Dr.GAURI NIRKHEE

Others

3  

Dr.GAURI NIRKHEE

Others

मोरपंखी रंग बरसे

मोरपंखी रंग बरसे

2 mins
537


रंग 'मोरपंखी'. आज नवमी तिथीला शिव शक्ती एकत्र येतात आज चे रुप असते 'अर्धनटनारीश्वर'..दोन्ही शक्तींच्या एकत्रीकरणाने श्री.दुर्गादेवीने विजयश्री मिळवला.या दोन शक्ती केवळ एकच आहेत हेच आजचे महत्व.

 " प्रथमं शैलपुत्रीति,द्वितीयं ब्रह्मचारिणी,तृतीयं चंद्रघंटेती,कूष्मांडेती चतुर्थकम्।

पंचमं स्कंदमातेती,षष्ठं कात्यायनी तीच्,सप्तं कालरात्रीश्व महागौरी च तथाअष्टमम्,नवमं सिद्धीदात्री च नवदुर्गा प्रकर्कितीता.."

श्री.चंडी पाठातील हा नवदुर्गां श्लोक म्हणजे देवीची कोणकोणत्या रुपांची नवरात्रींच्या दिवसात आपण आराधना करतो या आशयाचा आहे. या नवदुर्गांचे विशेष पूजन नवरात्रींमधे करतो तर काही ठिकाणी नवरात्र असते त्यात आपण ब्रह्मोत्सवात श्री.भगवान विष्णुंच्या दशावतारांची आराधना करतो.

आजचा रंग 'मोरपंखी' म्हणजे 'निळा' रंग श्रीकृष्णाच्या प्रीतीचा तर 'हिरवा' रंग त्या परम तेजस्वी आदिमाया श्री.हरीप्रिया महालक्ष्मी देवीच्या राधा रुपाचा.श्रीकृष्ण आणि राधा या दोघांची प्रीती त्यांना एकरुप करुन टाकते त्यामुळे आपण राधाकृष्ण असेच म्हणतो.श्रीकृष्ण अवतारात भगवान विष्णुंनी मानवास जीवनाच्या चार गती,र्धम,अर्थ,काम,मोक्ष,मैत्री,प्रेम,युद्धकौशल्य,चार्तुय,मोह,त्याग,सुख दुःख असे सर्वच सार श्रीमद् भगवत गीतेत वर्णिले आहेच.असा हा सार्वभौम श्रीकृष्ण सखा त्याचे ते मनोहारी ,गोंडस बालरुप,यौवन,प्रौढ रुप कुठल्याही रुपात तो श्रीहरि सर्वांपेक्षा प्रिय आणि मोहवणारा आहे तर तो त्या त्याच्या मस्तकी थाटात शोभून दिसणाऱ्या मयूरपंखामुळेच.

 अशी आख्यायिका आहे की 'वृंदावनात' रासलीला करताना एक मयूरपंख जमिनीवर पडले,राधादेवीने ते उचलून श्रीहरिच्या मस्तकी रोवले आणि तेव्हापासून तो नटखट प्रेमळ कान्हा त्याच्या सखीसाठी तिची आठवण म्हणून मयूरपंख मस्तकी धारण करतो. प्रेम म्हणजे नुसते सोबत अथवा साथ नाही तर प्रेम म्हणजे सदैव आठवण,प्रेम म्हणजे त्याग..श्रीकृष्णाच्या जीवनात र्कतव्यमुल्ये जपलेली आहेत त्याचेच हे उदाहरण आहे जे स्वतः पेक्षा शाश्वत,जे सर्वांत प्रिय ते राधे चे प्रेम श्रीकृष्णाने मयूरपंख सदैव धारण करुन अजरामर केले असा तो गिरिधारी श्रीकृष्ण मुरारी.

 श्रीकृष्ण चरित्रात आयुष्याचे सर्वच रंग आहेत तसेच या मयूरपंखात देखील आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे. मयूरपंखाचा हा मोरपंखी रंग म्हणजे प्रेमाचे प्रतिकच जणू. मोरपंखी रंगात एक वेगळीच छटा आपण पहातो कारण निळा आणि हिरवा, हरिआणि राधा यांचा अवघा रंगची एक झाला.

  बालपणी मयूरपंख पुस्तकात ठेवले की बुद्धी वाढते असा समज आजतागायत आहे.मयूरपंख म्हणजे तो सखा श्री.हरि जसा सदैव सुदामयाच्या पाठी खंबीरपणे उभा तसाच तो आम्हाला सदैव भासतो.

"मैत्रीचा देव आहे आमचा तो मयूरपंख मस्तकी भूषविणारा श्रीहरि..

रक्मिणी रमण ,राधारमण श्री.वसूदेव देवकी नंदन ,नंदलाल यशोदापुत्र श्रीकृष्ण, त्यास प्रिय ते मयूरपंख तो आमचा सखा..श्रीहरि...

 हे श्रीकृष्णा धाव पाव रे आता आलीये संभवामी युगेयुगे ची घडी...

कोरोनाच्या समूळ नाशासाठी उचल ते सुर्दशनचक्र संर्कषण श्रीहरि..

विनवी तूजला तूझीच ही लेकरे सारी..

हे लक्ष्मी रमणा,कमलाकारा,ऐकावीस ही विनवणी झडतरी..

हे जगद्पालका,जगद्उद्धारा वंदन तूज त्रिवार..

त्राही माम म्हणतो आहे मानव तूच त्यासी उद्धार"

 याच आशयाची मी काढलेली आजची रांगोळी...

##drgaurinirkhee14102023##©®


Rate this content
Log in