू माझा स्वीकार करशील ना..? मोकळ्या मनाने माझी श्रावणी होशील ना..?"


त्याच्या या बोलण्याने श्रावणी अगदी स्तब्ध झाली.. आपण स्वप्न तर पाहत नाही आहोत ना.. एखादा सिनेमा पाहत असल्यासारखे तिला वाटत होते..


ती श्रीधर ला म्हणाली," श्रीधर खरच हे स्वप्न तर नाही ना.. मी तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे.. आयुष्य भरासाठी मी तुझी होण्याची आतुरतेने वाट पाहते आहे.". 


श्रीधरच्या अशा व्यक्त होण्यामुळे श्रावणी पूर्णपणे खुलून गेली होती. आता ती आतुरतेने लग्नाची वाट पाहत होती. ती आता पुरपणे श्रीधर ची झाली होती.


त्यानंतर लग्नापर्यंतचा काळ तर दोघांनी छान एन्जॉय केलाच.. पण लग्नानंतर ही दोघे खुप सुखात नांदले. श्रीधर ने श्रावणी ला दिलेले वचन नेहमीच पाळले.. त्यांच्या नात्यात ओढ, प्रेम, आदर, रोमान्स, सारं काही होत. लग्नाच्या खुप वर्षांनंतरही होत. श्रीधरच्या एका पुढाकाराने, त्याच्या तिच्यासमोर व्यक्त होण्यामुळे श्रावणीच्या हृदयात त्याला एक अढळ स्थान मिळालं होत. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खुश राहणारी, थोडीशी स्वप्नाळू, फिल्मी श्रावणीच्या मनात शिरकाव करणारी किल्ली त्याला सापडली होती. श्रावणीला तिचा रेमंड मॅन सापडला होता..मोगऱ्याचा सुगंध त्यांच्या संसारात नेहमीच दरवळत राहिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance