पतंग
पतंग
आपल्या देशात बहुतेक भागात ,मकर संक्रातिच्या सणाला ,लहान-मोठे सर्वच पतंग हवेत आकाशात उंच उडवितात. त्यात काही वावगे नाही.देशात तशि संस्कृति स्थापित झाली आहे. देशातील लहान मुलांचा हा आवडता खेळ पैकी एक आहे.हा खेळ मकर संक्रातिच्या दिवशी गुजरात राज्या मध्ये महोत्सव म्हनुन साजरा केला जात असतो.महाराष्ट्रात पण हा मोठ्या प्रमाणात खेळला जाणारा खेळ आहे.या खेळाची तैयारी फार दिवसा पासुन लहान –मोठे करत असतात.हल्लीच्या काळत मंजा बनवने हा छंद, तैयार चिनी मंजामुळे कमी झाला आहे. तो सुरुवातीच्या काळात फार प्रचलित होता. युवाशक्ति यात आपली बहुमुल्य ऊर्जा खर्च करित होते. बाजारात नॉयलनचा तैयार चिनी मंजा सहज पणे उपलब्ध होता असे. सध्या त्यावर सरकार ने बंदी घातली आहे .या नॉयलनचा चिनी मंजा मुळे हल्लीच्या काळात बरेच अपघात झाले आहे. त्यात कित्येक नागरिकांची मान कापल्याने मृत्यु पण झालेली आहे. या मंजामुळे पशु-पक्षींना पन इजा होवुन त्यांचे प्राण गेले आहे. काही समाजिक संघटनेच्या जागृकते मुळे, या मंजा वर सरकारने बंदी आणली आहे. तरी काही असामाजिक तत्व याचा व्यापार करतात व दुरघटनेला प्रोत्साहन देत आहे. नॉयलनचा तैयार चिनी मंजा येण्या पूर्वी, देशातील पतंग उडविनारे शौकिन देशी पध्दतीने मंजा तयार करत असे. यात एक पूर्ण मित्रांचा संघ समन्वय ठेवुन मंजा तैयार करुन, एक्मेकांशी व्यक्तिगत किंवा समूहामध्ये पेच लावण्याची स्पर्धा होत असते. जो यात अजिंक राहत असे. त्याचा मंजा, म्हणजे धारदार मंजा समजला जात असे. जरी मुख्य पतंग उडवण्याचा दिवस मकर संक्रांत असला तरी.हा खेळ, मकर संक्रांतच्या पहिले व नंतर जवळ-पास एक पंधरवडा सारखा कमी-जास्त प्रमाणात चालत असतो.
एका कुटुंबात दोन मुले व आई-वडिल एकुन चार सदस्यांचा सुखी परिवार होता .मुले साधार मोठी झाली होती. ते शाळेत जात होते. मोठा मुलगा थोडा शारिरीक ड्रुष्टिने अशकत होता. त्याला अन्न लागत नव्हते. लहान मुलगा चांगला धष्ट-पुष्ट व चंट होता. त्याला पाहुन वाटायंचे की हा सर्वांच्या हिस्सा तोच एकटा खात असावा. लहान असल्यामुळे तो आई-वडिलांचा लाडकाच होता. वडिल गावातील कारखाण्यात काम करत होते. त्याच कंपनीची एक मोठी वसाहत होती. वसाहतीचे सांड पाणी व मल-मूत्र एका खुप मोठ्या सिमेंटच्या जमिनीच्या आत बनविलेल्या टंकीमध्ये जमा होत होते. टंकीची वरचा पृष्ठभाग जमिनीपेक्षा थोडासा उंच होता.त्या टंकीला काही अंतरावर उपसणी करण्यासाठी काही छिद्रेपन होती. त्यावर सिमेंटचे झाकण लावले असायचे.टंकी फार मोठी असल्यामुळे सर्व मुले टंकी वरिल गुळगुळीत पृष्ठ भागावर नेहमीच खेळत असत. टंकी इतकी मोठी होती कि तीच्या वरच्या पृष्ठ भागावर बरेच मुले खेळत असे. त्याच टंकीवर बसुन मंजा पण बनवत असे. व तीथेच काही मुले पतंग पण उडवत होते. हे तिथले नेहमीचे दृष्य होते. पतंगीचा जोश संक्रांती नंतर हळु-हळु मावळत चालल होता. आता फार मुले तिथे पतंग उडवत नव्हाती.रविवारचा दिवस होता. सर्व मुले दुपारी खेळुन घरी आराम करत होती. एक मुलगा बहुतेक संध्याकाळ होण्याच्या पूर्वी त्या टंकी वर पतंग़ उडवित होता. अनिल त्या टंकीच्या समोरच्या चाळीत राहत असे. त्या मुलाला बघुन ,अनिलची पण पतंग़ उडवण्याची तीव्र इच्छा झाली होती. पण आई असे करण्यास मनाई करत होती. त्याला ती म्हणाली, काही पतंग वैगरे उडवयाची नाही. चुप-चाप आपला अभ्यास कर असे बजावले होते. त्याने उलथ्या घड्यावर सारे पाणी टाकले होते.आई घर कामात व्यस्त झाली होती.योग्य वेळ साधुन त्याने आपले दफ्तर गुंनडाळले व आई ला न माहित करता, तो टंकी वर पतंग उडवण्यासाठी गेला होता.
तीथे तो पतंग उडवायला लागला होता. तीथे असणारा अनोळखी मुलाने आपली पतंग खाली उतरवली होती.तो बहुतेक घरी जाण्याच्या तयारित होता. अनिल पतंग उडविण्याचा प्रयत्न करित होता.
पतंग उडविण्या साठी तो मागे- मागे समोर पाहत चालला होता. दुर-दैवाने दोन-तीन दिवसा पूर्वीच टंकी साफ करण्यासाठी त्याचे झाकण उघडुन बाजुला ठेवण्यात आले होते.अनिलचा काळ व वेळेने संधी साधली होती. व तो त्या मोठ्या टंकी मध्ये, तोल सुटल्याने पतंग व चकरी सोबत पडला होता .त्याला पोहणे येत नव्हते. तो टंकी मध्ये पडला, हे कदाचित त्या अज्ञात मुलाने किंवा दुर विहिरी वर पानी भरणा-या काहींनी बघितले असावे. पण याची चर्चा कोणी केली नाही.पाणी फार विषारी असल्याने तो लगच मरण पावला होत.व त्याचे शरिर वजनामुळे आत मध्ये बुडाले होते.
अनिल आता रात्र झाली आहे, तरी हा अजुन घरी कां आला नाही?. याचा शोध घेने सुरु झाले होते.पूर्ण नगरात व त्याच्या सर्व मित्रांशी संपर्क करण्यात आला होता.पण दूर-दैवाने अनिलचा शोध लागत नव्हता.शेवटी त्याच्या वडिलांनी पुलिस स्थानका मध्ये मुलगा हारवलची नोंद केली होती. पुलिसांनी आपल्या परिने तपास सुरु केला होता. नगरातील सर्वच कुंटुंबामध्ये गोंधळ उडाला होता. काखेत कळसा व गांवाला वळसा. प्रत्येक जन आप –आपले तर्क देत होते. अनिलच्या आई ने आकाश डोक्यावर घेतले होती. तीचा मेंदु काम करत नव्हता. संध्याकाळी , त्या दिवशी कोणी मित्र त्याच्या कडे आला नव्हता. त्यामुळे रहस्य सारखे वाढतच चालले होते. दुस-या दिवशी पुलिस पण विचार-पुस करुन गेली होती. शेवटी त्याच्या भावाच्या लक्षात आले कि अनिलची पंतग व मांजाची चक्री जागेवर दिसत नव्हती.त्याचा शोध घेणे सुरु झाला होता.पण घरात कुठेच पंतग व मांजेवाली चक्री सापडत नव्हती.मुलगा हारपला म्हणुन पूर्ण गांवात चर्चा सुरु झाली होती. नंतर काही लोकांनी शंका काढली कि तो कदाचित टंकी मध्ये पतंग उडवतांना पडला असावा. कारण त्या टंकीचे एक झाकण उघडे दिसत होते. पुलिसांनी टंकी साफ करणा-या कर्मचा-यांना बोलवुन टंकीची पाहणी करण्यास सांगितले.आता घटना घडुन दोन-तिन दिवस झाले होते.त्यामुळे शव फुगुन वर आले होते. कर्मच्या-यांच्या लांब बाँम्बूला ते अडत होते. त्यांनी प्रयत्न करुन त्या शवाला झाकणा जवळ आणले होते.अनिलचे पाय दिसायला लागले.खूप प्रयत्ना नंतर शव बाहेर काढ्ण्यात आले होते.रिती-रिवाजा प्रमाणे सर्व संस्कार करुन,प्रेत यात्रा काढण्यात आली होती.पण मुलगा गेला म्हणुन अनिलच्या आईने अकाश –पातळ रडुन- रडुन एक केले होते. शेजारणी काकुची समजुत काढण्याचा प्रयत्न करित होत्या.पण वडिल गंभिरपणे सर्व सांभाळुन घेण्याचा सर सकट,आपले दुःख बाजुला ठेवुन प्रयत्न करित होते.वेळ व समुद्राच्या लाटी कोणासाठी कधीच थांबत नसते. सगळ्यांना अशा दुःखद घटनेमुळे अत्यंत दुःख झाले होते. व अनिलचा शेवटी मशानघाटात अंतिम देह संस्कार विधिवत करण्यात आला होता.त्याचे लंगोटी मित्र या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. अनिला आपल्या जीवणात पतंगी पेक्षा खुप मोठी झेप घ्यावयाची होती. आई-वडिलांचे स्वप्न त्याला पूर्ण करुन यशाच्या क्षितिजावर पतंगी पेक्षा उंच क्षेप घेवुन चमकवयाचे होते. पण प्रकृतिला जे मान्य असते, तेच नेमके होत असते. तेच घटत असते. पण प्रत्येकाने जर आपले काम चोख केले तर अशा घटनांना आळा बसु शक्तो. सुदैवाने जर ते झाकण जर आपल्या ठिकाणी बसवले असते तर ही घटना निश्चितच टळली असती. रोज मरे त्याला कोण रडे,काकुंनी आता स्वतःला सांभळले होते.मुलांचे वडिल त्याच कंपनी काम करत असल्यामुळे ते कंपनी वर नायालीयन खटला करु शकले नाही. मुलगा गेलाच आहे.वाद करुन नौकरी पण घालवने त्यांना भितिमुळे तर्कसंगत वाटले नव्हते.त्यांनी जर अशी हिम्मत दाखवली असती तर इतर कंपण्यासठी एक वचक बसली असती !. व अशा कित्येक जीव घेवु घटना निश्चितच टाळता आल्या असत्या. पावसाने भिजवले अन, नवर्याने झोडपलेली तर सांगनार कोणाला ?. काही काळा नंतर ती कंपनी पण डुबली होती. व कांकाच्या नशिबी नुसते दुःखच आले होते. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेल्या परिस्थितीशी त्यांना तोंड द्यावे लागले होते.