राखाडी रंग बरसे
राखाडी रंग बरसे


## राखाडी# रंगाची विशेषता आहे तो दोन्ही रंगांचा संगम आहे. काळा आणि पांढरा..
काळा रंग आपल्या मनातील वाईट विचार तर पांढरा रंग म्हणजे आपले सद्सद्विवेक बुद्धी...
सर्मपण म्हणजे काय ते राखाडी रंग शिकवतो..
मानवाचा शेवट सुद्धा हाच रंग..तेव्हा हा हेच शिकवतो मनाला वश करत बुद्धीचा योग्य उपयोग करत जीवन जगावे.
मी तूझ्यात इतके मिळून जावे की हे ईश्वरी राखाडी रंगासारखे मी संसारी नवदूर्गा बनून जिंकावे सर्वांना..
आधी चटके मग मिळते भाकर!!
हेच गणित शिकवतो मला राखाडी रंग.
काळया रंगाची जडली पांढऱ्या रंगावर प्रीती..
समरस झाले इतके ना राहिले कुठले अंतर..
अंतरंगीच्या त्यांच्या रंगांची एकरुप झाली प्रीती...
रंगांच्या या मिलनाने रंग निर्मिला राखाडी...!!##
राखाडी रंगात आदिमायेने आज सर्वांना कृपादृष्टी केली..
हे जगद्जननी वंदन तूज त्रीवार🙏🙏🙏🌹🌺