Sunjay Dobade

Romance

3  

Sunjay Dobade

Romance

पुजा

पुजा

2 mins
4.5K


पुजा : फेसबुकवर भेटलेली गोड मुलगी

फेसबुकचं वेड लागल्याला एक वर्ष झालं होतं. एके दिवशी तीन रिक्वेस्ट पाठवल्या आणि तत्काळ तिन्ही अॅक्सेप्ट झाल्या. त्यात पुजा नावाची अवखळ, बिनधास्त टीनएजर होती. होती. पुजाने आपल्या प्रोफाईलवर कधीही स्वत:चा फोटो ठेवला नाही, त्यामुळे ती सुंदर होती असं म्हणू शकणार नाही. पण ती स्वभावाने गोड होती एवढं मात्र निश्चित.

१९ डिसेंबर हा पुजाचा वाढदिवस. फारच थोड्या फेसबूक मित्रांना माहीत असेल. त्यापैकीच मीही एक. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि विचारलं, "आता किती वर्षांची झालीस?" "१८." ती म्हणाली.

"कमाल आहे! मागच्या वर्षीही तू अठराचीच होतीस!"

"सॅारी स्सर." तिने दिलगिरी व्यक्त केली.

पुजाला मांजरीची खूप आवड. वेगवेगळ्या मांजरींचे फोटो अपलोड करण्यात करण्यात तिला काय आनंद व्हायचा कुणास ठाऊक! त्यामुळे तिचे मित्र तिला म्याऊ म्हणायचे. तिलाही स्वत:ला म्याऊ म्हणून घेण्यात धन्यता वाटायची.

कोणताही नवा सिनेमा आला की पुजा तो पाहणार हे ठरलेलंच. तिच्या स्टेटसवरून तो तिला आवडला की नाही हे लगेच कळून जायचं.

पुजा बोलायला बरीच फ्रँक असली तरी कोणी फ्लर्टिंग करतंय असं वाटलं तर ती लगेच त्याला ब्लॉक करण्याची धमकी द्यायची. पुजा भोळी नक्कीच नव्हती, पण तिच्याबद्दल काही विचारले तर हातचं न राखता सांगून टाकायची.

पुजामध्ये एक कवयित्री दडलेली होती. तिने कविता रचण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक सगळ्या विस्कळीत होत्या. तिची बऱ्यापैकी चांगली असलेली एक कविता दिवाळी अंकात छापून आणल्याावर तिला कोण आनंद झाला होता!

एके रात्री बाराच्या सुमारास पुजा विचारू लागली, "सर, जेवण झालं का?" मला आश्चर्य वाटलं. न राहवून मी विचारलं, "तुझी तब्येत बरी आहे ना?" तिने म्हटलं, "ताप आलाय. पण तुम्हाला कसं कळलं?" मी म्हटलं, "तुझ्या बडबडीमुळं." आणि ती खळखळून हसली.

एक दिवस पुजा सहज म्हणाली, "सर, तुम्ही माझ्यावर कथा लिहाल?"

"नाट्यमय असेल तर नक्कीच लिहीन." मी होकार भरला. पुजाने मग मला तिचा बॅायफ्रेण्ड कसा त्रास द्यायचा आणि ब्रेकअप कसा झाला हे सर्व सांगितलं.

तिची इंटरेस्टींग स्टोरी ऐकून मी तिला म्हटलं, "माझ्यापेक्षा तूच अधिक चांगली कथा लिहू शकशील." अनेकदा प्रयत्न करूनही तिला काही ते जमलं नाही. मीही जास्त फोर्स केला नाही.

एखाद्या मुलाने आठ दिवस बुडवावी तशी ती अचानक गायब झाली. आठ दिवसांनंतर ती आॅनलाईन आली तेव्हा मी सहज चौकशी केली. तिने काहीही न लपवता सांगून टाकलं, तिच्या बहिणीने परजातीत लग्न केल्याने वडील जास्त टेंशनमध्ये आहेत म्हणून त्यांनी तिच्यावर खूप बंधने लादली आहेत. त्यामुळे ती डिअॅक्टीवेट झाली होती. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा डीअॅक्टीवेट झाली.

पुजासारखी मुलगी कोणत्याही बंधनात राहणे जवळजवळ अशक्यच आहे. दीड वर्ष झालं ती अजूनही आॅनलाईन आलेली नाही. तिच्याशी संपर्क साधायला फेसबूकशिवाय दुसरं कोणतही माध्यम नाही. मला तर भीती वाटतेय, ती या जीवनातूनच डिअॅक्टीवेट तर झाली नाही ना?

एरवीही एक मैत्रिण म्हणून तिची आठवण सतावतेच. आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी थोडी अधिकच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance