रात्रीचा एक कप चहा
रात्रीचा एक कप चहा
घड्याळात रात्रीचा बारा वाजताचा ठोका पडला. माझी भयकथा लिहून जवळ पास संपतच आली होती. मी डोळ्यावरील चष्मा काढून बाजूला ठेवला. स्टोरी अशी होती की,
एका अपघातात एक कुटुंब मरण पावते. ते कुठेतरी फिरायला गेले होते आणि मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना उडवलं होत. त्यात एक पुरुष त्याची पत्नी, दोन लहान मुले होती. ते कुटुंब समोरच्या टपरी वर चहा घेण्यासाठी थांबल होत. पण चहा घेण्या आधीच तो अपघात झाला होता.-
पुढे काय लिहू ते समजत नव्हत. त्यात डोळ्यावर झोप सुद्धा येत होती, म्हणून एक कप चहाची आठवण झाली. रात्रीला तोच माझा सोबती असायचा. माझ्या खोलीतील टेबल लॅम्प बंद केला आणि किचन मधे आलो. घरात मी त्या दिवशी एकटाच होतो. आज तलब जरा जास्तच होति म्हणून चहा जरा जास्तच केला होता. थर्मास मधे भरून थोडा थोडा करत पिण्याचा विचार होता. कप हातात घेत, बाकी चहा थर्मास मधे घेवून माझ्या खोलीत आलो. माझ्या खोलीत अंधारच असायचा. लिहिताना फक्त टेबल लॅम्पचा उजेड असायचा. तो चालू करून लिहायला बसलो. एक कप चहा संपला होता. पुन्हा पिण्याची इच्छा झाली. टेबलवर न बघता थर्मास कडे हात वळविला. पण तो हाताला लागतच नव्हता. " अरे..थर्मास कुठे गेला आता." थोडा विचारात पडलो. उठून मेन लाईट चालू केली. मी घरात एकटा नव्हतो. चार पाहुणे माझ्या खोलीत होति. 'अनोळखी' समोरच्या खुर्चीवर बसली होती. एक पुरुष होता, एक बाई दोन लहान मुले. पण त्यांचे चेहरे रक्त बंबाळ होति. डोकं फुटलं होत, कपडेही फाटले होते, त्यांच्या हातात चहाची कप होति. आता मी लाईट चालू केल्या मुळे सगळे माझ्या कडे बघत होतें. मी तर सुन्नच झालो होतो. मनात विचार आला ही तर माझ्या भय कथेतील पात्रच वाटत आहेत. "हो आम्ही तुझे पात्रच आहोत. तुझ्या कथेतील. छान बनवतोस रे चहा. आता रोज यावे लागेल प्यायला." ती बाई घोगर्या आवाजात म्हणाली.
बापरे..! माझ्या मनातील गोष्ट सुद्धा ऐकू येतात यांना. मी तर पाणी पाणीच झालो होतो. "घाबरु नकोस...तू आमची चहाची तहान भागवलीस आम्ही तुला काही करणार नाही. आमचे चहा पिने झाल्यावर लाईट बंद करशील. आम्ही आमच्या कथेत परत जावू. " तो पुरुष म्हणाला. काही वेळातच मी लाईट बंद केला. पुन्हा चालू करून पाहिला तर तिथे ते चार जण नव्हते. फक्त खाली चार कप होति. ती कप त्यांनी कुठून आणलीत ते मला माहित नाही. पण आता दुसऱ्या दिवशी रात्री चहा करू की नाही हाच विचार पडलाय. आज ते चार जण आलेत उद्या आणखी कोणाला घेवून आले तर......"एक कप चहा किती महागात पडला मला"

