kanchan chabukswar

Inspirational

4.6  

kanchan chabukswar

Inspirational

प्यारी बेटी निलोफर

प्यारी बेटी निलोफर

7 mins
313


प्यारी बेटी निलोफर,

तुम्हारा खत मिला, तुला तुझ्या सासरी खूप त्रास होतो आहे हे समजले. त्रास हा करून घेण्यावर असतो. बेटा तुला सासरी त्रास होतो असं तुला वाटतं, तुला आठवतं, तू जेव्हा पहिल्यांदा शाळेत जात होती, रडायची, कारण तुला शाळेची मजा माहितीच नव्हती,. सुरुवातीला कॉलेजमध्ये जाताना देखील तू घाबरायची, कारण काय की तुला माहिती नव्हत. बेटी, शाळा आणि कॉलेज, युनिव्हर्सिटी, सगळीकडे तू डिस्टिंक्शन मिळवून पास झालीस. असं समज की सासर ही पण एक युनिव्हर्सिटी आहे. आणि तुला इथे डिस्टिंक्शन मध्ये पास व्हायचं आहे. सासरचे पण पण तसंच आहे. तुला जेव्हा तुझ्या तुझ्या सासरच्या लोकांची माहिती होईल, त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल, तेव्हा तुला सासरी आनंदच मिळेल.

बेटा एक लक्षात ठेव, सासरची नाती चिटकलेली नाती असतात, मुलींनी घट्ट धरून ठेवायचे असतात, थोड्या चुकीने, किंवा चुकीच्या शब्दाने, नाती विस्कटत-विस्कटत जातात.. तुझा नवरा हैदर मिलिटरी ऑफिसर आहे, देशाच्या रक्षणाची त्याच्यावर जबाबदारी आहे, कौटुंबिक कलह पासून त्याला दूरच ठेवलेले बरे..तुझी सासू अशी का वागते हे समजून घे. तुझी नणंद निशा तुझ्या एवढ्याच वयाची आहे, तिथे सगळं घर सांभाळत आहे असं तू म्हणतेस, तिच्याशी दोस्ती कर. तुझा धाकटा दीर नदीम, त्याची काळजी घे. पत्र लिहित जा.

खूप खूप दुआओं के साथ

बाबा.

……………………………………………………………..                                                

प्यारे बाबा,

पता नही मला असं वाटतं की हैदर मला त्याच्याबरोबर विशाखापटनम ला नेणार नाही. सध्या त्याची बदली विशाखापटनम ला झाली आहे. लग्न ठरवताना ासू-सासर्‍यांनी सांगितलं होतं ना, की मला ताबडतोब हैदर बरोबर जायला मिळेल म्हणून, पण आता त्यांनी शब्द फिरवला.

आमच्या घरी साधा फोन पण नाही. शेजार्‍यांकडे जाणं सासूबाईंना आवडत नाही. सिनेमा नाटक मला काहीही बघू देत नाहीत. तुम्ही दिलेला टीव्ही फ्रीज आणि माझ्या सगळ्या दहेज च्या वस्तू सासूबाईंनी वरच्या खोली मध्ये बंद करून ठेवल्या आहेत.

बऱ्याच वेळेला त्या मला बोलतात की मी एवढे भारी कपडे घालू नयेत. त्यांना असे वाटते की त्यांची मुलगी निशा देखील माझ्या सारखे कपडे घालायचा हट्ट करेल जे त्यांना परवडत नाही. सासऱ्यांची तुटपुंजी पेन्शन आणि हैदरचा आर्मी मधला पगार एवढ्यावरच आमचं घर चालतं. माझा दीर नदीम माझी फार काळजी घेतो. गोड बोलतो आणि मी दुःखी आणि एकटीच बसलेली असेल तर माझ्याशी येऊन तो काही बोलतो आणि मला बसण्यासाठी भाग पाडतो.

बाबा ,परवा हैदरचा पत्र आले होतं, मला तर त्याचा फोन घेण्याची देखील मना आहे, कोणीही मला त्याला फोन करण्यासाठी देखील जाऊ देत नाहीत किंवा शेजारी हैदर चा फोन आला असेल तर मला बोलण्यासाठी सासू-सासरे नेत नाहीत. बाबा, हैदर ला बरे नाही असे कळले म्हणून मी नदीमला घेऊन गेले होते, हैदर माझ्यावरती खूप वसकला, तो म्हणाला की असे बाहेर पडणे बरे नाही. मर्द लोक आजूबाजूला असतात. सासू-सासर्‍यांना खपणार नाही की त्यांची सून घराच्या बाहेर फिरते. माझ्याबरोबर नदीम ला देखील शाब्दिक मार पडला. पता नही बाबा, हैदर मुझसे बहुत रुडली , कोरडेपणाने वागतो.

सासुबाई त्याला कायम माझ्याबद्दल तक्रारीत करत असतात.

कधीकधी हैदर पत्र पाठवतो ,कारण पत्र बरोबर पैसे असतात. हैदर माझ्यासाठी काहीही पIठवत नाही. मला लागणाऱ्या जरुरी च्या वस्तू कायम मला तुमच्याकडेच मागावे लागतात.

सासुबाई बाहेर गेल्या बघून मी हैदरचा पत्र वाचलं, एक अक्षराने देखील देखील त्यांनी माझी चौकशी केली नव्हती. नदीम म्हणाला होता , अर्ध पत्र माझ्या चौकशीसाठी चा आहे म्हणून.

बाबा मला आता कळून चुकले आहे की मला जन्मभर सासरीच राहावे लागणार आहे.

तुमची दुर्दैवी,

नीलू.

……………………………………………………………………………………………………….


 प्यारी बिटिया निलोफर,

बेटा, ये भी दिन गुजर जायेंगे.


 लग्न झाल्यावर सासू न खूप कष्ट सहन केले म्हणून ती तशी वागते. अर्थात तुझा याच्यामध्ये काहीही दोष नाही. तू कधी तुझ्या आईला पै चा हिशोब ठेवताना पाहिले नाहीस. मी युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर असल्यामुळे आपल्या घरी पैशाला काहीच कमी नाही. हैदर ला पण चांगला पगार आहे आणि तो आर्मी मधला ऑफिसर आहे म्हणूनच आम्ही त्याच्याबरोबर तुझे लग्न करून दिले. तुला तर माहितीच आहे ना, तुझे सासू-सासरे जवळ दहा वेळेस आपल्या घरी आले होते तुला मागणी घालण्यासाठी.

 बेटा, कधीही आवाज उंचावून वडिलधार्‍यांची बोलू नकोस. हैदर वरती घरची जबाबदारी आहे आणि त्याला तुला पण विशाखापटनम ला न्यायचे आहे म्हणून त्याची चिडचिड होते.

 तुझ्या सासूला कदाचित वाटलं असेल, तू जर का विशाखापटनम ला गेलीस तर हैदर घरी पैसे पाठवणार नाही.

 तुझा दीर तुला मदत करतो म्हणालीस ना मग त्याला अभ्यासामध्ये मदत जरूर कर.                                                                                      

 हैदर च्या घरच्यांची जर तू काळजी घेतलीस तर हैदर च मन पण निवळेल.

नेहमी लक्षात ठेव, जेव्हा सासूला वाटते सुनबाई घरांमध्ये घेण्यासाठी आली आहे , म्हणजे तिचा मुलगा, कुठलीही सासू आपल्या सुनेबरोबर मुलाची वाटणी करण्यासाठी तयार होत नाही.

तुझ्या सासूला जेव्हा कळेल निलोफर तिच्याकडून काहीही घेण्यासाठी, नाही तर तिच्या वस्तू वाटण्यासाठी आली आहे तेव्हा तुझ्या सासूची नियत बदलेल.  

बेटी हे ही दिवस जातील, मी आणि तुझी अम्मा ,तुला माहेरी न्यायला येऊ.

 तुझा बाबा

………………………………………………………………

निलोफर चे बाबा जेव्हा तिला माहेरी नेण्यासाठी आले तेव्हा तिच्या सासूने खूप आदळआपट केली, नाही नाही ते आरोप नीलोफर वरती केले. लवकर काम करत नाही, निलोफर नऊ वाजेपर्यंत झोपून राहते, काही शिस्त नाही, निलोफर तिच्याजवळ येऊन तिची सेवा करत नाही. इत्यादी इत्यादी. 

निलोफर चे आई वडील फार दुःखी झाले, आणि ते तिला माहेरी घेऊन आले. 

आल्याच्या दुसर्‍या दिवशी हैदरचा नीलोफर ला फोन आला. 

हैदर तिच्याशी फारच रागावून बोलला. तिला पळपुटी म्हणाला. असे पण म्हणाला की तिला जर सतत माहेरी जायचे असेल तर त्यांनी तलाक घ्यावा. 

निलोफर सासरहून तर एकही फोन नव्हता. असाच एक महिना गेला. एक दिवस सासूने रागारागाने फोन करून तिला सासरी येण्याचे फर्मान सोडले. 


निलोफर ची सासू रागातच होती. पण थोडी खुशीत पण होती. कारण तिच्या मुलीचे निशा चे लग्न ठरले होते. निशा मोठ्या खानदानात जाणार होती. मुलाचा कापडाचा व्यवसाय होता, 

घरामध्ये 2,2 नोकर होते, मोठं घर आणि श्रीमंत खानदान निशाला मिळालं होतं. 

साखरपुड्याच्या च्या कार्यक्रमाला निलोफर च्या वडिलांना आमंत्रण नव्हते 

निलोफर कडे पण आता एक गोड बातमी होती, पण त्याच्यामुळे तिच्या सासू च्या वर्तणुकीचे मध्ये  काहीही फरक पडला नाही. 

डॉक्टर कडे जाताना आणि येताना व्यायामाच्या नावाखाली निलोफर ची सासू तिला पायीपायी नेत असे. 

शेवटी कंटाळून नदीम च्या हातून हैदरला निरोप पाठवला की तो तिला काहीतरी खर्ची देईल. तिच्या औषधासाठी, जेवणासाठी, घरामध्ये जेव्हा जेव्हा मासाहार होईल तेव्हा सासु मोजून तुकडे करी सगळ्यात लहान तुकडे निलोफर च्या वाट्याला येईल कधी कधी नुसतंच रस्सा निलोफर च्या वाटीमध्ये पडे. 

दूध, फळे म्हणजे फिजूल खर्च असं नीलोफर च्या सासूला वाटे. 

नदीम मधून मधून निलोफर साठी समोसे बर्फी किंवा अजून काही पदार्थ आणून गुपचुप तिला देत असे. त्याच्याकडे पण पैसे एकदम कमी असत. 

निलोफर मात्र माहेरून आलेली प्रत्येक गोष्ट नदीमला दिल्याशिवाय खात नसे.

 नदीमला अभ्यासामध्ये, त्याच्या इकॉनॉमिक्स च्या प्रॉब्लेम्स मध्ये नीलोफर मनापासून मदत करे. 

नीलोफर आणि नदीम गमतीने इंग्लिश मध्ये बोलत म्हणजे नदीमला सवय व्हावी म्हणून. त्यांचे इंग्लिश मधलं बोलणं सासूच मात्र डोकं उठवून जाई. लग्नाच्या तयारीसाठी म्हणून हैदर घरी आला होता, एक-दोन दिवस सगळेजणच निलोफर बरोबर खूपच गोड वागले.  गोड बोलण्याचे कारण ही ताबडतोब कळालं. 

…………………………………………………………………….

प्यारे बाबा,

मुझे लग रहा था या लोकांच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे, पण तसं काहीच नाही, त्यांनी माझे सगळे दागिने काढून घेतले, तोपर्यंत सासू पार गोड बोलली. निशा ने हळूहळू माझ्याकडून दहेज मध्ये दिलेले लेमन सेट सेट डिनर सेट सगळेच काढून घेतले. शेवटी मीच त्यांना म्हटलं तुम्हाला हवं ते सामान घ्या काही हरकत नाही.

पण बाबा सामान देऊन देखील त्यांच्या वागणुकीत काहीच फरक नाही. हैदर मला बरोबर न्यायला तयार नाही. आता माझं पण मन संसार करण्यावरून उठलं आहे. मी एखाद्या नोकर, मोलकरीण  सारखी सासरी राबत आहे.

तुमची अभागी मुलगी,

नीलू.

………………………………………………………………..

प्यारी गुडिया,

अगं वस्तूंचं महत्त्वच हे असतं की वेळेवर कामाला यावे. दहेज त्याच्यासाठीच असतो, सासरी ज्या गोष्टींसाठी गरज पडेल त्या गोष्टींसाठी ते कामाला यावं. हैदर चांगला आहे तुला परत सगळं काही घेता येईल, आणि हैदर नाही दिलं तर मी परत घेऊन देईन.

आहे, सध्या तुझ्या सासरी अडचण आहे आणि तुझ्या सासूला जर तुझ्या वस्तू निशाच्या सासरी द्यायचे असतील तर जरूर घेऊ दे. तुझ्या चेहऱ्यावरती कुठलेही भाव आणू नकोस, दान देताना हसतमुखाने द्यावं  

 लक्षात ठेव आर्मीवाले तर स्वतःच जीवनच देशासाठी देत असतात व या निर्जीव वस्तूंची काय कथा.

तु एका आर्मी ऑफिसर ची बायको आहेस याचा अभिमान बाळग, बेटा सगळं नीट होईल.

लाख लाख आशीर्वाद

 तुझा बाबा  

………………………………………………………… 

प्यारे बाबा,

आपने कहा था, वैसे ही मैने किया. माझ्या दहेज मधलं, काय सामान निशा ला पाहिजे होतं ते मी तिला हसत मुखाने देऊन टाकला. सहज म्हणून नदीम ला पण विचारलं काही हवे आहे का?

लग्नासाठी म्हणून मी नदीम च्या सलवार-कमीज

वरती डिझाईन काढले, रेशमी कलाकुसर त्याला फार आवडली, पण बाबा मी हैदरच्या कपड्यांवर काहीही केले नाही, तो पण माझ्यासाठी काहीच करत नाही.

मी सांगितल्याप्रमाणे निशाच्या लग्नामध्ये मी अगदीच साध्या कपड्यात वावरले, कारण तुम्ही दिलेले माझे कपडे फारच भारी होते.

माझ्याजवळ असलेल्या भारी परफ्यूम च्या बाटल्या आणि मेकअपचे सामान निशाला देऊन टाकले.


मनूच्या एंगेजमेंट कळले. खूप आनंद झाला. तिच्यासाठी तरी तुम्ही आता चांगलं स्थळ पाहिले असेल. नुसता मुलगा चांगला असून काय कामाचा? त्याचं खानदान देखील चांगले पाहिजे, आपल्याच तोला मोलाचे चे लोकं पाहिजेत, नाहीतर खाण्यापिण्यावर बंधने येतात. माझ्या सासरच्या लोकांसारखे हावरट नकोत.

निशा चा वलीमा झाल्यानंतर तर मला घेऊन हैदर तुमच्याकडे येणार आहे.

लवकरच भेटू.

तुमची नीलू.  

…………………………………………………

प्यारी बिटिया निलोफर,

आपका इंतजार है, लवकर ये, तू आणि हैदर आल्यावर मनूची रीतसर एंगेजमेंट करू.

बाकी कशाचीही काळजी करू नकोस. हैदर तुला घेऊन आमच्याकडे येतो आहे म्हणजे त्यांनी त्याच्या भोवती कोरडेपणाने बांधलेल्या किल्ल्याची भिंत आता थोडी-थोडी कमकुवत होत चालली आहे.

लाख लाख दुवा के साथ

बाबा.

00000000000000000000000000000000

हैदर आणि निलोफर जेव्हा तिच्या माहेरी आले तेव्हा मनूचे होणारी यजमान, सासू-सासरे, त्यांना भेटायला आले. बोलता-बोलता, बोलता-बोलता विषय निघाला पुन्हां बहू कडून सासरच्या लोकांनी किती काम करून घ्यायची. 

मनू ची होणारी सासू म्हणाली” आपण बहु म्हणजे मुलगी आणत असतो, नोकराणी नाही, आणि दोनशे तीनशे रुपये मध्ये कोणीही हसत खेळत आपल्या घरी काम करायला येऊ शकते. इकडून बहु वरती जुलूम जबरदस्ती करून तिचं नौकर करण्यामध्ये काय मिळते? “


मनूच्या सासर्‍यांनी सहज म्हणून हैदर ची पण चौकशी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्मी ऑफिसर्स ना एक-दीड महिन्यातच घर मिळते आणि आश्चर्य व्यक्त केले की निलोफर अजूनही सासरीच आहे. 

निलोफर नी आपल्या नवऱ्याची बाजू घेऊन त्यांना सांगितले," निशा चे लग्न ठरले होते आणि सासूबाईंच्या हाताखाली मदत करण्यासाठी कोणीही नव्हते म्हणून तिने खुशीने सासरी राहण्याचा निर्णय घेतला होता." 

मनूचे सासरे म्हणाले," बडे घर की बेटी ऐसेही होती है ." नीलोफर च्या बाबांनी खुशीने मान डोलावली. 


हैदर ने निलोफर ची सगळ्यात धाकटी बहीण, रुबीना तिच्यासाठी त्याच्या मावस भावाची स्थळ सुचवले, पण निलोफर मी साफ इन्कार केला. ती म्हणाली," मा, बाप एक अवलाद को दल दल मे फेक सकते है दुसरे को नही." हैदर जे काय समजायचं ते समजला. 


निशाच्या लग्नात नंतर तो जेव्हा केव्हा घरी येत होता तेव्हा त्याला नीलोफर सततच मोलकरीण सारखी काम करताना दिसत होती, तिची तब्येत खालावत चालली होती, गरोदर असून देखील हैदरची आई तिच्या कडूनच सगळी काम करून घेत होती. 

 नदीम कडून हैदरला घरची बित्तंबातमी कळत होती. 

शेवटी त्यांनी निर्णय घेतला. 

ऑफिस कडून रजा घेऊन तो घरी आला, आणि निलोफर ला घेऊन विशाखापटनम ला निघून गेला. इकडे आर्मीच्या हॉस्पिटल मध्ये त्याने निलोफर चे नाव घातले आणि अतिशय काटा काळजीने तिच्या तब्येतीची काळजी घेऊ लागला. 


अतिशय आनंदाने निलोफर ने वडिलांना पत्र पाठवले. 


प्यारे बाबा,

मी हैदर के साथ बहुत खुश , बहुत खुश आहे . आप जरूर मेरे घर आईये.

मेरी इस घर मे फोन भी है लेकिन मुझे खत लिखना नही छोडना. तुमची पत्र मी शंभर-शंभर वेळेला वाचते आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या पत्रांनी माझं लग्न वाचवले आहे.

पत्र वाचताना मला नेहमीच असं वाटतं की तुम्ही बाजूला बसून माझ्या डोक्यावर हात ठेवून मला समजावून सांगत आहात.

आपको लाख लाख धन्यवाद.

आपकी बेटी निलोफर

----------------------------------------------

मेरी प्यारी गुडिया निलोफर,

मे और तुम्हारी अम्मा, तुम्हारा खत ,तुझे पत्र वाचून बहुत खुश हैI

माझा हैदर वरती पूर्ण भरवसा होता. अतिशय चांगला मुलगा आहे. त्याचं कुटुंब पण चांगले आहे. कधीकधी पैशामुळे माणसांमध्ये कलह निर्माण होतो, पण तो क्षणिक असतो. खानदानी मुली छोट्या कारणासाठी आपल्या संसार मोडत नाहीत. बेटी तू मेरा गुरुर हो.

तुझ्या या वागणुकीमुळे, समजदारी मुळे, सासर आणि माहेर ह्या दोन्ही खानदान मध्ये तारीफ के काबील हो गयी हो.

तुम्हा दोघांनाही लाख लाख आशीर्वाद

 बाबा

…………………………………………………………………………

 

प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्यामुळे सासूबाई आता निर्धास्त झाल्या. आता आपल्या नातेवाइकांमध्ये त्या न थकता निलोफर चे गुणगान करतात.                      

बडे घर की बेटी असून देखील नीलोफर ने किती समजदारी दाखवून त्यांच्या गरीब घराला आपलंसं केलं, कुठलीही कुरकूर न करता, हे त्या आवर्जून सगळ्यांना सांगतात. निशाला देखील त्या नेहमी म्हणतात की तिने आपल्या भाभी सारखे व्हावे.

नदीम ने उत्तम रित्या इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्याची आणि नीलोफर ची मैत्री अतिशय घट्ट आहे. सुरुवातीच्या सासरच्या कठीण काळामध्ये नदीम एखाद्या भावाप्रमाणे पाठीशी उभा होता. त्यांचं नातं देवर भाभी पेक्षाही भावा-बहिणीचं जास्त आहे.

 बाबांच्या मते नीलोफर ने सासरची परीक्षादेखील डिस्टिंक्शन मध्ये पास केली आहे.

…………………………………………………………………………………………………           


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational