जेव्हा चकवा लागतो...
जेव्हा चकवा लागतो...
ही घटना मी एकवीस वर्षाचा असतांनाची आहे. तेव्हा मी आर्मी भरती साठी रोज सकाळी रनिंग प्रक्टिस जात होतो. माझा मित्र भूषण माझ्या सोबतीला असायचा बाकी बरेच जन असायचे. महिना नोव्हेंबर च्या थंडीचा होतो,मला सकाळी लवकर उठता यावे म्हणून मी माझ्या घरच्या गाय वाड्यात झोपायचो.
त्या दिवशी सुद्धा मी मोबाइल मध्ये पाच वाजताचा अलार्म लावून झोपलो होतो.गाय वाडा जरा लहानच होता.
त्याला आजूबाजूला कुडाचे आवार होते आणि समोर त्याला टपराची फाटकी होती. थंडी जास्त असल्यामुळे मी बाजेवर जाड पांघरून घेऊन झोपलो होतो.
तोच मला झोपेत माझ्या नावाने ओरडण्याचा आवाज येत होता.त्या आवाजाने मी जागा झालो भूषण माझा मित्र मला आवाज देत होता.मी पूर्ण जागा झाल्यावर मोबाईलात बघितले रात्रीचे दोन वाजणार होते, मी उठूनच त्याच्या कडे गेलो. आणि त्याला म्हणालो.
“काय रे काय झाले एवढ्या रात्री का आलास तू?
भूषण म्हणाला
“अरे आज लवकर जाऊ रनिंगला मला उद्या बाहेगावी जायचे आहे.”
मी त्याला म्हटले अरे तू पागल झालास का रात्रीचे फक्त दोन वाजले आहेत,
ह्या टाईमला कोण जाते रनिंगला.”
अरे खरच भावा मला....उद्या बाहेरगावी जायचे आहे,म्हणून म्हणतोय.”
मी त्याला म्हटले की मग राहू दे आजच्या दिवस उदयाला जाऊ .’
तर तो म्हणाला “ नाही यार भरती जवळ आहे.”
प्रॅक्टीस मिस्स व्हायला नको.
मी म्हटलं त्याला की एवढ्या रात्री कशाला...रोजच्या टाइम वरच गेलो असतो ना मग..इतक्या लवकर का?
तर तो म्हणाला अरे लेका सहा वाजताच जायचे आहेण,
मलाही त्याचे बोलणे पटले नव्हते पण माझा जवळचा मित्र असल्यामुळे मला त्याला नाही म्हणता आले नाही. पण थोडे विचित्र सुद्धा वाटत होते.
मी माझा रोजचं शूज घालून तयार झालो.
आम्ही रोज बयगाव च्या डांबरी रस्त्याने रनिंग करायचो,रोजच्या प्रमाणे आजही दोघे त्याच रस्त्याने जात होतो, दोन्ही बाजूने शेत असल्यामुळे फक्त अंधार दिसत होता आणि रस्त्याच्या बाजूला असणारी झाडे शांत होती.रातकीड्यांचा आवाज मात्र खूप होता थंडीही खूप होती पण जशी रंनिंग चालू केली आता शरीर गरम होत होते किमान एखादा किलोमीटर आम्ही रनिंग केली. माझ्या शरीरातून आता घामाच्या धारा वाहत होत्या, इतक्या थंडीतही.आम्ही तसेच आणखी धावत होतो,पण एक मात्र गोष्ट मला खटकत होती एवढा वेळ भूषण फक्त शांत होता तसा तो काही ना काही बोलत असे पण आज मात्र काहीच बोलत नव्हता.
त्यातच आणखी आज तो माझ्या मागे मागे धावत होता याआधी तो नेहमी माझ्या पुढे असायचा.
मी थांबलो आणि त्यालाही थांबवले, मी त्याच्याकडे बघताच एक धक्का मला बसला मी एवढा धावून माझे अंग घामाने चिंब भिजले होते, पण भूषणचे शरीर मात्र अजूनही तसेच वाटत होते. थंड.
मला काय होत आहे समजत नव्हते.मी काही न बोलता परत धावू लागलो पण आता भीतीसारखे वाटत होते,काही तरी विचित्र अंगाला स्पर्श केल्यावर जसा अंगावर काटा येतो तसेच मला वाटत होते,आम्ही बराच वेळ धावत होतो. आणि एका रोजच्या जागी थांबलो, जिथे एक काळ्या मारूतीचे मंदिर होते, तेच आमचे शेवटचे ठिकाण असायचे, तेथेच थोडा आराम करून आम्ही परत घरी जायचो. त्याच्या थोड्या दूरच एक मोठे पाण्याचे तळे होते, कधी कधी आम्ही त्यात पोहायचो सुद्धा पण इतक्या रात्री नाही.
मी मंदिराकडे जातच होतो तोच भूषण म्हणाला.
“अरे थांब ना.....मंदिरात नंतर जाऊ, चल ना आलोच तर तळ्यावरुण चक्कर मारून येऊ असाच.”
मला त्याचे बोलणे आज वेगळेच वाटत होते.आज असा हा वेड्या सारखा का बोलतोय याचेच नवल वाटत होते. आपसूकच भीती निर्माण होत होती.
मी त्याला म्हणालो, अरे मी थकलोय उदयाला जाऊ तिथे.”
तोच तो म्हणाला,
तुला चल म्हटलं ना....तो आवाज ऐकताच माझी फाटली एक विचित्रच आवाज होता. थोडासा भारी एका पुरुशासारखा
माझे हृदय आता जास्तच धडधडत होते.बाजूला असणारी झाडे व तो अंधार खूपच जीवघेणी वाटत होती.
“येईल त्या देवाचे नाव मी घोळत होतो. एक क्षण वाटलं येथून पळून जाव पण,हिम्मतच होत नव्हती.
त्याने डोळे मोठेकरून माझ्या कडे पाहिले,आणि तो पुढे चालू लागला.मी आपसूकच मन नसतानाही त्याच्या मागे चालत होतो. आम्ही आता तळ्याच्या काठावर होतो.
तळ्यातील ते पाणी पूर्ण काळसर दिसत होते जणू ते मला गिळण्यासाठीच वाट बघत असावे. त्यातील असणारे काटयांची झुडुपे एखाद्या राक्षसाप्रमाणे भासत होती.
भूषण एकसारखा त्या पाण्याकडे बघत होता.
तो माझ्या कडे वळला आणि म्हणाला
अरे तुला पोहायच नाही का?रोज पोहतोस ना तू ...कारण आज मी सुद्धा पाण्यात पोहणार आहे.
त्याचे ते बोलणे ऐकताच मी जागच्या जागीच थांबलो, जीव खूप धडधड उडत होता. कारण तो जे बोलला ते माझ्या मनाला पटतच नव्हते,
कारण भूषणला पोहता येत नव्हते, तो रोज जरि सोबत आला तरी तो पोहायचा नाही.
मी तेव्हाच समजलो की आपण खूप मोठ्या संकटात सापडलो आहे,कारण, माझे हात पाय थरथरत होते. आजूबाजूच्या किड्यांचा आवाज खूपच भेसूर वाटत होता.
मी त्याच्या हालचालीकडेच बघत होतो. त्याने त्याच्या पायातील बूट काढून ठेवला आणि एक तिरपी नजर त्याने माझ्या कडे टाकली तो अंगाला घाम फुटेल असा हसत होता. मी रडकुंडीला आलो होतो, तेथून काळ्या मारूतीचे मंदिर दिसत होते.मला तिथे पळून जावेसे वाटत होते. पण हिम्मत होत नव्हती.
“तो पुन्हा बोलला ......अरे चल”
“हो ..हो तू चल ना मी आलोच... मी घाबरतच अडखळत बोललो.
मी माझ्या पायातील बूट आणि अंगातील टी शर्ट काढण्यासाठी वाकलो. परत जेव्हा भूषण कडे बघितले तेव्हा. तेव्हा तो पाण्यात होता.
त्याचे अर्धे शरीर पाण्यात होते. आणि तो माझ्या कडेच बघत होता.
पण घाबरवणारी गोष्ट तर ही होती की तो जिथे पाण्यात होता तिथे खूप पाणी खोल होते.
आणि त्यात त्याचे ते पांढरे डोळे अंगावर काटा आणत होते.
तो काहीच हालचाल न करता तसाच होता, आणि हाताने हसतच मला येण्याचा इशारा करत होता.
ते दृश्य बघताच माझी खूपच धडधड वाढली, माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हते.
तरीही मी बजरंगाचे नाव घेऊन तिथून पळ काढला. कसेही करून मला त्या मारुतीच्या देवळात जायचे होते.
मी एवढ्या जोर्यात धावत होतो की समोर येणारी काटेरी झुडुपे सुद्धा माझ्या अंगाला बोचत होती.
त्या मारुतीच्या देवळाचे मंदिर काही पावलांच्या अंतरावर होते. तोच माझा पाय कुणीतरी पकडल्या सारखा झाला. आणि मी खाली आदळलो. मी एवढ्या जोरात खाली पडल्या मुळे बर्याच जागी अंगाला खरचटले होते. मी मागे वळून बघितले तर माझा पाय एका झुडुपात अडकला होता. तो सोडवत असतानाच माझे लक्षं तळ्याकडे गेले.
तोच छातीत धस्स झाले. तो तळ्यावरुण माझ्या कडे बघत होता. अंधार होता पण त्याची ती उभी असलेली आकृती मला दिसत होती.
मी परत मारुति रायाचे नाव घेवून उठलो आणि मंदिराकडे धावत सुटलो. मी थेट त्या मंदिरात देवा जवळ जाऊन बसून राहिलो पण धड धड अजूनही होती. पण आपण आता सुरक्षित आहो याची खात्री सुद्धा होत होती.
मी तेथेच बसून होतो सकाळची वाट पाहत. मी मोबाइल बघण्यासाठी हात खिशात वळवला.आणि मोबाइल हातात घेतला. पण पडल्यामुळे त्याचा डिसप्ले पूर्णपणे फुटलेला होता. पण मोबाइल चालू होता. पण काहीच कामाचा राहिला नव्हता. माझ्या मूर्ख पणामुळे मीच फसलो होतो.
तोच मला माझ्या नावाची हाक ऐकू आली.
तोच परत मी घामाने डबडबलो तो आवाज माझ्या मागूनच येत होता पण थोडा दुरून.
मी मागे पहिले आणि आत जवळ पास मी भीतीने रडतच होतो. तो मंदिराच्या काही दूर अंतरावर एका निंबाच्या झाडामागे उभा होता आणि वाकूनच मला आवाज देत होता.
आणि हसतच म्हणत होता.
“काय रे मला न सांगताच आलास, भीती वाटतेय माझी... “
आणि परत विचित्र हसायला लागला.
पण तो या मंदिरात येऊ शकणार नाही हे मला माहीत होते,
हनुमान चालीसाच्या काहीच ओळी मला पाठ होत्या त्याच मी डोळे बंद करून म्हणू लागलो.
बराच वेळ त्याचा आवाज मला आला नाही. मी डोळे घट्ट बंद करून घेतले.मला झोप लागली असावी
आणि कसल्याश्या आवाजाने मला जाग आली डोळे उघडले तेव्हा भूषण समोर होता.
तोच सरकण अंगावर काटा आला. मी धाडकण उठून बसलो, सकाळ झाली होती,
मी फटकण त्याच्या पासून दूर झालो, भूषण सोबत आणखी काही रोजचीच मुले होती.
अरे बाबा काय झालय तुला, आणि आज न सांगताच आलास रनिगला, मी तुला उठवायला गेलो तर तीथे नव्हतास तू. आणि हे अंगाला काय लागलाय कुठे पडलास का? भूषण म्हणाला.
तेव्हा मला कळले की तो खरच भूषण आहे, मी त्याला काहीच न बोलता, त्याला
म्हटले की भूषण प्लीज मला घरा पर्यंत सोड.
त्याच्या चेहर्यावर बरेच प्रश्न होते पण तोही काहीच न बोलता मला घरी सोडायला आला.
मी घरी येताच जे काही घडले ते सर्व माझ्या आजी आणि आईला सांगितले तीथे भूषणहि होता, तो सुद्धा घाबरला होता.
तेव्हा आजीने तुला चकवा लागला होता, म्हणून सांगितले, अर्ध्या रात्रीला जर कुणी आवाज देत असेल व काहीतरी विचित्रच बोलत असेल किंवा कुठेतरी चल म्हणत असेल तर समजावे की तो एक चकवा आहे,त्याला बळी पडू नये आपल्याच गोष्टी वर ठाम राहावे तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेन असे आजी सांगत होती. तिने तुळशी जवळ ठेवलेले पाणी माझ्या डोळ्याला लावले आणि ते प्यायला सांगितले. मला त्या प्रसंगातून सावरायला बराच वेळ लागला.मारुतिरायाच्या कृपेने मी त्या दिवशी वाचलो.
जवळपास मी एक महिना घराच्या बाहेर पडलो नाही, पण वेळेनुसार ही घटना मी विसरत गेलो पण काही कारणाने ती जर आठवली तरी अंगावर आजही काटा येतो.
(समाप्त)

