The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

DrGAURI PATIL

Others

3  

DrGAURI PATIL

Others

नंदनवन पर्यटन भाग१

नंदनवन पर्यटन भाग१

3 mins
332


बालपण देगा देवा,😍👼👼 मुंगी साखरेचा रवा....या उक्ती ची महती आपल्याला बालपण सरल्यावळच कळते...पालक झाल्यावर आपण पुन्हा एकदा बालपण जगतो.... "रोज रोज तो छोटा भीम कश्मिरला जातो आई...आपण जायच"

     मग काय...माझ्या सुपीक डोक्यात एक विचार आला आणि त्याचे रुपांतर स्त्री हट्टात झाले...पतीराजांजवळ ही नाही म्हणायला कारण नव्हते.. औचित्य होते लग्नाचा ५वा वाढदिवस😍😍

     अशाप्रकारे "स्वारींच्या" शिक्कामोर्तबा नंतर जेव्हा कुठे ✈️✈️✈️ बुकिंग झाले आणि माझा जीव भांड्यात पडला😁😁😀😀😀मग काही विचारुच नका..."आज मै उपर💃💃👫प्रमाणे आनंद झालेला.

      उजाडला एकदा चा तो दिवस ज्या दिवसाची मी चातकासारखी वाट पाहात होते😄😄आज कालची लहान मुले आपल्या पेक्षा दहा पाऊले पुढेच!!!आई तिथे थंडी असते,भीम ने सांगितले आहे😍😍निघे पर्यंत तयारी चालू च होती,सर्व प्रकारच्या सुचनांचे काटेकोर पालन करत प्रवास सुरु झाला😍😍

     ✈️✈️असताना,"भारताचे नंदनवन"हा शालेय पाठातील धडा...अगदी रसभरीत वर्णन करून शिकवणारे गुरुजी🙏🙏, धडा रात्री वाचल्यावर पडणारी स्वप्ने🤗🤗🤗😘सार काही आठवत होते.

       ✈️✈️दिसणारा नयनरम्य सूर्योदय ढगांच्या सोबत चालणारी त्याची लपाछपी बघतांना होणाऱ्या आनंदाची लज्जत न्यारीच !!!पवित्र अशा उत्तुंग हिमालयाच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटले!!!माँ वैष्णव देवी च्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी,👣👣👣👣 श्रीमद् आद्दय श्री शंकराचार्यांची तपोभूमी🙏🙏🙏🙏🙏🙏यांच्या दर्शनाने लाभलेले आत्मिक समाधान याचा ठेवा चिरंतर मनपटलावर अधिराज्य करेल!!

       १०दिवसांच्या या सहली मधे जममू काश्मीर मधील जनजीवन तर जवळून बघता आलेच,आम्ही गेलो होतो तेव्हा २०१४ च्या निवडणूका पूर्व काळ होता त्यामुळे सर्वत्र अगदी सार्वजनिक ठिकाणी कुणीही याव आणि निवडणूक विषयावर मत व्यक्त कराव अस वातावरण असायच🙌🙌🤦🤦☕☕☕☕

        प्रथम आम्ही श्री वैष्णव देवीच्या दर्शनासाठी 'भवन'मधे प्रवेश केला, तिकिट आधीच काढली असल्याने र्गदी चा त्रास जाणवला नाही. नुकत्याच झालेल्या चैत्र नवरात्रीं मुळे धार्मिकतेला जणू उधान आले होते.😍

       रात्री उशिरा आम्ही चढाई सुरु केली, श्राईन बोर्डा ची चोख व्यवस्था असते. भारतीय सैनिक सतत तैनातीत दिसत होते त्यातील कुणी महाराष्ट्रीयन सैनिक असले की आपसूकच संवाद साधला जायचा.

        अबब!!!१४कि.मी.चढाई😳😳😳 त्रिकूट पर्वत इतका उंच आहे की नुसत जमिनीवरून पाहिल तरी  भिती वाटते, कसे आपण चालून जाऊ आपसूकच मुखातून "जय माता दी🙏🙏🙏🙏🙏🙏चा गजर चालू होतो. ईश्वरीय शक्ती चा साक्षात्कार आपल्याला नुसत्या त्रिकूट पर्वताच्या दर्शनाने होतो🙏🙏👣👣

        निमुळता रस्ता, ठिकठिकाणी असलेली प्रसादाची दुकाने, दुतर्फा सजलेली सर्व धार्मिक सामानाची विक्री करून उदरनिर्वाह करणारी लोक👥👥🏟️, तर एकीकडे जीव धोक्यात घालून, प्रवाशांची यात्रा सुखद घडविण्यासाठी धडपडणारे घोडेस्वार🐴🐴 या सर्वच जनतेचे कौतुक वाटते,आणि त्यांच्या कौशल्याची जाणिव होते... यात्रा सुखरूप झाली की नकळत ...."देणाऱ्याने देतच जावे... ह्यानुसार आपल्या हातून ही दान पुण्य घडतेच!!१४वर्षांचा पिटटू (लहान मुलांना पाठीवर घेऊन जाणारा मुलगा),त्याचे कष्ट बघवत नाहीत😥😥एकीकडे ए.सी. मधे शाळेत जाणारी मुले👩‍💻👩‍💻👷👩‍🚒👩‍🍳👩‍⚖️👩‍🔬👸🤴🤵👰👮👩‍🍳👩‍🍳, तरुण पिढी आणि इथले त्यांच्याच वयाची मुले बघून समाजातील विषमता मन विषन्न करते😥

      ब्राह्म मुहूर्तावर श्री जगदजननी, आदिमाया श्री वैष्णव देवी🙏🙏🏼🙏👣👣👣👣👣श्री महाकाली, महा सरस्वती, महालक्ष्मी माता यांच्या दर्शनाने आत्मिक चैतन्य लाभते... सगळा थकवा निघून जातो. जय माता दी🙏🙏👣👣👣 म्हणत आपले पाय तेवढ्याच उत्साहाने भैरव टेकडी कडे निघतात. प्रातः आरती इतकी  कर्णमधुर असते की ती आदिमाता करूण अंत्तकरणाने आपल्या भक्तांवर कृपादृष्टी करत आहे असा विश्वास वाटतो. संस्कृत भाषेतील मंत्रोच्चारांनी आसमंतात विशिष्ठ नाद लहरींमुळे प्रसन्नता असते....मंत्रोच्चारांचा जयघोष इतका प्रचंड की साक्षात शत्रूवर देवी वार करेल की काय👣👣🙏🙏🙏🙏..भैरवनाथ टेकडीवर किती ही विसावा घेतला तरी मन भरत नाही. ठिकठिकाणी दिसणारी छोटी माकडे🐒🐒🐵🐵🐵🐒🐒🐒🐒पक्षांच्या🐤🐤🐦🐦किलबिलाटाने भैरवनाथ टेकडीवर मनसोक्त पर्यटनाचा आनंद उपभोगता येतो.परतीच्या प्रवास सुखद होतो.🙏🙏🌹🌹##########

         "जय माता दी🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

                ....क्रमशः


Rate this content
Log in