हर शाख पे उल्लू बैठा है
हर शाख पे उल्लू बैठा है


हर शाख पे उल्लू बैठा है "कंबल ले लो य, कंबल." लांब दाढीवाल्या सरदार सिंगाची हाक निनादली आणि पुढच्या काही मिनिटांतच दहा-बारा जणांचं कोंडाळं त्याच्या भोवती जमलं. थंडीचे दिवस सुरू झाले होते. कोणाला दोन - कोणाला तीन ब्लँकेट पाहिजे होते. एकट्या जीवाबालाच पाच कांबळ्यांची गरज होती. मला पाह्यजे, मला पाहिजेचा गलका वाढत होता आणि सरदारजवळ मोजून पाच कांबळे होते. "तुम एक काम करो, जिसकोभी कंबल चाहिंदा सौ सौ रुपये एडवान्स में जमा करो. मैं अगले हप्ते ले आवांगा." सरदारजीने मध्यम मार्ग काढला. नै नै. पिछले साल भी तुम्हारे जैसा दाढीवाला सरदार आया था, तीन चार हजार का चुना लगा के गया. आठ दिवस के बोली पे सौ सौ
रुपये ले गया, अजूनपर्यंत नै आया." मास्तरकीचा कोर्स पूर्ण केलेला तान्या म्हणाला. सगळ्यांनी माना डोलावल्या. "कर्तार सिंग, मेरा भाई था, मर गया." सरदार सिंगाचा गळा भरून आला. दोन क्षण कोणीच काही बोललं नाही. उदास मनाने सरदारजीने आपलं बोचकं उचललं. "थांबा." सरदारसिंगाला सहानुभुती म्हणा की कर्तारसिंगला श्रद्धांजली म्हणा लोकांनी तीन तीन चार चार ब्लँकेटची ऑर्डर देऊन टाकली. अर्धा तासातच सहा सात हजार जमा करून सरदार पुढच्या गावी अॅडव्हान्स गोळा करण्यासाठी निघून गेला. वर्ष होऊन गेलं असेल त्या गोष्टीला. करतार सिंगानेच सरदार सिंग बनवून आपल्या चुत्या बनवलं ही गोष्ट लोक वेळी अवेळी गुटख्यासारखी चघळत असतात.