DrGAURI PATIL

Others

2  

DrGAURI PATIL

Others

अनमोल ठेवा

अनमोल ठेवा

3 mins
702



    रमा च्या पायाला लागले होते पाऊल टाकणे ही अवघड झालेले.डॉ. नी मलमपट्टी केली.... बाबा च्या मागे बैलगाडीतून रमा जात होती... सोबतीला रात्रीसाठी तोडलेल्या भाज्या ,दूधाच्या केटल्या....मक्याची कणसं ...थोड फार सामान कसबस तिच्या 'बा'' न चढवल.


    'सोनंगाव' १००० लोकवस्ती असेल साधारण.'कावेरी' नदीच्या पात्रा शेजारी दिमाखदार डौलाने सजलेले हे छोटेसे खेडं गाव.आत्याधुनिक सुखसोयी पूर्णपणे जरी नसल्या तरी लोक मात्र आनंदाने रहायचे..सुपिक जमीन..रमणीय निर्सग गावाचे सौंदर्य आणखीनच वाढवत होता.

   माधव शेतकरी रखुमाई त्याची बायको आणि रमा त्यांची कन्या अस हे छोटस कुटुंब स्वकष्टाने, आणि स्वकर्तुत्वाने गावात सलोख्याने रहात होते.रमा हि एक चंचल,हुशार, प्रेमळ, हट्टी, मुलगी....अगदी बालपणापासूनच तिच्या बुद्धी ची चमक तिच्या काळयाशार.. डोळ्यात चटकन दिसायची. हजरजवाबी रमा आपल्या गोड बोलण्याने सर्वांना आवडत असे. गावातील शाळेत ८वी पर्यंत शिकलेली रमा १० वी पूर्ण करण्यासाठी नदीपार जायची. रमासोबत तिच्या काही मैत्रिणी देखील असायच्या. नदीपार शिकण्यासाठी मुली आणि मुल रोज जीव मुठीत धरुन आणि तो धोकादायक प्रवास करत. शिक्षणाचा वसा पूर्णत्वाला नेत होते.

    शाळेत शिकत असताना देखील रमा तिच्या आईची घरकामात आणि बाबा ची शेतात मदत करत असे. घरा शेजारी राहणाऱ्या पूनम सोबत रमाची घट्ट मैत्री होती.तिच्या मनातल सार काही ती पूनम जवळ बोलत असे.

   झुंजुमुंजु झाल कि अख्या गावातील जीवन सुरु होत असे."रामप्रहरी च गावातून वासूदेव आला हो वासूदेव आला"!!!!या वासूदेवाच्या सोबत एकीकडे तो कोबंडा आरवला की सर्व 'सूर्यवंशी'लोक खडबडून जागे व्हायचे. पक्षांचा किलबिलाट वातावरणात चैतन्य आणायचा तर एकीकडे हंबरणाऱ्या गाई म्हशी त्यांची वासरे...चारा उपलब्ध करणारी त्यांचे मालक...दूध काढण्याच्या लगबगीत असलेली माणसे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील काकडा, भूपाळी म्हणत सडा आणि रांगोळी काढणाऱ्या गृहिणी अशी हि गावातील रम्य पहाट असायची.

    साधारण ७.३०मि. वे. सकाळी.. तोपर्यंत सर्व विद्यार्थी फाट्यावर जमायचे,आणि मग जीव मुठीत धरून तो जीवघेणा प्रवास करत शाळेत पोहचायचे. कधी हवामान खराब असले कि तो नावाडी काका अत्यंत जड अंतःकरणाने या सर्वांना नदीपार सोडायचा.शाळा सुटली कि दुपारी ५वाजता पुन्हा गावात मुलांना सोडून येणे हा रोजचा उपक्रम होता.

    आज रमाच्या शाळेत पी.एच.सी.PHC (PRIMARY HEALTH CENTER) डॉक्टरांची टिम प्राथमिक आरोग्य तपासणी साठी येणार होती.सकाळी लवकरच शाळेत जावे लागणार होते म्हणून रमा आणि तिच्या मैत्रिणी नदी किनाऱ्यावर जमल्या होत्या. आज किनाऱ्या पलीकडे गेल्या वर त्यांना कळाले कि आज मोठे वैद्यकीय अधिकारीदेखील तपासणी साठी येणार आहेत. नेहमीपेक्षा र्वदळ जास्त होती.गावातील रूग्ण, वृद्ध, विद्यार्थी, स्त्रिया, पुरूष सर्वांचीच प्राथमिक आरोग्य तपासणी होती.

    दिवसभर तपासणी झाल्यावर पाहुणे मंडळी आणि अधिकारी लोकांचा सक्तार समारंभ उत्साहात संपन्न झाला. रमा ने देखील नेहमीप्रमाणे सुंदर सूत्रसंचालन करुन शाबासकी मिळवली. नावेतून परतताना आज जास्त र्गदी होती,मैत्रिणी तिचे कौतुक करत होत्या तरी रमाचं काहीतरी बिनसल होत."खोटे कधी बोलू नाही असच शिकवित्यात ना ग पूनवे..मंग कशाला गे त्या दावखान्या ची खरी भानगड लपवायची!! म्या म्हणतो त्या मोठ्या डाकटर ला सांगून पहाव का ग??? एय झाशीची रमाबाई..... चले चल....लयी झाल कौतिक हो माय तुमचे हिथ गावात लोकायले साध र्सदी पडस् झाल तर पार तालुक्यातील दावखान्या परस इलाज नाय"....इति पूनम😀अग म्या काय दुसर बोंबलले ग???तुला बी जे आज झाल ते पटनय न......मंग तू गब(गप्प) काऊन बसते ग एय पूनवे सांग कि "

    दुसऱ्या दिवशी शाळेत कालचे अधिकारी साहेब आले अन्....एय झाशीची रमा, .....चले आता हेडमास्तर नी बोलिवलय तूला...मला???????अन् म्या काय केल रं????रमा जरा चिडून च पिंट्यावर वरडली ते तूझ्या पूनवी लाच इचार् पिंट्या नाराजीतच परतल माघारी ग रमे काऊन काल तूला नावेतच बरळायच व्हत गं, आता काय माहित कूनच्या पोटातल पाप हाय हे??

    रमा आतून घाबरली होती जरा पण तिन् तस दाखवल नाही पाटील मास्तरांनी तिची त्या अधिकाऱ्यांसोबत छान ओळख करून दिली. (आर देवा काऊन छळीतोस रे???उगाच रमा मनातच बोलली)"नमस्कार सर, एवढच काय रमा बोलली आणि डॉ. कुलकर्णी "यांनी रमाला सांगितले... बेटा खोट कधी बोलू नाही ना???? हाव सर बराबर बोलायले तुम्ही अग मग तेच खर काय ते सांग मला...घाबरू नको.तू खर बोललीस तर तुमच्या गावात सर्वांत चांगला डॉक्टर तर रुजू होईल आणि आवश्यक त्या सर्व सुविधा दावखान्यात येतील.काय म्हणूरायले सर खर कि काय हो बेटा.(आर देवा,असा डाव हाई तुझा )मग काय झाशीच्या रमाबाईंनी एका दमात सर्व हकीकत डॉ. ना सांगितली. डॉ. तिला शाबासकी तर दिलीच शिवाय त्यांच्या आवडीचा भारी पेन देखील रमाला बक्षिस म्हणून दिला."रमा जशी तुझ्या वाणीत सत्यता आहे तिच सत्यता तू तुझ्या लेखणीतून उतरवत जा बेटा...शाबास"आणि डॉ. शहरासाठी रवाना झाले.

   राणी रमाबाईंचे आज सर्वत्र कौतुक झाले म्हणून आज रमा खूपच आनंदी होती आणि त्या आनंदातच नाचताना मैत्रिणींसोबत फेर धरताना रमा पडली आणि पायाला इजा झाली.

                  


Rate this content
Log in