Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

2  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

पिवळा रंग बरसे

पिवळा रंग बरसे

2 mins
95


'श्री लक्ष्मी रमणा गोविंदा 'रंग पिवळा' 

   "सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके..

    शरण्ये त्रयंबके गौरी नारायणी नमोस्तुते.."

  आज ब्रह्मोत्सवात श्री.सूर्यनारायणाच्या रुपात श्री.निवास बालाजी देवाची पूजा असते तर आज षष्ठमी तिथीचे आगळेच महत्त्व आहे.कात्यायनी रुपातील ही देवी महिषासुरमर्दिनी आहे ,यशदायी अशी ही भगवती देवी कात्यायन ऋषींची सुकन्या आहे.🙏

 'भरजरी ग पितांबर शोभे नारायण '..पीत वर्ण पिवळ्या रंगाचे पितांबर नेसलेले श्री.सत्यनारायण भगवान.🙏🙏पितवस्त्रातली ती जगन्माता देवी पद्मावती देवी.🙏🙏🌹🌹गोड गोजिरी ती पिवळ्या पितांबरातील श्री.गणेशाची मुर्ती, तर नटखट नंदराज यशोदा लाल तो गोजिरा गोंडस बाळकृष्ण, पत्याचा तो सोनेरी मुकुट आणि त्यावर ऐटीत मिरवणारे मयूरपंख.🙏😍

 मांगल्याचे प्रतिक,सुवर्ण धातू मध्ये साक्षात श्री.लक्ष्मी चा निवास असतो ,सुवर्णाचे अलंकार देवीस अतिशय प्रिय आहेत.चकाकी सोनेरी रंग म्हणजे उत्साहाचे,मैत्रीचे प्रतिक.पिवळ्या रंगास शुभदायी म्हणतात ,पिवळी शेवंती लक्ष्मी मातेचे आवडते फुल.पिवळ्या रंगाची हळद ,आंबेहळद यांचे आपल्या भारतीय संस्कृतीत ,आर्युवेदात औषधीय महत्व आहेच.हळद यशाचे ,सुखाचे,वृद्धीचे,भरभराटीचे प्रतिक म्हणूनच नव दांपत्याला विवाहासमयी हळद लावण्याची प्रथा आहे.

  पंचमहाभूतांपैकी एक 'अग्नि'.पवित्र असा अग्नि चे पुराणकाळापासूनच महत्व..यशप्राप्ती साठी,होम,यज्ञात विशिष्ठ वनस्पतीं द्वारे आहुती दिली जाते,या सर्व गोष्टींचे आर्युवेदीय महत्त्व देखील आहे.सीतामातेचे जेव्हा रावणाने हरण केले होते त्यावेळी अग्नि देवतेची कन्या सीतामातेच्या रुपात लंकेस गेली होती तर मूळ सीता देवीस अग्नि देवतेने सांभाळले होते.सत्वशीलतेचे अग्निदिव्यपार करणे त्या आदिमायेला देखील चूकले नाही. पवित्र अशा विवाह बंधनात सात जन्मीचे,जन्मजन्मांतरीचे दोन जीवांचे नाते अग्नि देवतेच्या साक्षीने पूर्णत्वास जाते.स्वप्नांचे घरकुल जेव्हा आपण बांधतो त्यावेळी अग्नि देवतेचे पूजन वास्तुशांती पूजेत केले जाते जेणेकरुन या आपल्या घरात श्री.लक्ष्मी नारायणाच्या कृपेने ,श्री.अन्नपुर्णा मातेचा चिरंतर निवास रहावा म्हणूनच.

 पिवळा रंग मैत्रीचे प्रतिक म्हणून आजकाल आपण स्वीकारले आहेच की.असा हा पवित्र पिवळा रंग जेव्हा देव्हाऱ्यात दिवा म्हणून वातीसोबत आपण लावतो ते मनातील अंधःकार नाहिसा होण्यासाठीच, वातीसारखे स्वतः परोपकारी वृत्तीने जळत रहात आपल्या प्रियजनांसाठी आयुष्य वेचण्यासाठीच.आयुष्याचा शेवट देखील अग्निदाहनाने या पंचतत्वात विलीन होतो,जाणाऱ्या व्यक्तीच्या विचारांना,आर्दशांना, जागृत ठेवण्यासाठी आपण दिवाच लावतो.अतिसूक्ष्म सूर्यदेवतेचे जीवनदायी सोनेरी ऊन,प्रकाश ते अग्नि चे महारौद्र रुप दोन्ही जशी टोकाची रुपे तसेच एकीकडे विवाहसमयी अग्निदेवतेच्या साक्षीने आणलेल्या नववधूची,हुंडाबळी म्हणून तर कधी कुमारिकेची निघ्रूर हत्या होताना दिसली की समाजाच्या या कटू वास्तवाने मन खिन्न होते.😔😔असो.

 । तमसो माज्योर्तिगमयः।दीपकज्योती नमोस्तुते।🙏🙏

 श्री.वैष्णवी देवी माता..जय माता दी🙏🙏🙏🙏🌹🌹🌹


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational